Nojoto: Largest Storytelling Platform
vinayakavitkar3601
  • 28Stories
  • 74Followers
  • 233Love
    210Views

vinaya

हँसो और हँसाओ , चार दिन की जिंदगी हैं। कब कहाँ मौत आ जाए, किस को पता हैं ॥

  • Popular
  • Latest
  • Video
568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

कधी कपातून तर कधी ओठांतून 
नेहमीच मला चहा पाजतोस... 
हळूच टपोरा गुलाब पुढे करतोस 
तेव्हा सखा माझा खरा शोभतोस..

 विनया कविटकर🌹

©vinaya

0 Love

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

प्रॉमिस डे स्पेशल❤




मी नाहीय तुझ्या
शाब्दिक वचनात रमणारी
मला हवी तुझी साथ 
हृदयातून जाणवणारी❤

©vinaya #proposeday
568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

तुझं माझ्यासाठी तरसणं
मनाला सुखावून जातं खरं..
पण तुझ्यापेक्षा जास्त मला 
हे टपोरं गुलाबच आवडतं बरं..

विनया कविटकर🌹

©vinaya

8 Love

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

जान जान कहके मेरे 
रूह मे बस जाते हो। 
पलभर भी हो जाओ जुदा तो 
दर्द ए दिल की दास्ताँ बन जाते हो॥ 
विनया कविटकर🌹

©Vinaya

10 Love

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

हा! सही कहाँ था तूने... 
हा..तू हैं मेरा खिलोना ।
लेकिन ऐसा खिलोना..
जिसके सिवा मुश्किल होता हैं जिना॥
विनया कविटकर 🌹

©Vinaya

9 Love

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

खुपच सहज सोप्प असतं हसणं
अगदी बेभान वेडं होऊन हसावं
हसून दुनियेलाही वेडं बनवावं
आयुष्याची परवड लपवण्याचं 
खूप सोपं साधन असतं हसणं...


एवढं हसावं की डोळा पाणी यावं
कारण मात्र कोणा न उमगावं
जगालाही हास्याचा हेवा वाटावा 
इतकं सहज नाट्य वटवण्याचं
खूप सोपं साधन असतं हसणं...


लोकांनी मुर्खात गणना केली
तरीही हसरा मुखवटा पांघरून
मनातील वेदना लपवण्याचा 
केविलवाणा प्रयत्न असतं हसणं
खूप सोपं साधन असतं हसणं...

                 



                                                               खोटं हसता हसता हसणंही 
                                                               आपलं गुलाम होऊन जातं
                                                               या हास्यामागे थोडं तरी दुःख
                                                               मात्र नक्कीच विरून जातं 
                                                               खरंच खूप सोपं असतं हसणं...


                                                                हास्य क्षणभराचा का होईना  
                                                                पण आनंद नक्कीच देऊन जातं
                                                                शेवटी हसणं हे हसणंच असतं
                                                                जगण्याचं गमक शिकवून जातं
                                                                खरंच खूप सोपं असतं हसणं...

                                                                 विनया कविटकर🌹

©Vinaya

7 Love

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

दुःख...

जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती सुखदुःखातून जात असते. पण प्रत्येकाला स्वतःचं दुःख जास्त मोठं वाटत असतं आणि ते योग्यही आहे. कारण त्याने काय आणि किती यातना भोगलेल्या आहेत हे ज्याचं त्याला माहीत असतं. आपल्या आसपासची माणसं सुखात दिसतात तेव्हा 'आपणच काय पाप केलंय!' असा विचार नकळत मनात येऊन जातो. नशिबाला दोष देत रहातो. पण प्रत्येक व्यक्तीला काही न  काही  दुःख, अडचणी असतातच, एवढंच की ते आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे आपलंच दुःख आपल्याला मोठं वाटत असतं आणि आपण आपलंच दुःख कुरवाळत बसलेलो असतो. 

काहींच्या आयुष्यात दुःख येऊन गेलेली असतात, काहींच्या पुढे येणार असतील. तर काहींच्या आयुष्यात चालू असतात. कोणीही व्यक्ती सदासुखी असा नाही. एवढंच की प्रत्येकाची दुःख वेगवेगळी असतात, दुःखाची कारणं वेगवेगळी असतात, त्याची तीव्रता कमी जास्त प्रमाणात असते. तर कधी दुःखाचा कालावधी कमीजास्त प्रमाणात असतो. याच काळात माणूस तावून, सुलाखून कणखर बनत जातो. पण हाच काळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर जास्त काळ किंवा कायम चालूच राहिला तर तो कर्मदरिद्री किंवा कमनशिबी म्हणायला हवा. यालाच आपण 'मागच्या जन्मीचे भोग' असे म्हणत असतो.  तसंही प्रत्येक जणं चेहऱ्यावर मुखवटा पांघरूण सुखी, आनंदी असल्याचं भासवत असतो. ज्याला हा मुखवटा धारण करण्याची गरज लागत नाही त्या व्यक्तीस तर  भाग्यवानच म्हणायला हवे. 
विनया कविटकर🌹

©Vinaya #CloudyNight
568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

मन
प्रत्येक वेळी व्यक्त होण्यासाठी 
शब्दांची साथ मिळतेच असं नाही 
वर्षोंनुवर्षे भावभावनांच्या हिंदोळ्यावर 
असंख्य हेलकावे खात झुलत असतं ...
मनात खूप काही साठलेलं ...

कधीकधी मन भावनांच्या इतकं अधीन जातं 
मेंदूचा मनावर ताबाच राहत नाही 
एखाद्या नाजूक क्षणी नेमकी कच खातं
एक अनामिक भीती सतत डोकावत राहते ..
कसं आवरावं, कसं सावरावं कळतं नाही 
आपल्या हाती शून्याशिवाय का काही उरत नाही 
मग  सोडून द्यावं का मनाला तसंच... 
भावभावनांच्या गर्तेत गटांगळ्या खात 

सावरेल स्वतःहून की आधार देईल कुणी
की या मनाचा भार वाहून नेईल कुणी
की झोकून देईल मन स्वतःला या उधाणलेल्या सागरात ...
अनंताच्या अंतिम प्रवासासाठी ??

विनया कविटकर 🌹

10 Love

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

73 Views

568b69b0c7169a10dac6e98d71116c21

vinaya

shayri

shayri #Music

105 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile