Nojoto: Largest Storytelling Platform
deepaklandge3689
  • 5Stories
  • 5Followers
  • 55Love
    0Views

Deepak Landge

  • Popular
  • Latest
  • Video
422b2c382f8feb672687756a82608bde

Deepak Landge

लगीनघाई… 
मांडवगर्दी… 
सख्यांच्या गराड्यात तू. 
तरीही ठळक
जसा झावळ्यापल्याडचा चंद्र!! 


मी मात्र 
डोळ्यात पाण्याचे डोह घेऊन, 
तरंगतोय-
सबंध मांडवभर… 
जसा अवकाळी सावळा मेघ!! 


       -ओडिसीयस, करमाळा. 
             ८८८८५४२४६० #WorldEnvironmentDay
422b2c382f8feb672687756a82608bde

Deepak Landge

 सलाईनचं ठिबक सिंचन..
 अंगभर मुरल्यानंतर..
 त्यानं उशाला ठेवलेल्या 
पारले-जी ला हात लावला ..
“फार फार तर दोन तास जगतील”
मगाशीचं डॉक्टरचं बोलणं त्यालाही 
ऐकू आलं होतं..ते आठवलं अन् ..
घेतलेला पारले-जी
पुन्हा खाली ठेवला..
पाय चेपत तिनं ते पाहिलं अन् खळाळत्या 
अश्रूं सोबत ती उठली ..
त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली
“भूक लागलीय का तुम्हाला?”
तो हसला.
ती रडायला लागली.
“ही खाट सोडवत नाही गं..
दीड वर्षांपासून माझ्या मुताच्या पिशवीचा 
गळफास तिनं लटकवून घेतलाय स्वतः भोवती.
अन् ..हा उग्र दर्प सुगंधी दरवळ मानून मुकाट पडून 
राहिलीय ही माझ्यासोबत..!

“ही खाट आनंदी आहे हो ….”ती म्हणाली.

तो कसनुसं हसला.

तू चाणाक्ष आहेस..लगेच उमजतं तुला.
पण खाट म्हणजे तू नाहीस बरं का…

“हो..माहीत आहे.
मी तुमचा श्वास आहे.
कितीदा म्हणाल ?

अन् त्याचा श्वास थांबला.
कायमसाठी.

  -  ओडिसीयस
   ८८८८५४२४६० #Heartbeat
422b2c382f8feb672687756a82608bde

Deepak Landge


वृत्त-मनोरमा 
गालगागा गालगागा 

      •गझल•

खूप आले,बोलणारे?
भाव माझा,तोलणारे! 

वादळाला, हेच सांगे
पीक माझे, डोलणारे! 

हातपाय, तोडणारे.. 
नीतिमत्ता,कोलणारे

शंभुराजा,भीत होते..
चामडीला, सोलणारे! 

शोध घेता,संपला की
आमचा,भूगोल ना रे? 

'दीपका'आहेत का रे? 
झोपडीला खोलणारे !!


       -ओडिसीयस
       ८८८८५४२४६०
२५/५/२०२० रात्री ११:३६

 #माझीगझल
422b2c382f8feb672687756a82608bde

Deepak Landge

रात लुटावया निघाली, स्वप्नांची टोळी
तिला वाचविण्या पसरली, चंद्राने झोळी

मरणा आधी घुटमळला तो आभाळासाठी
घेतला सलाम! निघाल्या बगळ्यांच्या ओळी 

मिटवून आज टाका,बांधावरले भांडण 
परतुनी रे! येत नाही, सुटलेली गोळी 

विणले ज्याच्यासाठी तो खुबीने निसटला
जाळे फितूर झाले अन अडकविला कोळी

उचलताना झाल्या त्या, किती यातना सांगु
कोठेवाडीत मिळाली...तुटलेली चोळी

डोळ्यांची चूल केली, अन् व्यथेचे पीठ
माझ्याच तव्यावर कुणी भाजली ही पोळी

मी काळा नि कुरुप आहे, लोक जर म्हणती
मग का नजर काढते? आई माझी भोळी

सासू फक्त म्हणाली, 'वाघिण' त्या सुनेला
हलकीच होत गेली, डोईवरील मोळी

मानु नका खरे, माझ्या या अशा रूपाला
'दीपक' वरचे हसतो, आतून फक्त होळी

                     -ओडिसीयस
                   8888542460 #feather
422b2c382f8feb672687756a82608bde

Deepak Landge

पावसाची छप्पराला, कळावी कविता
डोळ्यातून उशीवरती गळावी कविता

बंद व्हावे आता,निरोपाचे येणे जाणे
सांजवेळी दूर देशी ढळावी कविता

तु दिलेला चकवा,मी पावलांना बांधला
का?तुझ्या घराकडे मग वळावी कविता

दिला काळजावर,मी वेदनेचा मुलामा
नि आता पुन्हा नव्याने, छळावी?कविता

सुटका कशी करावी? मी धावतो कधीचा
धमन्यातले रक्त होऊन, पळावी?कविता

नाहीच मोल कळले,जर माझ्या वारसांना
सरणात सोबतीला मग जळावी कविता..



        ✒ ओडिसीयस.
           ८८८८५४२४६० #rain
#मनातील


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile