Nojoto: Largest Storytelling Platform
harshapatil5775
  • 6Stories
  • 14Followers
  • 71Love
    299Views

Harsha Patil

Education Officer

  • Popular
  • Latest
  • Video
545e02f752be260d195fa1ba6a6b4602

Harsha Patil


         गारवा
अवेळी  आलेल्या पावसाने
अवनी  अंगोपांगी शहारली....
हिम गाराच्या गारव्याने
धुक्याची शाल पांघरली....

©Harsha Patil
  #Walk
545e02f752be260d195fa1ba6a6b4602

Harsha Patil

शीर्षक : संक्रात
आदित्याचा मकरराशीत 
या दिनी होताचं प्रवेश
दक्षिणायन संपुष्टात
उत्तरायण धारण वेश.....१
सुहासिनीं नटण्याचा
असे साजिरा गोड सण
ऊस- बोरे , तिळगुळ
सुगडीचा देती वाण.....२
काळी चंद्रकळा लेवूनी
नववधू सुंदर सजते
हळदी कुंकू लुटूनी 
संक्रात मनोभावे पुजते......३
तिळ असे जरी कणभर
सामावून घेण्यास समर्थ
मानवा सोड मोह, वाट प्रेम
जीवनास लाभेल मग अर्थ.....४
नववर्षाच्या या सणाने
तिळ तिळ वाढे जसे दिस
सुख समाधानात जाऊदे
वर्ष हे दोन हजार चोवीस ....५

©Harsha Patil
  #makarsankranti
545e02f752be260d195fa1ba6a6b4602

Harsha Patil

शीर्षक: सावित्रीच्या लेकी 
स्वातंत्र्याची जाण देणाऱ्या 
होत्या सावित्रीबाई फुले
क्रांती झाली स्त्रियांमध्ये
घडला इतिहास यामुळे...
जातीधर्म भेद सारुनी
 बालिकागृह केले सुरू 
पहिल्या मुलींच्या शाळेने 
ज्ञानाचा रचला महामेरू....
चुलमूल बेगडीचे स्त्रीवरी 
समाजाने ठोकले टाळे 
प्रगतीचं दीप उजळोनी
दूर झाले अंधारजाळे......
समाजसेवा हाच होता 
क्रांतीसूर्य,ज्योतीचा ध्यास
प्लेग रुग्णाच्या सेवेतच
साऊ सोडी अखेरचा श्वास
सावित्रीच्या आम्ही लेकी
ध्येयाने घेतो उंच भरारी 
कर्तृत्व मोहर उमटवूनी 
जगावर होतोय भारी.
*हर्षा हिरा पाटील*
* *वि.अधिकारी शिक्षण पालघर.*

©Harsha Patil
545e02f752be260d195fa1ba6a6b4602

Harsha Patil

शीर्षक:युगंधर
आदी- कृष्ण जन्मदिन
योगमायेचे बलिदान
त्यागसंपन्न गोविंद
युगंधर जीवदान.....
श्रावण मध्य अष्टमीला
मथुरेत बाळ जन्मला
रेखलेले पाहुनी ललाटी
चंद्रमा नभी हासला....
देवकी -वसुदेव पुत्र
गोपिकांचा झाला कान्हा
राधेचा प्रेमळ सखा
यशोदा मैय्याचा तांन्हा.....
निळ्याशार नभांगणी
कान्हा वाजवी बासरी
पशुपक्षी मंत्रमुग्ध
राधा होई गं बावरी.....
रूपे नि नामे अनेक
धारण करी गिरीधारी
दैत्यांचा कर्दनकाळ
सावळे रूप मनोहार

©Harsha Patil
  जन्मष्टीमीच्या सर्वांना

जन्मष्टीमीच्या सर्वांना #मराठीकविता

545e02f752be260d195fa1ba6a6b4602

Harsha Patil

हर्ष धारा

हर्ष धारा #मराठीकविता

545e02f752be260d195fa1ba6a6b4602

Harsha Patil

दि.24/8/2023

शीर्षक :जीन 

इस्रो शास्त्रज्ञ म्हणजे
भारत  देशाचे जीन 
यशस्वी उड्डाण विक्रम
2023 चंद्रयान तीन....

राष्ट्रध्वज तिरंगा तो
दिमाखात फडकला
चांदव्याच्या शीतल
मंद किरणात न्हाहला....

चंद्रयानाच्या तीन
रूपांनी चंद्रमा कवेत
महान अशा कार्याचे 
किती गुण हो गावेत!

दक्षिण ध्रुवी पाऊल
अद्वितीय इतिहास
भारतीयांसाठी आहे
सोनियाचा दिनु खास....

जिद्द अन बुद्धिमत्तेने
सांभाळली प्रयत्न धुरा
जगात श्रेष्ठत्व,देशाच्या
शिरपेचात मानाचा  तुरा....

©Harsha Patil


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile