Nojoto: Largest Storytelling Platform
pravinpawade9140
  • 228Stories
  • 355Followers
  • 2.4KLove
    67.1KViews

Pravin Pawade

शब्द बंधन नसलेले, अव्यक्त भावना, आणि एक छोटंसं हसु

  • Popular
  • Latest
  • Video
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

White तू भी तनहा ...मै भी तनहा...
और पत्तों की सरसराहट ...
बढा रही है तनहाई का आलम...
चलो एक दूसरे का दर्द बाट लेते है....

©Pravin Pawade
  #sad_dp
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

केसांना भांग पाडून
खिशाला रुमाल लावून 
आठवणीचं दफ्तर उघडून 
ओळखीचा चेहरा शोधुया
बाकावरची जागा अडवुया
नव्याने मैत्रीची सुरुवात करुया...

आठवणीच्या वाटेत
आनंदाचे क्षण असतील
गालातल्या गालात हसताना  
तुलाही कविता सुचतील...
शब्दांची जुळवाजुळव करताना..
पहिलीतील बाराखडी आठवेल....
सुखाची अंकगणित मांडताना
शाळा नेहमीच मनात उरेल....

©Pravin Pawade
  School days
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

क्षितिज्याच्या पल्ल्याड 
टिम टिमणारे तारे...
पायघड्या घालीशी तू
मिळविण्यास त्या रे...
तुझ्या हाकेला अशी
साद घालती सारे...
धावत सुटलो मी ही
तुझ्याच भरोशाच्या सहारे...

-प्रविण पावडे

©Pravin Pawade
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

शब्दांच्या शोधात क्षण निसटले.. 
तुझं ऐकायचं तेव्हढे राहून गेले...

एकटं असणं... एकटं पडणं...
एकल कोंडयांच्या पठडीतलं... 
समजायचं तेव्हढे राहून गेले...
शब्दांच्या शोधात क्षण निसटले...

पावसाची सर आठवण जागवते
ओंजळीत काही अश्रु सांडवते 
जपायचं तेव्हढे राहुन गेले...
शब्दांच्या शोधात क्षण निसटले...

ऐकायचं... समजायचं... जपायचं...
याची खातरजमा करून द्यायचं...
तुझं ऐकायचं... तुझ्याशी बोलायचं...
व्यक्त व्हायचं तेव्हढे राहून गेले...
शब्दांच्या शोधात क्षण निसटले...

- प्रविण पावडे

©Pravin Pawade
  #againstthetide
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

शाख से गिर पडे थे पत्ते जमीन पर... 
उठा लिए उन मे से जो लग रहे थे अपने... 
सोचा था की कुछ में रंग भर दूं और किसी से उधार की मेहेक ले लू... 
आंगण मे बैठे बैठे उन सभी को देख रहा था... 
तभी हवा का रुख बदला और साथ में सबको ले उडा... बहोत रोया अंदर ही अंदर... 
मेरे साथ ही क्यूं... 
बेहते आसूंओं के साथ सोचे हूए खयाल भी छूट गए...  
फ़िर से नई राह पर मिले कई सारे पत्ते ... 
फ़िर से साथ ले आया और लगा सजाने..
 फ़िर से हवा का रुख बदला...
 साथ में लेकर सभी को उड़ चला... मै बस जाते हूए उन को देखता ही रेह गया... अब पत्ते उठाता नही...किसी को मूडकर देखता भी नही... अकेले बैठा रहता हुं आंगण में... ऐसे मे बेवक्त आ जाता है हवा का झोंका साथ लेकर कुछ पत्ते ... 

-प्रविण पावडे

©Pravin Pawade #Blossom
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

विना आभूषणाचा सावळा देह
मनास भुरळ घालीत होता...
रत्नखचित स्वर्णधारी कलेवर
पोटास खड्डे पाडीत होता...

धर्माचा रक्षणकर्ता पुरुषोत्तम
परीटाचे म्हणणे ऐकत होता...
जन्म मृत्युच्या फे-यासाठी 
मारुतीला फसवित होता...

तुच दशावतारी तारणहारी
तुझे गुणगौरव गात होता...
मरा  मारा  मरा ओरडताना 
राम नाम जपत होता....

-प्रविण पावडे

©Pravin Pawade #WoNazar
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

स्पर्शास आतुरलेली
गारव्यातील ही ओढ...
नाजूकशा या ओठांना
गुलाबी रंगाची जोड...

©Pravin Pawade
  Love
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

मृत्यूच्या अन् मरणा-या व्यक्तीच्या दरम्यान असलेल्या ventilator प्रमाणे आहेस तू...
आज अचानक असं का बोलतोय याचाच प्रश्न पडला असेल ना तुला...
खरं तर खुप दिवसांपासून ठरवत होतो की तुला सांगेन... तुझ्याशी बोलेल... 
डोळ्यांच्या कडांवर अडवून ठेवलेल्या आसवांच ओझं वाहणं असो...
नाही तर रोजच्या आव्हानांना लढण्याचं बळ देत राहणं असो...
 तू माझी कधी साथ सोडली नाहीसं.... 
मी मात्र तुझ्यावर माझ्या स्वप्ननांचा, अपेक्षांचा भार टाकतच राहिलो....
मला जाणवतयं तू देखील हात टेकले असावेत माझ्या अशा या वागण्यासमोर...
तुझ्यासारखी मैत्री, साथ देणारं दुसरं कोणीच असूच शकत नाही...

-प्रविण पावडे

©Pravin Pawade #Anger
53e5585ab717272edb1175fc44670a32

Pravin Pawade

कसं आहे ना आपलं नातं, 
तू जी सततची बडबड अन् 
मी मख्ख पाषाण हृदयी. 
अगदी समुद्राच्या लाटा आणि त्याचा किनारा. 
लाटांप्रमाणे तू सतत बोलतं राहतेस 
मनातलं सारं काही सांगून टाकतेस 
मी मात्र अरसिक.. निर्विकार.. तठस्थ 
परिणाम स्वरुप... इगोएस्टीक.. काष्ट

पण एक सांगावंसं वाटतयं...
तू अशीच येतं जातं रहा लाटांसारखी...
मी हळूहळू का ना होईना ... 
पाषाणाचा वाळूत रुपांतरीत होईल
मला तुझी अन् 
तुला माझी ओढ वाटेल...

- प्रविण पावडे

©Pravin Pawade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile