Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1488796585
  • 30Stories
  • 5Followers
  • 357Love
    15.0KViews

कवी.शंकर सुतार 🙏🕉

कवी.शंकर सुतार🙏

  • Popular
  • Latest
  • Video
32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

१४८] शब्द चारोळी पुष्प
विषयः प्रादुर्भाव 

महाराष्ट्रात सतत वाढतोय
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव, 
काळजी घेऊया आपण सर्व 
आजाराला बळी पडू नका राव.

कवी शंकर सुतार, 
वरवडे, सोलापूर. ✍🌹

©कवी.शंकर सुतार 🙏🕉

32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

कविता ✒

पाण्याचे महत्त्व 💧💧

पाण्याचे महत्त्व आहे
खुपच सर्वांसाठी महान, 
पाणी हेच आपले जीवन
सर्वाना लागते तहान.

शेतीला उपयुक्त पाणी
शेतकरी महत्व जाणतो,
पाण्यावर अवलंबून शेती
शेतात पिक सदा आणतो.

झाडांना,वनस्पतींना 
पाण्याची गरज भासते,
झाडे सावली सर्वां देऊन
आराम देत सतत असते.

प्राणी,पक्षी यांचे जीवन
पाण्यावर जगत असते, 
म्हणून पाणी कधीच
व्यर्थ सांडायचे नसते.

एक एक पाण्याचा थेंब
जीवनात महत्त्वाचा राहणार,
पाणी जपून वापरले तर
कमतरता नाही भासणार.

भविष्याची जाण ठेवून 
आपण पाणी वाचवुया,
पाण्याचे महत्त्व शब्दात 
सर्वांना पटवून दाखवूया.

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 पाणी सोच जीवन

पाणी सोच जीवन

32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

*********************
🇮🇳शब्द चारोळी पुष्प 🇮🇳
*७९] राज्यघटना* 
*********************
लोकशाहीच्या नव्या पर्वाची
संविधानाने सुरुवात झाली, 
२६ जानेवारी १९५० रोजी
राज्यघटना अंमलात आली.
*********************
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎊🌹🙏
जय हिंद 🇮🇳🙏
*********************
©️शंकर सुतार, 
वरवडे,सोलापूर.✍🇮🇳🇮🇳🙏
**********************

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 #RepublicDay
32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

*प्रेम कविता*✍
 [हात तुझा हाती असावा*]
*************************
सप्तपदी वचनात जसा 
हात तुझा हाती असावा,
एकमेका सोबत राहुन
जीवनातुनी प्रेमरंग पहावा.

सहवास मिळावा प्रेमात
पदोपदी जीवनात सदा,
कधीच दुर न व्हावे प्रेम 
जपलेल्या वचनात कदा.

दिलासा मनातुनी राहे
मनात रूजलेला साद,
गुलाबी सुंदर पाकळ्या 
हवेला सुगंधाचा नाद.

नयन मी झाकताना
चेहरा तुझाच दिसावा,
नको दुरावा प्रेमळ मना
हात तुझा हाती असावा.

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 #Love
32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

***********************
*🌹शब्द चारोळी पुष्प🌹*
*५५] विषय- एकजुटीने लढा*
***********************
दोन हजार वीस हे सरते वर्ष 
कसोटीचे प्रत्येकांनी अनुभवले,
अनेक संकटांना सामोरे जावून 
एकजुटीने लढा देण्यास शिकवले.
***********************

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 #2021

2021

32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

**********************
🌹सुप्रभात 🌹
शब्द चारोळी पुष्प
५४] विषय:- शेवट 
**********************
सरत्या वर्षाचा शेवट
आज आपण करूया,
नवीन वर्षात प्रेमाने ही
सर्व नातीगोती जपूया.
**********************
कवी.शंकर सुतार,✍
वरवडे,सोलापूर.
३१/१२/२०२०.
**********************

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 #bye2020
32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

🌹 *प्रेम कविता*🌹
*सरत्या वर्षातील प्रेमाची माणसं*✍
***************************
सरत्या वर्षातील प्रेमाची माणसं
मला मायेने वाटेत भेटत राहिली,
कधी प्रेमाच्या दोन शब्दांनी मज
प्रोत्साहन करूनी मनांनी पाहिली.

प्रेमाची जागा प्रेमळ मनातुन जपत
मायेची माणसं कधी विसरणार नाही,
मनापासून जपतो माणूसकीची साथ
सरत्या वर्षांचे दिवस आठवणीत राही.

एका विषाणूने जाणीव मनास देऊन
सरत्या वर्षात दिवस खुपच मागे गेले,
प्रेमाची,मायेची,मैत्रीची माणसं माझी 
माझ्या बालपणीच्या आठवणीत रमले.

अशा मला भेटलेल्या प्रेमळ माणसांना 
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!, 
मला आपले असेच प्रेम मिळत राहो
मनापासून सर्वांना ह्याच सदिच्छा!.
****************************
कवी.शंकर सुतार ,✍
वरवडे, जिल्हा.सोलापूर.

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 #bye2020
32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

रंग तुझ्या प्रेमाचा (प्रेम कविता)

#mohabbatein

रंग तुझ्या प्रेमाचा (प्रेम कविता) #mohabbatein

32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

प्रेम कविता 

#sitarmusic

प्रेम कविता #sitarmusic

32a1688ce1d0ecaf31de316892758043

कवी.शंकर सुतार 🙏🕉

****************************
   *रचियता साहित्य मंच,नागपूर आयोजित*
     *एक चारोळी उपक्रम*
**************************
 *विषय -पद*

कोणतंही मिळालेलं पद हे 
कष्टातुन उभारलेले असतं,
समोरच्या व्यक्तीला कधीच 
कमी पण समजायचं नसतं.

*-शंकर सुतार,*
*वरवडे,सोलापूर.*
****************************

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 #worldpostday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile