Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6411202478
  • 25Stories
  • 29Followers
  • 178Love
    0Views

प्रदीप खोडदे

एस टी कंडक्टर , शिरूर आगार, पुणे .

  • Popular
  • Latest
  • Video
536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

अती झालं पाऊसा आता 
तुझं गरजेपेक्षा बरसणं 
तुझी तरी काय चुक ?
माणसाणं माणसाशी 
माणसासारखं न वागणं.
     प्रदिप..

536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

अशीच द्यावीस
तु साथ मजला
जोपर्यंत आकाशी
चंद्र सूर्य साक्षीला.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्चना.
536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

 आम्हावरी तुमच्या
आशिर्वादाचे वलय 
असेच राहो जसे
सुर्य चंद्र तारे अक्षय.
    अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

आम्हावरी तुमच्या आशिर्वादाचे वलय असेच राहो जसे सुर्य चंद्र तारे अक्षय. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. #nojotophoto

536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

गझल ..
माझाच मी मला रे ,कळतो अजून आहे .
या जिंदगीत माझ्या ,शिकतो अजून आहे ..
का चक्रव्यूह झाली , ही जिंदगीच माझी .
झेलून शब्दांचे वार सारे , लढतो अजून आहे ..
आले कसे नशीबी ,वाटेत फार धोंडे .
मी चालतो तरीही ,पडतो अजून आहे ..
प्रेमात सोबत्यांचे धोकेच होत गेले .
मी पोळलो तरीही ,फसतो अजून आहे ..
जाऊन बाप माझा , वर्षे अनेक झाली .
त्यांचेच पुण्य पाठी , जगतो अजून आहे ..
मी रोज रोज येथे ,खातो शब्दांचे टोमणे .
सोसून वेदनांना , हसतो अजून आहे ..
कवी.प्रदिप दत्तात्रय खोडदे, पानोली.
536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

संधीचे सोने करणारे
दिनदुबळ्या जनतेचे कैवारी
पक्षापेक्षा माणसांवर प्रेम करणारे
राजकारणापेक्षा समाजकारण करणारे
वन मॅन शो
गालबोट न कुठेही व्यक्तिमहत्वास 
डे टु डे चोवीस तास तिनशे पासष्ट दिवस जनसंपर्क
कर जुळती फक्त ईश्वरचरणी
रणांगणात राजकारणाच्या शत्रुला चारी मुंड्या चित करणारे
अशा व्यक्तिस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शब्द.प्रदिप दत्तात्रय खोडदे,पानोली. अबक

अबक

536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

#RIPRohitSardana लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

बाप ...
आयुष्यात जेव्हा उडुनी जाते 
बाप नावाची उब देणारी चादर 
तेव्हापासून केव्हाचं नाही भेटतं
बापावानीं अथांग मायेचा सागर .
बापं गेल्यावर आईवर पडते 
कुटुंबाची फार मोठी जबाबदारी
मुला बाळांच्या इच्छा आकांक्षा
यातचं मानते ती दुनिया सारी .
बाप नावाची छत्री जेव्हा 
नसते कुणाच्या डोक्यावर 
जाणीव होते तेव्हा बापाची 
संकटे फार मोठी आल्यावर .
कुंकवाचा करंडा हातात घेऊन 
माय जेव्हा ढसाढसा रडते 
असा काय मी केला गुन्हा
म्हणून देवाला न्याय मागते .
हात जोडून देवा तुला 
मागणं मागतो आज 
लहानपणी कुणाच्याही ह्दयातलं
अवकाळी नेऊ नकोस काळीज .

पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.  प्रदिप खोडदे

536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

सुखात आणि दु:खात 
साथ देई माझी लाल परी 
म्हणुनच मला आहे ती 
जीवाहुन अगदींच प्यारी .
जीवनात तिच्यामुळे माझ्या
आली खरी रंगत आणि संगत
कोरोनाच्या संकटातून होऊ दे सुटका 
हिचं देवाकडे माझी दररोज मन्नत .
प्रवाशांच्या सेवेसाठी रोज 
धावते अहोरात्र रस्त्यावरी
म्हणुन तर मायबाप म्हणतात 
चिंता नको डोंट वरी .
आज तिच्या वाढदिवशी 
मागणं मागतो मी देवाला 
असंच सुखी ठेव माझ्या लाल परीला . प्रदीप .

536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

सुखात आणि दु:खात 
साथ देई मला लाल परी 
म्हणुन तर मला आहे ती 
जीवावुनही अगदींच प्यारी .

तिच्यामुळे  जीवनात माझ्या 
आलि खरी रंगत आणि संगत
कोरोनाच्या संकटातून होऊ दे सुटका 
हिच देवाकडे माझी मन्नत .

प्रवाशांच्या सेवेसाठी धावते 
नेहमी अहोरात्र रस्त्यावरी 
म्हणुन तर नातलग म्हणतात 
चिंता नको डोंट वरी .

आज तिच्या वाढदिवशी 
मागणं मागतो मी देवाला
असंच सुखी ठेव सदा 
माझ्या लाल परीला . 

शब्द .प्रदिप दत्तात्रय खोडदे शिरूर आगार ,पुणे.

536dbfd58e0fc459b365673a4dae9fc6

प्रदीप खोडदे

 सुखांत आणि दु:खात साथ 
देते मला माझी लाल परी 
म्हणुन तर मला आहे ती 
जिवावुनही अगदीच प्यारी .

तिच्यामुळे माझ्या जिवनात 
आली रंगत आणि संगत 
कधीही तिला दृष्ट न लागो

सुखांत आणि दु:खात साथ देते मला माझी लाल परी म्हणुन तर मला आहे ती जिवावुनही अगदीच प्यारी . तिच्यामुळे माझ्या जिवनात आली रंगत आणि संगत कधीही तिला दृष्ट न लागो

loader
Home
Explore
Events
Notification
Profile