Nojoto: Largest Storytelling Platform
93591646505629
  • 21Stories
  • 89Followers
  • 173Love
    0Views

शब्द शृंगार 9359164650

  • Popular
  • Latest
  • Video
291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

किती छान होते ना ते दिवस.... तुझा फक्त अबोल स्पर्शच मला खूप काही सांगून जायचा.... नजरेनेच कळायचं एकमेकांचं दुःखं आणि नजरेनेच शमवल्या ज्याच्या काळजातल्या वेदना... पण... हात सुटतो नकळत.... फक्त आठवणी उरतात मग कधी कधी तुझा भास व्हायला लागतो..... काव्याच्या ओळी झिरपायला लागतात.... मनाच्या कागदावर..... हल्ली तुझ्यासारखं प्रेम दुर्मिळ होत चाललंय... ये.... तुला आठवतंय.? मी तुला प्रपोज केलेला दिवस.... तू मला मारलेली मिठी.... तुझ्या ओठांवर टेकवलेले ओठ... माझं अवखळ होणं.... तू मर्यादा तुझ्या पाळणं.... प्रेम म्हणजे ते नसतं रे.... असं समजावून सांगणं.... थोडं तू हि आठवत जा... तो नदीचा तीर.... गहिवरली सांज... रातकिड्यांचं संगीत... तुझा स्पर्श.... आह्ह... तसं तुझ्या प्रेमात आणि माझ्या प्रेमात फरक फक्त एवढांच... तू निघून जातांना मला स्मरणात ठेवलंस.... आणि मी... आणि मी.... तुला कवितेच्या प्रत्येक ओळीत जिवंत ठेवतो.... हे तुझं माझ्यात जिवंत राहणंच.... लिहितं ठेवतं मला वाटतं हीच असावी तुझी जिवंत कविता....
ऐकतेस ना... भेट

भेट #poem

2 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

रोज मी फोनवर बोलायचं
तु ऐकायचं.... मग अधून मधून....
तू हम्म करायचं
मी तुला समजून घ्यायचं....
असं करू या का..?
तुझा हात माझ्या हातात दे
तुझं डोकं माझ्या खांद्यावर ठेव... 
थोडं ओठांने निशब्द होऊ....
डोळ्यांची मौन भाषा बोलू
अबोल होऊन शब्दांना मिठीत घेऊ.... love

9 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

संध्याकाळ ढळता ढळता तुला फक्त समोर बसुन डोळे भरून न्याहाळवास वाटत होत.... काल तु गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये खुपच मनमोहक सुंदर दिसत होतीस पण जेव्हा वारा तुझ्या केसांशी छेड काढत होता तेव्हा तुझ्या विस्कटलेल्या बटांशी तु खेळत होतीस अन् तु त्या बटांना नाजुक कोमल हातांने एका बाजुला सावरत होतीस तेव्हा तर तु अजूनच कमाल दिसत होतीस.... तुला पाहून मी मात्र मनातल्या मनात पुटपुटत होतो "उलझ जाने दो तुम अपनी जुल्फों को इन हवाओं के संग, तुम क्यों उनमे सुलह कर देती हो..." तितक्यात माझ्या मोबाईलच्या रिंगटोनने तुझ्यावरून ध्यान भरकटले.... सांज

सांज #poem

6 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

नको असतो प्रत्येक वेळी मला तुझा पैसा, तुझं स्टेटस, तुझी संपत्ती तुझ पद मग काय हवं असतं मला.... नक्की काय अपेक्षित असतं मला आपल्या नात्यांला.... काय पाहीजे असतं मला तुझ्याकडून नक्की मला ही सांगता येणार नाही पण हवे असतात तुझे दोन शब्द जिव्हाळ्याचे.... हवी असते ती एक नजर प्रेमाची.... हवा असतो तो एक नजरेचा कटाक्ष खट्याळपणाचा.... तुझ्या केसात गुंतलेल्या मनाला तो गुंता ही आवडतो कारण तो असतो तुझ्याच विचारांचा.... थकलेलो असताना हवी असतात तुझ्या हातांची बोटे माझ्या केसात अन् तो हात माझ्या डोळ्यांच्या पापण्यावर.... कधी कधी घाबरतो मी या निर्दयी जगाला वाटतं तु म्हणावं अरे मी आहे ना तुझ्यासोबत आणि मग हवा असतो तो हात मला माझ्या खांद्यावर, धीर देण्यासाठी खूप एकाकी वाटत कधी, हिरमुसायला होतं, रडायला येतं तेव्हा मात्र हवा असतो तो हात माझ्या हातात आधारासाठी, चालायचं असतं तुझा हात हातात घेऊन त्या शांत रस्त्यावरून, अनुभवायची असते तुझी सोबत त्या झाडाखाली बसून.... कधी तरी एकांतात अनावर होणाऱ्या भावनांना पाहिजे असतो तुझा तो अलवार स्पर्श जो मोहरून टाकतो मनासोबतच शरीरालाही.... मला ही गरज असते तुझी, मला ही हवे असतात ते धुंद मंतरलेले क्षण तुझ्या सहवासाचे, तुझ्या सानिध्याचे मग हळूच शिरावेसे वाटते तुझ्या मखमली कुशीत अन् हरवून जावं वाटतं स्वतः ला.... काही क्षण हवे असतात आपल्या फक्त आपल्या जाणिवांचें.... त्या विलक्षण अनुभुतिचे.... जगाला विसरुन तुझ्यातच गुंतायच असतं, विरघळायचं असतं पण नाही व्यक्त करता येतं मला माझ्या भावनाना शब्दात.... वाटतं तु समजून घ्यावसं मी काहीच न बोलता.... ओळखावसं मनातलं फक्त नजरेतूनच.... कधीतरी घे ना मला ही समजून.... कधीतरी दे ना मला ही ती आश्वासक नजर मला बघून... तु ही विसर ना कधीतरी या जगाला.... ये ना कधी तरी मोकळ्या मनाने आणि हो ना एकरूप माझ्याशी.... माझ्या विचारांशी.... माझ्या भावनांशी.... कधीतरी माझ्यातल्या माझ्याशी....

-निल इमरोझ

6 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

मनातल कधी तरी तुझ्या गुलाबी ओठांवर यावं आयुष्याची सरणारी प्रत्येक संध्याकाळ तुझ्या सहवासात सरावी अन् रोजच्या दिवसाची सुरवात तुझा मनमोहक तेजस्वी चेहरा पाहून व्हावी.... तुझ्यासोबत तासन तास गप्पा माराव्यात अन् अलगद तुझ्या खांद्यावर डोक ठेवून अलवार तुझ्या कुशीत शिरावं.... मंद अश्या एखाद्या संध्याकाळी समुद्र किनारी तुझ्या कमरेभोवती हातात हात गुंफून बसावं अन् त्या लाटांना पाहत तुझ्या मोकळ्या कुरळ्या केसात मी भान विसरून गुंतून जावं.... त्या बेभान धडकणार्या किनार्यापासून लाटांना दूर जाताना होणाऱ्या वेदना तू बघाव्यात पण चुकून कधी त्या विरहदायक वेदना तु मला देऊस नकोस हे मी प्रत्येक श्वासातून तुला सांगावं कारण तूच माझा श्वास तूच माझा आत्मा तूच माझं सर्वस्व तूच माझं आस्तित्व तुझ्याविना माझं आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त शुन्य.... love

love #poem

8 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

तु गुंतत चाललीयेस आहेस आणि इतकं की तुला तुझ्या अस्तित्वाचाच विसर पडत चाललाय.... माझ्यात गुंतण्याआधी तू स्व:ताला सावरावसं कारण ज्यावेळी तु पुर्णता सर्वस्वी स्व:ताला झोकून देऊन गुंतशील ना त्यावेळी तुला सावरण माझ्या हातात नसेल म्हणून अजून हि वेळ नाही गेली.... अजून ही विचार कर.... अजून ही सावर.....

6 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

मी नाही म्हणणार तुला की तू मला विसर.... मला विसरण्याचा तुला हक्क व अधिकार आहेच म्हणून मी कोणत ही बंधन तुझ्यावर लादणार नाही पण मला अस वाटतयं की तू तुझ्या आयुष्याच्या एका वळणावर स्व:ताच्या अस्तित्वाचे भान ठेवून तू मला विसरून जावंस कारण हाच एकमेव चांगला पर्याय आहे.... बघ कदाचित तुला जमतयं का.... बस्स इतकचं.... विसर

विसर #Shayari

7 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

तु सोबत नसलीस म्हणुन काय झालं...? बहरलेली रातराणी, सुगंधाने मन मोहून टाकणारा बेधुंद मोगरा, सतत बोलणारी पण मध्येच अबोल राहणारी अंगणातील अबोली पाहिली की तुझीच तर आठवण येते मला.... त्या प्रत्येक नाजूक फुलामध्ये मी तुलाच शोधत असतो अन् तिथे कधी कधी सापडतेस अलगद मला माझ्या मनाच्या अंगणात प्राजक्त, मोगरा, रातराणीची फुलं वेचत बसलेली तू....

8 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

Every new day is a chance to change your life...

4 Love

291544a176ddb90b0248a8cf0ddb977f

शब्द शृंगार 9359164650

गुज़रते दिनों का नही बल्कि यादगार लम्हों का नाम है जिंदगी.... 😎

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile