Nojoto: Largest Storytelling Platform
surajubale2098
  • 5Stories
  • 36Followers
  • 38Love
    4.0KViews

Suraj Ubale

  • Popular
  • Latest
  • Video
3fd1c08dd7027bd8a9c75677fe886a5b

Suraj Ubale

कर्मयोग

नितांत सुंदर कर्मयोग हा 
जरी अचानक जीवनी आला
श्री गुरूंचे तव चरण स्पर्शूनी 
सूर्योदय नव जीवनी झाला

घेऊनी गांडीव स्वयंशिस्तीचे
गुरू विनय महारथी आरूढ झाले
पुढ्यात ययाती होऊन सारथी
शाश्वत मग हे समीकरण आले

प्रथम क्रियेअंती गुरुदेवांना आम्ही
क्षुब्ध कल्प हे समर्पित केले
आत्मपरीक्षण करोनि नंतर
युवाचार्य तत्पर झाले

सात दिसांची साथ संगत
समृद्ध हे आयुष्य झाले
युवाचार्य हे पवन प्रवाही
दीक्षा दिनी धावून आले

कवी मन माझे कवण सांगते
नदी प्रवाही जसा लव्हाळा
भरत दिव्य तो प्रेम जिव्हाळा
म्हणून सारा..
स्तुत्य तो उपक्रम झाला
नितांत सुंदर कर्मयोग हा
म्हणूनी असा जीवनी आला

-सुरज उबाळे dedicated to art of living family(yltp)

dedicated to art of living family(yltp) #poem

0 Love

3fd1c08dd7027bd8a9c75677fe886a5b

Suraj Ubale

#प्रेयसी
3fd1c08dd7027bd8a9c75677fe886a5b

Suraj Ubale

प्रेयसी

कशी वर्णावी कांति तव
जणू आकाशी चंद्र नवा
चंद्रकांति तुझिया पाहुनी
मनी शितले झरा वहावा

मंजुळ वाणी तुझिया सखये
कोकिळेने जव स्वरसाज गावा
वाणी तुझिया ऐकुनी सत्वर
तणावात ही विरंगुळा व्हावा

हास्य तुझे ते खुलिनी येता
हर्ष सागरी डुबूनी जावा
तुझ्या सोबती घरोघरी मग 
सणासुदीचा श्रावण यावा

नितळ निरागस नयन लाघवी
मोगरा अंगणी फुलून जावा
दृष्टी तव पडता मजवर
मनमयूर मग प्रफुल्लित व्हावा

म्हणूनी सये,
तुझ्या आठवणींचा साज मजवरी 
निरंतर तो खुलत रहावा

_सुरज उबाळे

5 Love

3fd1c08dd7027bd8a9c75677fe886a5b

Suraj Ubale

50 Views

3fd1c08dd7027bd8a9c75677fe886a5b

Suraj Ubale

प्रेयसी

कशी वर्णावी कांति तव
जणू आकाशी चंद्र नवा
चंद्रकांति तुझिया पाहुनी
मनी शितले झरा वहावा

मंजुळ वाणी तुझिया सखये
कोकिळेने जव स्वरसाज गावा
वाणी तुझिया ऐकुनी सत्वर
तणावात ही विरंगुळा व्हावा

हास्य तुझे ते खुलिनी येता
हर्ष सागरी डुबूनी जावा
तुझ्या सोबती घरोघरी मग 
सणासुदीचा श्रावण यावा

नितळ निरागस नयन लाघवी
मोगरा अंगणी फुलून जावा
दृष्टी तव पडता मजवर
मनमयूर मग प्रफुल्लित व्हावा

म्हणूनी सये,
तुझ्या आठवणींचा साज मजवरी 
निरंतर तो खुलत रहावा

_सुरज उबाळे #प्रेयसी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile