Nojoto: Largest Storytelling Platform
eshwari3854
  • 18Stories
  • 15Followers
  • 473Love
    1.8KViews

Eshwari

  • Popular
  • Latest
  • Video
2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

New Year 2024-25 आपली माणसं 

आपली माणसं आपल्यावर जीवापाड प्रेम करतात,काळजी करतात, संकटात आपल्या सोबत कायम असतात,दुःखी झालो की धीर देतात, रागवलो की आपली समजजुत काढतात, कायम चांगले मार्गदर्शन करत असतात, जीवनात नवीन वाटा दाखवत असतात अशा माणसांशी  "आपलं नातं" हे 
आरशासारखे  पारदर्शक असायला हवं ना?
मग आपल्या अशा  सुंदर माणसांना जपा आणि सर्वात महत्वाचे त्यांच्याशी कधीच खोटे बोलू नका खोटे वागू नका... जर असं करत असाल तर 'ती' त्यांची नाही 
तुमची स्वतः ची फसवणूक असेल....

                      ईश्वरी

©Eshwari #वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...

#वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुंदर सल्ला...

2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

White प्राण गेल्यावरही "नेत्र" चार तास जिवंत असतात
 या चार तासात आपल्या माणसांची वागणूक पाहून 
प्राणशून्य  देहाला "मरण" म्हणजे 
खुप  मोठं गिफ्ट वाटत असेल.....

            ईश्वरी

©Eshwari #मरण एक आनंद

#मरण एक आनंद

2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

Unsplash "झुकेगा नहीं साला"...
खूप फेमस झालंय ना!!!

पण 

आपल्या माणसांना आनंद मिळावा त्यासाठी झुकावं लागलं तर!!!!

खरंच झुकावं.... 

त्यात हार नाही जीत आहे.....

भरभरून फळे देणारी झाडे नम्रपणे झुकून हसत उभी... 
दुसऱ्यांना मधुर फळ देण्याचा आनंद
वाटून आंनदी उभी.....

                            ईश्वरी

©Eshwari # निःस्वार्थ

# निःस्वार्थ #Quotes

2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

White प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत 
या भीतीने प्रश्न न ऐकताच 
काही माणसे  निघून जातात... 
नंतर समजते 
प्रश्न तर खुपच सोपे होते.
पण तेव्हा खुपच उशीर झालेला असतो...

                            ईश्वरी

©Eshwari #भीती
2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

Unsplash नातं जपण्यासाठी दोन्ही कढून सारखेच प्रयत्न झाले पाहिजेत 
एक समजावत राहतो पण दुसरा मात्र बुद्धीची आणि मनाची दारं बंद करून ठेवतो... अशाने नाती फुलतील  का?

©Eshwari #lovelife
2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

White आयुष्यात कितीही यश, पैसा, आनंद, सुख मिळवलं पण या सर्वांच्या बेरीज वजाबाकीतून हातचा उरला "एक समाधानाचा" नसेल तर जे काही 'मिळवलं' ते सारे व्यर्थ आहे .....

                      ईश्वरी

©Eshwari #समाधान
2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

अतीव सज्जनपणाची भीती वाटते.
अतीव गोड बोलणारे फसवे निघू शकतात... 
रबडीमध्ये गुलाबजाम टाकून खाणाऱ्यापासून 
सावध असायला हवं....

                       ईश्वरी

©Eshwari # अतिरेक म्हणजे विष

# अतिरेक म्हणजे विष #Quotes

2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

White जगाच्या या प्रचंड गर्दीत 
जेंव्हा एकटं वाटायला लागतं ना!
मनातील असंख्य विचारांच्या गर्दीत 
जेंव्हा शांतता मिळत नाही ना!
तेव्हा काय करावं खरंच कळत नाही.
सतत मन काहीतरी शोधत असते..

तेव्हा 

स्वतः वर प्रेम करावं 
भरभरून प्रेम करावं 
स्वतःलाच जपावं 
वेळ द्यावा स्वतःला 
स्वतःशीच वेड्यासारखं बोलावं..

हसावं दिलखुलास मनास समजावत 
ढसाढसा रडावं मन रिकामं करत 
स्वतःला कुरवाळावं अलवार मायेने 
हरवून जावं स्वतःमध्येच समाधान शोधत

 मग द्यावी एक साहसी  थाप 
स्वतः च्याच पाठीवर 
आणि मोठया आवाजात म्हणावं 
खुप ताकद अजूनही या मनगटात..

नशीबवान मीच जणू या जगतात 
म्हणुनी निवडलं मलाच ईश्वराने 
संकटांचा सामना करण्यास 
हे येरागबाळ्याचे काम नव्हे....

अजून जीवन बाकी आहे 
जिंकणार आहे मी 
लढाई अजून बाकी आहे 
विश्वास जिवंत आहे माझा 
ईश्वरी अजून बाकी आहे....

वाईट घडून गेले त्यास कुस्करत 
फुटणार आहे कोंब नव्याने 
रुजणार आहे पालवी हसत 
उंच उंच वाढायचंय 
आभाळ  बघ वाट पाहतंय....

                        ईश्वरी

©Eshwari #Sad_Status
2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

White उंच उंच.... भरारी 



जगाच्या या प्रचंड गर्दीत 
जेंव्हा एकटं वाटायला लागतं ना 
मनाच्या असंख्य विचारांच्या गर्दीत 
जेंव्हा शांतता मिळत नाही ना 
तेव्हा काय करावं खरंच कळतं नाही...

तेव्हा 

स्वतःवर प्रेम करावं 
भरभरून प्रेम करावं 
स्वतःलाच जपावं 
वेळ द्यावा  स्वतःला 
स्वतःशीच वेड्या सारखं बोलावं...

हसावं  दिलखुलास  मनास समजावत 
ढसाढसा रडावं मन रिकामं करत  करत 
स्वतःला कुरळावं अलवार मायेने 
हरवून जावं स्वतःमधेच समाधान शोधत..

मग द्यावी एक साहसी थाप 
स्वतःच्या च पाठीवर 
आणि मोठ्या आवाजात म्हणावं 
खुप ताकद अजूनही या मनगटात...

नशीबवान मीच जणू या जगतात 
मलाच निवडलं ईश्वराने 
संकटाचा सामना करण्यास 
इथं येरागबाळ्याचे काम नव्हे...

अजुन लढाई बाकी आहे 
जिंकणार आहे मीच कारण विश्वास 
अजुन बाकी आहे...... 

जे वाईट घडून गेले त्यास कुस्ककरत 
नव्याने रुजू , नव्याने रोपटं होऊ 
उंच उंच  वाढायचं  आहे ना!!!
आभाळ आतुरतेने वाट पाहतंय....

                                       ईश्वरी 

        
                                





                              ईश्वरी

©Eshwari #GoodMorning
2e5e359c4fd906bc91b239bbbbefe9d1

Eshwari

White खरंच तु जवळ होतीस ना!!
तेव्हा मनातील 'भावना' 
कागदावर सांडत होत्या... 

माझी सखी तू 
माझी "कविता" तू 
पुन्हा येशील ना  
माझ्या लिखाणात...

गरज आहे तुझी मला 
कारण या संपुर्ण जगात 
तुझ्यापेक्षा चांगली मैत्रीण नाही 
मला सावरायला
सुख दुःख माझं 
बिन्दास्त सांगायला.....

आनंदी मी गं तुझ्या असण्याने 
बोलते मी माझ्याशीच 
भेटते स्वतःलाच पुन्हा नव्याने...

                            ईश्वरी

©Eshwari #good_night
loader
Home
Explore
Events
Notification
Profile