Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5849390258
  • 59Stories
  • 199Followers
  • 366Love
    138Views

Vaibhav Maid

✍️ वैभव उर्फ अनुभव

  • Popular
  • Latest
  • Video
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

चित्रफिती त्या बोलू लागल्या 
मग मशाली पेटू लागल्या,
घडताना अपराध अघोरी
का नाही घडले बंड..?
विवस्त्र करूनी त्या मातांना 
कशी काढली‌ धिंड?

धार गेल्या कायद्यांनी 
लढावे कुठवर न्यायासाठी,
ठेचूनी मारा चौकात त्यांना 
बांधूनी घाला साखळदंड..
विवस्त्र करूनी त्या मातांना 
कशी काढली‌ धिंड?

..✍️ वैभवकुमार (अनुभव)
२५ जुलै २०२३

©Vaibhav Maid निषेध मणिपूर घटनेचा

निषेध मणिपूर घटनेचा #मराठीकविता

3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

प्रकरण चिघळले वाद पेटला
संदर्भ ना कोणी मैत्री घेतला
पुढा-याने एका फोन केला 
क्षणार्धात रंग धर्माचा चढला
तुम्ही भिडा बिंधास्त मी आहे
निक्षून सांगे दोन्हीही बाजूला
सांगा घोटाळा कुठे झाला?

दंगल घडली अन् घरे पेटली
बिनडोक जनांची डोकी फुटली 
प्राणांस मुकले सदा नी जाफर
क्षणात दरी दोन धर्मात वाढली
खेळ विषारी राजकारणाचा 
निवडणूक पुढारी जिंकून गेला
सांगा घोटाळा कुठे झाला?
..
..✍️ वैभवकुमार (अनुभव)
दि.२५/०३/२०२३

©Vaibhav Maid
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

प्रकरण चिघळले वाद पेटला
संदर्भ ना कोणी मैत्री घेतला
पुढा-याने एका फोन केला 
क्षणार्धात रंग धर्माचा चढला
तुम्ही भिडा बिंधास्त मी आहे
निक्षून सांगे दोन्हीही बाजूला
सांगा घोटाळा कुठे झाला?

दंगल घडली अन् घरे पेटली
बिनडोक जनांची डोकी फुटली 
प्राणांस मुकले सदा नी जाफर
क्षणात दरी दोन धर्मात वाढली
खेळ विषारी राजकारणाचा 
निवडणूक पुढारी जिंकून गेला
सांगा घोटाळा कुठे झाला?
..
..✍️ वैभवकुमार (अनुभव)
दि.२५/०३/२०२३

©Vaibhav Maid
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

Night quotes सांगा घोटाळा कुठे झाला?

चंद्र चांदणी पाशी आला
मग हर्ष जाफरला झाला,
आनंद झाला सदानंदालाही
हसुनी जाफरला गळे भेटला
मनी कुठला ना दंभ धरिला
रमजान त्यांनी संगे पाहिला
सांगा घोटाळा कुठे झाला?

धावत आला रक्षक धर्माचा
जाऊनी भिडला सदानंदाला
तिकडे जाफरही पूर्ता भ्याला
घरीच घेरला ढोंग्यांनी त्याला
समझोता मात्र काही घडेना
गिरवू लागला जो-तो धर्माला
सांगा घोटाळा कुठे झाला?

.
.

©Vaibhav Maid
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

गुरू माझे स्वामी,
त्यांचा केवढा आधार,
सुखावुनी मन,
दिला जिवना आकार..

संकटात म्हणे,
भिऊ नको आहे पाठी,
कृपा माझी सारी,
माझ्या प्रिय भक्तांसाठी..

पौर्णिमा गुरूची,
आज जणू ही दिवाळी,
ओवाळीण जीव,
स्वामी गाईन भूपाळी..
..✍️वैभवकुमार (अनुभव)
दि.१३/०७/२०२२
मो.९०२१२९११५६

©Vaibhav Maid
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

अवकाशाचा निळा रंग
काळ्या धरणीरंगी मिसळला,
गावोगावीचा भक्ती रंग
सावळ्या विठुरंगी उसळला
हिरवाईचा देखणा साज 
सा-या धरतीने घेतला 
आषाढीचा उत्सव आज 
माझ्या पंढरीत सजला..
..✍️वैभव कुमार मैड (अनुभव)
१०/०७/२०२२

©Vaibhav Maid
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

कृतज्ञता

उदर बीजाचे दुभंगोनी,
अंकुर डोकावीतसे..
उभा वृद्ध वृक्ष सामोरी,
तृप्त तृप्त होतसे..

पिढी जन्म घेई नवा,
समाधान हे‌ उरी‌ असे..
पाना फुलांतून वा-यासवे
जणू धुंद तो डोलतसे..

पाहूनी सोहळा कृतज्ञतेचा,
भास्करही मग मंद भासे..
या धरणीचे पांग फेडीले,
कृतज्ञता ही मनी हसे..
कृतज्ञता ही मनी हसे..
..✍️ वैभव कुमार मैड, राजुरकर
(अनुभव)
01/07/2022 @9:06am

©Vaibhav Maid
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

*आम्ही लोकशाहीत जगतो*

मतदान म्हटलं की,
तो लोकसेवक होतो..
सत्ता आली की,
तो सत्ताधारी होतो,
पदावर बसला की,
तो हुकुमशहा होतो,
अन् काय तर म्हणे आम्ही,
लोकशाहीत जगतो..

बसला खुर्चीत की,
तो साहेब होतो,
स्तंभ वगैरे चारही,
तो खिशात घेऊन फिरतो,
तत्व, मूल्ये, प्रतिज्ञा,
तो रोज वेशीला टांगतो..
अन् काय तर म्हणे आम्ही,
लोकशाहीत जगतो..

विकले जातात लोक,
तो रोख विकत घेतो,
तुमच्या आमच्या पैशांचा,
असाच अपव्यय होतो,
जर नाहीच झुकलं कोणी,
तो झुकवून सत्ता भोगतो,
अन् काय तर म्हणे आम्ही,
लोकशाहीत जगतो..

स्वप्न दाखवून तुम्हाला,
तो पूर्ण त्याची करतो,
जनता वगैरे काही नाही,
तो सत्तेचा पुजारी होतो,
अब्रु लुटून लोकशाहीची,
तो राजरोस तिरंगा फडकवतो,
अन् काय तर म्हणे आम्ही,
लोकशाहीत जगतो..

सुशिक्षित झालो आपण,
तो तरी आपली ठासतो,
अंगठे बहाद्दर असून,
तो सर्वोच्च स्थानी बसतो,
कमी मतदान टक्क्यामुळे,
तो परत निवडून येतो..
अन् काय तर म्हणे आम्ही,
लोकशाहीत जगतो..
..✍️वैभव कुमार मैड (अनुभव)
३०/०६/२०२२

©Vaibhav Maid #Seating
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

क्षितिजावरी विसावला
तप्त साहित्याचा गोळा..
नियतीने अवचित केला
जप्त कवित्वाचा गळा..

कलमही पुसती आम्हा
आली कसली ही अवकळा..
जखम जुलमी जाहली
डोळा रक्त सांडे भळभळा..

तरूण त्र्याहात्तरी हा खमक्या
भासे वय जणू हे सोळा..
शब्दांची मोरपिसे ठेवूनी
उडाला उंच उंच आभाळा..
उडाला उंच उंच आभाळा..
..✍️ वैभव दि. ११/०८/२०२०
प्रिय आण्णा मामांस शब्द श्रद्धांजली✍️✍️💐💐😔 #flyhigh
3237d450ec7444305f68eb422ff45770

Vaibhav Maid

गुरु🙏

गुरु संस्कार सागर
गुरु मायेचा पाझर..
गुरु स्थैर्याचं रे घर
गुरु साक्षात ईश्वर..

गुरु दु:खात आधार
गुरु दुधात साखर..
गुरु शिकवी आदर
गुरु मिटवी अंधार..

गुरु वाणी रे मधुर
गुरु प्रेमाचा पांघर..
गुरुविण नाही पार
गुरु जिवनाचा सार..
..✍️वैभव (अनुभव)
   ०५/०७/२०२0 #Beauty
loader
Home
Explore
Events
Notification
Profile