Nojoto: Largest Storytelling Platform
manudh3313941295398
  • 54Stories
  • 53Followers
  • 452Love
    0Views

shivani dhote.

#Thetruepoeticsoul... feelings, love and write..

  • Popular
  • Latest
  • Video
4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

प्रसाद म्हणुन देवाचा...
प्रत्येक क्षणी मी तुला जपले.
प्रवासात ह्या आयुष्याच्या..
शब्दरुपांमध्ये मी तुला गुंफले.

तु सुर माझ्या मनातले..
तुझ्या तालात मी रंगले.
प्रत्येक ओळींत तुझ्या,
मी शब्द सौंदर्यात गुंफले.

देवरूपी पुजा आहेस तु माझी..
तुला मी जिवापाड जपले.
ज्ञानाच्या सागर आहेस तु..
तुझ्या चरणी अवघे..
आयुष्य माझे मी वाहीले.

©shivani dhote.

4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

लिहीतांना मी तुला..💖

लिहीतांना मी तुला..
विसरून भान जाते..
कळतच नाही रे सख्या..
वेळ कशी ही निघून जाते.

उन स्पर्ष करताच मला...
तुझी सावली मला सावरून घेते.
तुझ्या मिठीत असताना...
तुझ्या स्पर्षाच्या रंगात मी रंगुन जाते.

नवखीशी ही ओढ वेडी...
सारं काही विसरायला भाग पाडुन जाते.
लिहीतांना मी तुला...
स्व:तला विसरुन जाते.

तुझ्यातच हरपुन मी..
तुझीच होऊन जाते.
लिहीतांना मी तुला
शब्दशः तुला वर्णीत जाते.

©manu dhote. #love
लिहीतांना मी तुला..!

#Love लिहीतांना मी तुला..!

4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

आज मौसम  आज मौसम है सुहाना..
दिल चाहता है किसिकी याद दिलाना..
आज मौसम है सुहाना..!

जैसे उभरते हुए रिश्तों में..
नईसी मिठास घुल जाना.
आसमान से गिरती बारिश में..
यूंही भीग जाना..
सच में आज मौसम है सुहाना..!
 .
किसिके प्यार के रंग में आहिस्ता ढल जाना..
जीने आंस मै एक कदम बढ़ाना..
किसी के लिए दिल में एक अहसास जगाना..
आज मौसम है सुहाना..!

©manu dhote. #AajMausam
4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

"कविता"...💖

शब्दरचना..
विचारांच सखोल समुद्र...
नि त्यातुन उद्यास आलेली काव्यसंग्रहे..‌

@queensof world....

©manu dhote.

4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

स्त्री "ती"...💖

स्त्री लख्ख  प्रकाश "ती" 
संस्कारांची शिदोरी ती.

स्त्री आदिशक्तीच रुपच जणु.
स्त्री अनेक पैलू जपणारी.
आई ती, बहीण ती,
तर कधी मैत्रीण ती.
कधी पत्नी म्हणुन साथ निभावणारी ती.
मुलगी ती, सुन ती.
घरातली लक्ष्मी ती.
आपलं अस्तीत्व जपणारी स्त्री ती.

आपल्या आयुष्याला पुर्णत्व आणाणारी "स्त्री ती"...!

©manu dhote. #womensday2021
4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

साथ देते तुला आज...!
उंच झेप घेण्यासाठी
मिळेल स्वप्नांना बळ अपुल्या
पुर्णत्व आणण्यासाठी.

हजार चुका होतील जरी..,
साथ तुझी सोडणार नाही.
विश्वास देते तुजला आज
अपुलं नातं कधीच तुटु देणार नाही.

शब्दांत कसे रचु मी तुला.
अव्यक्त असे शब्द आहेस  तु माझे
शब्द नि शब्दांतले संवाद अपुले रोजच साझे.

©manu dhote. inspiration.

inspiration.

4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

लग्नगाठ ही.....💞

तुझ्या ह्रदयाशी जुळलेली नाळ ही,
तुला नि मला एकत्र आणणरी लग्नगाठ ही.

तुझ्या माझ्या प्रेमाची,
आपुलकीच्या रेशमी बंधांची
देवा ब्राम्हणाच्या साक्षीने
जुळुन आलेली साथ ही...
तुझ्याशी मला जोडणारी लग्नगाठ ही.

तुझ्या नावाने लावलेल्या हळदीची,
हातावर सजलेल्या मेहंदीची...
सौभाग्याचं लेणं असलेल्या कुंकवाची,
सौभाग्य जपणाऱ्या मंगळसुत्राची
लाभलेली साथ ही....
माझी तुझ्याशी जुळलेली लग्नगाठ ही.

दोन कुटुंबांना जोडणारी..,
एकमेकांना, सुख - दुखा:त साथ देणारी,
सोबत बघीतलेल्या रेशमी स्वप्नांची चांदरात ही..
पवित्र बंधनाने जुळलेली....
तुझी नि माझी लग्नगाठ ही....!

आंबट - गोड  आठवणींची,
थोड्या खट्याळ भांडणांची.....,
"तुझं माझं जमेना, तुझ्या वाचुन करमेना"
ह्या ओळींना सत्यात उतरवणारी....
तुझी - माझी लग्नगाठ ही.

आयुष्यभर एकमेकांना जपत,
निभावून नेणारी....
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर
आपण एकमेकांसाठी खंबीर आहोत
याची जाणीव करून देणारी...,
तुझ्या माझ्या अवीस्मरणीय 
सहजीवनाच्या प्रवासाची लग्नगाठ ही...!

                                                        :- शिवानी दिलीपराव धोटे. लग्नगाठ.....💞

लग्नगाठ.....💞 #poem

4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

तुझे खोने का डर था भी या नहीं.
या फिर तु ईक छलावा सा था।
जो हर बार जिंदगी मे आकर..,
आंखों से ओझल जाता था..!

सच कहूं तो शुक्रगुजार हूं मैं,
उस खुदा कि
जिसने मुझे तेरे पेहलू से दुर करवाकर
जीना सीखा दिया.....!
ईस बेपरवाह जिंदगी से खुश होना सिखा दिया।
 
                                                -thetruepoeticsoul. #leftalone
4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

या  बेधुंद क्षणी तु..,
 शब्दांनी काही बोलावस अस काही नाही.
मिठी सैल करत लाजावस असही काही नाही..

पण निदान ओठांवर ओठ टेकवतांना
एक गोड प्रतिसाद तरी द्यावास एवढंच...!
☺️
                                       - shivani😇 love

love

4753d7ed8428d0bb46dbe6c8e6e9efac

shivani dhote.

पुन्हा तेच स्वप्न आलं.!

शांत झोपेत मग्न होते मी..
मग अचानकच तुझ्याच रुपात 
पुन्हा एकदा ते वादळ आलं.
झोपेतच जखमा द्यायला
पुन्हा तेच स्वप्न आलं.

खोल चालत होते मी
स्वप्नात अंधारलेल्या वाटेवर
नकळत तुझा हात आला 
मदत म्हणुन खांद्यावर.
काहीतरी चुकतंय, असं मला जाणवलं.
झोपेतच जखमा द्यायला 
पुन्हा तेच स्वप्न आलं.

भिती दाटुन आली मनात माझ्या.
तुझ्या एका स्पर्षाने.
तुझं असं समोर येनं, कळत नव्हत का जाणे.
तरीपण तुझ्या मागे चालत राहीले.
तुझ्यावर विश्वास ठेऊन, मनाला समझवत राहीले.
एका क्षणात तु माझ्यासमोर 
प्रेमाचा खेळ मांडला.
मी पण तुला नकळत होकार दिला.
तुझ्या वागण्यातून खुप काही वाईट जाणवलं.
झोपेतच जखमा द्यायला
पुन्हा तेच स्वप्न आलं.

नेमका काय अर्थ.. समझु मी ह्या स्वप्नाचा..
कसा पाठपुरावा करु मी,
मलाच पडलेल्या कोड्याच..!
"सारखं तुझ्याच पडत असलेल्या निरर्थक अस्तीत्वाचा".
                                                                -@thetruepoeticsoul.
                                                            (शिवानी धोटे)

loader
Home
Explore
Events
Notification
Profile