Nojoto: Largest Storytelling Platform
pranitakhambe3128
  • 12Stories
  • 37Followers
  • 83Love
    95.5KViews

Pranita Khambe

  • Popular
  • Latest
  • Video
3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

शब्दांचे तरंग सारे 
भाव मनीचे जाणतात
शब्दांच्या नगरीत शब्द
शब्दास खेळवतात.....
शब्दाला शब्द भिडले की 
शब्द ही रक्ताळतात
शब्दांनी शब्दाला जपले
की शब्द ही आधार देतात
गुंफण करण्या नात्यांची 
शब्द विणले जातात
शब्दांच्या नगरीत शब्द
शब्दास खेळवतात.....
शब्द असतो दिलेला 
तो विश्वास बनून जातो
शब्द असतो लागलेला तो 
घाव बनून वाहतो
तलवारीच्या धारेने हे
शब्द शब्दास छेदतात
शब्दांच्या नगरीत शब्द 
शब्दास खेळवतात.....

©Pranita Khambe #Drops

11 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

अंधाऱ्या त्या रात्री
एक मिणमिणता दिवा
रक्ताळलेल्या पावलांना
त्यानेच मार्ग दावला...
ऊन, वारा, पाऊस, 
सारं काही झेलत राहिला
मिणमिणता तो दिवा मात्र
सारी रात्र जळत राहिला....

©Pranita Khambe #lost

8 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

आठवण थांबत नाही, कोणी थांबविल्याने 
मन ऐकत नाही, कोणी समजावल्याने
 थांबून जातो श्वास, तुला विसरण्याने
 म्हणूनच तुला आठवते, प्रत्येक श्वासाने....



-प्रणिता खांबे #alone

5 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा हळवा क्षण...

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा हळवा क्षण... #Life_experience

840 Views

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

#lonely

239 Views

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

गर्दीतला माणूस

 दारं खिडक्या लावून 
घरात कोंडून घेतलं
 गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं...
काय म्हणे तो
 एक जीवघेणा वायरस 
अरे त्याच वायरसने 
तुला तुझं घर दाखवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं...
घर जणू तुला 
आज नविनच भासलं
 तुझ्या माणसांशी बोलताना 
तुलाच परकेपण जाणवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
आवडी-निवडी तुझ्या
 पुन्हा उफाळून येताना
चिल्ला-पिल्लांना देखील 
तुझं नवल वाटलं 
गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
कितीतरी वर्षांनी 
तिला जवळून पाहिलं 
क्षिणलेल्या तिच्या चेहऱ्याला
तुलाच वाचता आलं 
एका वायरसने बघ तुला तुझं घर दाखवलं 
गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं....
                  कवयित्री- प्रणिता खांबे गर्दीतला माणूस

गर्दीतला माणूस

4 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

शायरी

शायरी #Shayari

82,165 Views

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

आयुष्य खुप सुंदर आहे.
फक्त तीच्या घरच्यांनी 
होकार दिला पाहीजे😉

5 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

प्रेक्षक होऊन कलेला दाद देणं 
सोप्प असतं.....
कठीण असत ते म्हणजे 
कलाकार होऊन त्या कलेला न्याय    देणं...

6 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

कधीतरी पापण्या ओलावतात
 नकळत डोळ्यातून अश्रू पाझरतात
दाटुन येतो हुंदका कधी कंठी 
ज्यावेळी नात्यांचे बंध भावनाहीन 
होतात.....

                         - प्रणिता खांबे

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile