Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1996628454
  • 135Stories
  • 205Followers
  • 974Love
    0Views

Ajay Dilip Ghanekar

  • Popular
  • Latest
  • Video
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

आपली चूल सोडून, काहीजण दुसऱ्यांच्या चुलीवर काय शिजतंय हे पाहण्यातच जास्त Interested असतात.

©Ajay Dilip Ghanekar
  असं का??, कुणास ठाऊक 🤔?

असं का??, कुणास ठाऊक 🤔? #मराठीविचार

27 Views

2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

आपण कुणाला काय समजतोय त्यापेक्षा आपल्याला समोरचा काय समजतोय हे जास्त महत्वाचं असतं आणि यावर खूप काही गोष्टी Depend असतात. कधी कधी काय होतं आपण समोरच्यावर जीव ओवाळून टाकतो मात्र समोरचा आपल्यासोबत चालायचं नाटक करून पाठीत खंजीर घुपसतो. विश्वासाला सुरुंग लावतो.

✍🏻 अजय घाणेकर

©अजय घाणेकर ✒️ #akelapan
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

*एक पणती* 

एक पणती लाऊ माणुसकीची, 
एक पणती लाऊ आपुलकीची 
एक पणती लाऊ एकजुटीची, 
एक पणती लाऊ प्रेमभावाची 

एक पणती लाऊ प्रकाशाची, 
एक पणती लाऊ आधाराची 
एक पणती लाऊ नव्या आशेची, 
एक पणती लाऊ नव्या स्वप्नांची 

एक पणती लाऊ सुविचारांची, 
एक पणती लाऊ मदतीची 
एक पणती लाऊ हर्षाची, 
एक पणती दिवाळी सणाची

©अजय घाणेकर ✒️ #Diwali
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

एखाद्या व्यक्तीला लायकीपेक्षा जास्त मान दिला तर तो हवेत उडत जाऊन आपली योग्यता विसरून जातो.
एखाद्याला मान देऊनही तो आपल्याला फाट्यावर मारत असेल तर एकच उपाय **जशाच तसं वागायचं**

तुझी घमंड तुझ्यापाशी 😊🙏🏻

©अजय घाणेकर ✒️ #Sunrise
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

लोकं काय बोलतील याचा विचार करून आपण आपलं वागणं /बोलणं बदलण्यापेक्षा स्वतःला स्वतःत काय बदल अपेक्षित आहेत हे निरखून पहा.
स्वतःत स्वतःच्या कुवतीनुसार बदल घडवा. स्वतःच्या विचारांना चालना द्या. आपल्या स्वतःच्या विचारांना अंधारात लोटून दुसऱ्यांच्या विचारांना प्रकाशात आणण्याच्या प्रयत्न करू नका. असं केल्यास स्वतःचे विचार कायम अंधारातच घुसमटत राहतील. सद्ययुगात सल्लेदार जास्त आहे. त्यामुळे कोणाचं कितपत ऐकावं याचा रिमोट कंट्रोल आपल्या स्वतःच्या हातात असायला हवा. स्वतःच्या विचारांना खतपानी द्याल तर त्याचं पिक आपल्याला भरभरून मिळेल. याउलट दुसऱ्यांच्या विचारात त्याचा स्वार्थ ही असू शकतो त्यामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.... 🙏🏻

©अजय घाणेकर ✒️ #FindingOneself
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

कल्पनांचे मनोरे फक्त रचून फायदा नाही,
प्रत्यक्षात उभारणीसाठी पाया मजबूत हवा

हत्तीचे बळ घेऊन नभांगणी उडतो दूर पक्षी,
चतकोर भाकरीसाठी स्वतः जळत राहतो तवा

✍🏻©® अजय घाणेकर 🌿
📞 9130132453

©अजय घाणेकर ✒️ #dost
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

एखाद्याच्या शब्दाला शब्द भिडवूनचं तो त्याचे खरं रूप दाखवत नसतो.
कधी कधी......, 
फक्त एकदा तोंड बांधल्यागत शांत बसून पहा, समोरचा तोंडाला फेस येईपर्यंत व्यक्त होऊन जाईल अन त्याचं खरं रुपही आपणांस पाहण्यास मिळेल.

©अजय घाणेकर ✒️ #Dark
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

आज सगळ्याच नागरिकांचं /भारतीयांचं देशप्रेम अती उतू जाईल अगदी घडा भरून ओसंडून वाहेल. तिरंगा गल्लोगल्ली रुबाबात फडकेल. सारा आसमंत स्वातंत्र्यमय होऊन जाईल. देशभक्तीचे नारे जागोजागी पेटतील. असो, एक दिवस का होईना सारे भारतीय एकजुटीने वावरतात. अन दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र चालू, अत्याचार, बलात्कार, हिंसा, खूण, दरोडे, दहशदवाद 👈🏻 या साऱ्या गोष्टी जेव्हा थांबतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा होईल अन तिरंग्याची शान वाढेल

©अजय घाणेकर ✒️ #Independence
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

एखाद्याला Block तर आम्हाही करू शकतो. 
पण आम्ही Block करायचं ठरवलंच तर Whatsapp वरून नाही तर अगदी मनातूनच Block करू.

©अजय घाणेकर ✒️ #LateNight
2e51047d4c699ecea337664bb95b443f

Ajay Dilip Ghanekar

शरीरावर झालेल्या जखमा भरून काढता येतात, मात्र मनावर झालेली जखम सहसा भरत नाही.
शरीरावरील जखमा भरल्या तरी वळ मात्र कायम स्मरणात राहतात, त्या घटनेने, त्या क्षणाचे.
मनाचंही तसंच आहे, मनावरील जखमांच्या खपल्या निघत राहतात, आणि नव्याने रक्तबंबाल होतं राहतं, व्याकुळ होऊन ढसाढसा रडतं मन माझं. अन पुन्हा आठवांचे वादळ घोगावते, त्या घटनेचे त्या क्षणाचे...

©अजय घाणेकर ✒️ #Woman
loader
Home
Explore
Events
Notification
Profile