Nojoto: Largest Storytelling Platform
milindkambere6889
  • 23Stories
  • 33Followers
  • 209Love
    0Views

Milind Kambere

jan kr kya karoge

  • Popular
  • Latest
  • Video
2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

जोडुनि नाते मागे फिरणे जमले नाही
विरहाने कालच्या प्रेम करणे थांबले नाही

नाते कोणते हे अनोखे मनाचे मनाशी जुळले
रिते होता होता भान जगाचे उरले नाही

वाटते तिजला मी दिवाणा तिच्या रूपाचा
सौंदर्यावर तिच्या मन वेडे कधीच भाळले नाही

लोटले पूर आसवांचे सारे नकोसे झाले
जीवनाचे गणित हे आजवर कळले नाही

लागले जव ग्रहण चंद्रास माझ्या
जाणुनी सारे मी वेध पाळले नाही

लाख आक्रोश करुनि लोटते मज ती दूर
तिच्यासाठी झुरताना अद्याप तिने मजला पाहिले नाही

हसू उमटावे गाली तिच्या एवढीच माफक अपेक्षा
महादेवानेही म्हणणे माझे मुळीच टाळले नाही

©Milind Kambere जोडुनी नाते मागे फिरणे जमले नाही
#dryleaf

जोडुनी नाते मागे फिरणे जमले नाही #dryleaf #poem

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

पहाटेचे तीन-चार वाजले होते
"काय करतोय आमचा लेखक ?"
म्हणून पहाटे पहाटेच आई त्याच्या बेडरूममध्ये शिरली.
दरवाजा उघडाच होता
आत पाहते तर सारं अस्ताव्यस्त पडलं होतं
सगळीकडे होता तो फक्त पसारा 
तो खाली गुडघ्यावर बसून होता
डोकं बेडवर आडवं टेकलं होतं
रडून-रडून अश्रू ही सुकल्यासारखे वाटत होते 
बऱ्याच दिवसांनी आज तो जागा होता
कागदाचे कितीतरी बोळे संपूर्ण रूम 
मध्ये इकडे तिकडे पसरले होते 
संपूर्ण डायरी फाटून खराब झाली होती 
उरलेल्या दोन-तीन पानांवर 
होते ते फक्त पेनाने मारलेले ओरबडे
नुसती खाडाखोड ,गिरवागिरव
आईने त्याच्या केसावरून अलगद हात फिरवला 
डायरी हातात घेतली,
शेवटच्या पानावर फक्त एवढंच लिहिलं होतं
"I miss you ____
please come back..."

                                         -●@मनMiलिंद_●(M.K.)

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

तुझे रुसणे-फुगणे आवडते मला
मग मजला छळणे आवडते मला

रमून जातो कधी कौतुकात तिच्या
तूझे तिच्यावर जळणे आवडते मला

घेता हाती हात तुझा ओठ दगा करतात
तुझे ओठांनी ओठांना रोखणे आवडते मला 

नाही आवडत तुला उगाच नट्टापट्टा
तरी तुझे माझ्यासाठी सजणे आवडते मला 

नाही मी कोणी लेखक व कवी 
फक्त तुझ्यासाठी लिहिणे आवडते मला

                   -●@मनMiलिंद_●

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

तिचं लग्न ठरलं होतं 
ती थोडी खुशही होती 
अन् थोडी नाराजही 

ते दोघेही तिच्यावर 
जीवापाड प्रेम करायचे
तिचंही त्या दोघांवर अतोनात प्रेम होतं

सारं काही योजलं होतं 
घरात आनंदच आनंद नांदत होता 
तीही आता स्वेच्छेने तयार झाली होती

एकीकडे तो या धक्क्याने पूर्णपणे झपाटला होता 
नाही नाही ते विचार मनात आणून कट रचत होता
तिचं लग्न मोडण्यासाठी
तिच्या अब्रूची ही परवा न करता 

दुसरीकडे हा जीवाचं रान करत होता
तिच्यावर येणारं प्रत्येक संकट झेलायला तयार होता 
रक्ताच पाणी करून सर्व सांभाळत होता 
तिचं लग्न सुरळीत पार पाडण्यासाठी
तिची बदनामी वाचवण्याकरता

एकीकडे त्याचा स्वार्थ दिसत होता 
तर दुसरीकडे याची काळजी 

फरक तर असणारच ना 
एक तिचा प्रियकर होता 
आणि दुसरा तिचा भाऊ

                   -●@मनMiलिंद_●(M.K.)

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

कत्ल हो चुका था उनके लफ़्ज़ों से
मेरे इस दिल का
बेवजह यहाँ वहाँ हथियार ढूँढने का
उनका बहाना अच्छा था।
                         -●@Miलिंद_●

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

हा विरह माझा वा कपट तुझे हे ?
तुझे असणे नसणे आता सारखेच आहे..

-●@मनMiलिंद_●

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

Mere Dil se kafi Lagav hai mere apno ko
jab bhi vakt mile 
khelne aa jaya karte hai...

-@mr._secret_shayar_

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

हृदयात वेदनांचा बेफाम कचरा व्हावा,
मग डोळ्यांतून भावनांचा निचरा व्हावा

इथे कोणास वेळ,मन जपण्या तुझे
की ज्याने तुझा आसरा व्हावा

नाही कुणास ठाव, सल गरुडाच्या मनातली
साऱ्यांनाच वाटे तू मोर नाचरा व्हावा

नको जाऊस पुन्हा, त्या अपेक्षांच्या बाजारात
जिथे तुझ्या दुःखाचा ही सण साजरा व्हावा

संवेदना संपल्या आता,उरली फक्त आर्तता
हेच असेल नशिबी, तू निलाजरा व्हावा

                              -●@मनMiलिंद_●

2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

रुसण्याचे बहाणे शोधशील किती ?
समजावणे मज आता जमत नाही
बोलून जातो स्पर्शच सारे काही
स्वतःला रोखणे मग मजला जमत नाही

                             -●@Miलिंद_●(M.K.)
2b9ca83641ac5dd3fb81bf6253e017b9

Milind Kambere

People 

२५-३० जण घोळका करून
आले होते सांगायला घरी
"कोरोनाचं संकट आलंय दारी,
गर्दी टाळा आता तरी.."

काय तुमचा सल्ला !
काय तुमची कृती !
" वाह रे वाह"
हीच का ती जनजागृती ?
                                     -●@Miलिंद_●(M.K.)

loader
Home
Explore
Events
Notification
Profile