Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9033977227
  • 6Stories
  • 24Followers
  • 23Love
    13Views

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

  • Popular
  • Latest
  • Video
3cdd63d8e38dd1356351fc041cddd702

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

ठेच आज मनाला लागली आहे 
तो सूर्यही मला पाहता जळतं आहे 
आयुष्याच्या नेमक्या कठीण वळणार 
आज तू ही असा लांब लांब जात आहे 

मनाचा टाहो तुझ्या खोल पाण्यात फोडत आहे 
तो सूर्यही मला माझ्या आसवांना सुखवत आहे 
दुःखाच्या या कठीण परिस्थितीत 
आज ते पाणी ही लांब लांब जात आहे 

आयुष्याच्या ह्या खोल समुद्रात मी वाहत आहे 
तो सूर्यही माझ्या स्वप्नांना पाण्यात जाळत आहे 
साथ अशी अर्ध्यावर सोडत 
आज ते स्वप्नं ही माझ्या सोबत पाण्यात वाहत आहे 

एकांतात तुला पाहता मी बुध्द आठवत आहे
मनाला शांत करत मी तुलाच त्यात पाहत आहे 
मेहनतीच्या कठीण काळात 
आज तो आधारही लांब लांब जात आहे 
उद्याच स्वप्नं या गडूळ पाण्यात वाहत आहे
              - दिपक बैसाणे....!

4 Love

3cdd63d8e38dd1356351fc041cddd702

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

एकाकी मी.....
वाटतं बोलत रहावं सतत तुझ्याशी 
विखरलेले हें नातं जोडाव तुझ्याशी 
भांडताना जाब विचारावं तुझ्याशी 
तुझ्यासोबत लढत राहावें उंच उंच संकटाशी 
सुखं दुःखच्या सोबत नेहमीच आसवे एकमेकांशी
पण आता टाळतेस असे की, 
शब्दांना माझ्या टाळतेस मनाशी 
आठवणींना माझ्या टाळतेस स्वतःशी 
प्रिय माझ्या भावनांना दोषी ठरवतेस स्वतःशी
माझ्या आठवणींना बांध आता तू असा घातला की, 
मण झाले माझे एकाकी
उरलो मी माझा एकाकी
संपले माझे सारेच काही पडलो मी आता एकाकी...! एकाकी मी....

एकाकी मी....

2 Love

3cdd63d8e38dd1356351fc041cddd702

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

 तुला आनंदात पाहणं माझं प्रेम आहे 
तुला हासताना पाहणं माझं स्वप्न आहे
तुला प्रेम देणं माझं कर्तव्य आहे 
तुला सुखात ठेवणं माझं स्वप्नं आहे

तुला आनंदात पाहणं माझं प्रेम आहे तुला हासताना पाहणं माझं स्वप्न आहे तुला प्रेम देणं माझं कर्तव्य आहे तुला सुखात ठेवणं माझं स्वप्नं आहे #nojotophoto

5 Love

3cdd63d8e38dd1356351fc041cddd702

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

जातीय माणूस... 

सगळीकडे महापुराने त्रस्त असतांना 
कोणी राजकारण करतंय तर
कोणी समाजकारण करतंय 
कोणी प्रचारयात्रा काढतंय तर 
कोणी पक्षांतर करतंय 
अरे जातीय माणसा सांग ना 
हिच का तूझी जात आणि हाच का तुझा धर्म दिसला....

कोणी अन्न देऊ लागल तर,
कोणी पाणी देऊ लागल 
कोणी सहारा देऊ लागला तर,
कोणी आसरा देऊ लागला
अरे जातीय माणसा सांग ना
इथे कोणती जात आणि कोणता धर्म दिसला....

प्राणी पक्षी बुडून मेली 
माणसं ही महापुराने बुडून मेली
घर ही पडून उभा संसार उध्वस्त झाला 
चोर ही चोरी करून बिनधास्त झाला
अरे जातीय माणसा सांग ना 
इथे कोणती जात आणि कोणता धर्म दिसला..... 

तुझं मंदिर ही पाण्यांत गेल,
तुझं मस्जिद ही पाण्यात गेल 
तुझा देव ही पाण्यात बुडला, 
तुझा अल्लाह ही पाण्यात बुडला
अरे जातीय माणसा सांगा ना 
इथे कोणती जात आणि कोणता धर्म दिसला....

3 Love

3cdd63d8e38dd1356351fc041cddd702

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

माझा मी कुठं आहे....?

माझा मी कुठं आहे....? #poem

40 Views

3cdd63d8e38dd1356351fc041cddd702

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

ठेच आज मनाला लागली आहे 
तो सूर्यही मला पाहता जळतं आहे 
आयुष्याच्या नेमक्या कठीण वळणार 
आज तू ही असा लांब लांब जात आहे 

मनाचा टाहो तुझ्या खोल पाण्यात फोडत आहे 
तो सूर्यही मला माझ्या आसवांना सुखवत आहे 
दुःखाच्या या कठीण परिस्थितीत 
आज ते पाणी ही लांब लांब जात आहे 

आयुष्याच्या ह्या खोल समुद्रात मी वाहत आहे 
तो सूर्यही माझ्या स्वप्नांना पाण्यात जाळत आहे 
साथ अशी अर्ध्यावर सोडत 
आज ते स्वप्नं ही माझ्या सोबत पाण्यात वाहत आहे 

एकांतात तुला पाहता मी बुध्द आठवत आहे
मनाला शांत करत मी तुलाच त्यात पाहत आहे 
मेहनतीच्या कठीण काळात 
आज तो आधारही लांब लांब जात आहे 
उद्याच स्वप्नं मी य़ा गडूळ पाण्यात शोधत आहे

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile