Nojoto: Largest Storytelling Platform
vaishaliyenugwar4984
  • 91Stories
  • 22Followers
  • 1.2KLove
    12.9KViews

Vaishali Yenugwar

  • Popular
  • Latest
  • Video
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

रखरखत्या उन्हात 

बहावा बहरलेला 

पिवळीधम्मक फूले 

चैत्रातही फुललेला.. 


भूंगे घालती पिंगा 

बहाव्याच्या सभोवार 

सोनसळी बहावा 

वृक्ष हा कर्णिकार..


साज श्रृंगाराने नटे 

पाऊलेही थबकती 

टपोरी पिवळी फूले 

सोनेरी क्षणाचे सोबती..

💫✨ वैshali

©Vaishali Yenugwar
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

विजयोत्सव..


सण दसरा पराक्रमाचा

सण दसरा विजयोत्सवाचा

साडेतीन मुहूर्तांपैकी

एक सण महत्त्वाचा..


घेतले रूप चंडीचे

मारण्या महिषासुराला

पुराण काळापासूनच

लढा सुरू रणरागिनिंचा..


असत्यावर सत्याचा

साजरा करण्या विजय

विजयादशमीला दसरा

साजरा आपण करतोय...


काम क्रोध अहंकार लोभ

अवगुणांवर करुन मात

हिंदूंच्या या संस्कृतीचा

मान आज राखूयात..


करुन पूजा शस्त्रांची

अन् पुजा सरस्वतीची

जल्लोषात करु दसरा 

देऊन पाने आपट्याची ..


करुन दहन रावणाचे

वाईट गुण ते त्यजुया

शौर्य विरतेचे प्रतिक घेऊन

विजयोत्सव साजरा करूया..


वैशाली Y ✨💫

©Vaishali Yenugwar
  #happydussehra
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

अखंड फल दायिनी

कौशिकी रूप धारिनी

रुप अष्टम महागौरी

धन ऐश्वर्य प्रदायिनी..


💫✨

©Vaishali Yenugwar
  #navratri
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

सौर मंडल अधिष्ठात्री

स्कंद माता चतुर्भुजाधारी

प्रेम , वात्सल्य दायिनी

मनोकामना पूर्ती करी..

💫✨🌹🙏🌹

©Vaishali Yenugwar
  #navratri
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

अर्ध चंद्र घंटाकृती
दशायुध दशभूजा शोभती
सिंहारुढ चंद्रघंटा देवी
उपासका निर्भय बनविशी..🙏🌹🙏
✨💫

©Vaishali Yenugwar
  #navratri
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

धवल रंग प्रतिक शांततेचा 

देई बोध त्याग , धैर्याचा , 

दाखवी मार्ग प्रकाशाचा 

प्रतिनिधीत्व करी मांगल्याचा..

✨💫

©Vaishali Yenugwar
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

वाचनाने वाढे बुध्दीमत्ता
बने व्यक्ती सर्जनशील
वृंदावती कक्षा ज्ञानाच्या
विचारांची जुळे मैफील...


जगण्यास मिळे प्रेरणा
बने गट्टी वाचनाने पुस्तकांशी
तणावमुक्त जिवनाचे रहस्य 
वाचन गुंतवणूक भविष्याची ..


सौ वैशाली Y

✨💫

©Vaishali Yenugwar
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

ब्रह्मचारिणी रूप दुजे तव
हाती कमंडलू , अक्षमाला
चंद्रमौली शिवपत्नी माते
हे दुर्गे दे वर मजला..

✨💫

©Vaishali Yenugwar
  #navratri
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

हाती त्रिशूल पंकज साजे
अर्ध चंद्र ललाटी विराजे
वृषभारुढ शैलपुत्री देवी
प्रथम रूप नवदुर्गेचे साजे..||

©Vaishali Yenugwar
  #navratri
5350518e870433e18eef217ae2601644

Vaishali Yenugwar

उभारलेला डोंगर मी पणाचा 
नेस्तनाबूत होतो क्षणार्धात 
उरे न काही मृत्यू नंतर त्याचे 
दिसती अर्थी स्मशानात..

माझे माझे करीत ठेवतो 
सारे काही कवटाळून
 दिसते का हो खरे काही 
 काय होते त्याचे मागून..

जिवंतपणी जातो सदा 
स्तुतीने स्वतः च्या भारावून 
आयुष्य सारे तो घालवतो 
उणे दुणे इतरांचे काढून..

परिपूर्णतेचा हंडा जणू
मिळालाय स्वतःला
याच भ्रमात जगतो माणूस
विसरतो आप्त स्वकियाला..

काबूत ठेवून अहंकार
पहा आपण जगून जरा
जिवंत पणीच इतरांप्रती 
कृतार्थ भाव व्यक्त करा...

वैशाली Y 
✨💫

©Vaishali Yenugwar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile