Nojoto: Largest Storytelling Platform
muskanshaikh6752
  • 1Stories
  • 2Followers
  • 4Love
    0Views

Muskan Shaikh

Poem and shayari writer... " Abhi to kalam thami h or bhi kuch naya likhna baki h , Kavitaon se hi mene Puri duniya taki h "🤞

  • Popular
  • Latest
  • Video
58f6a7eb53d1ff902a38d6947b7c426b

Muskan Shaikh

तुझा - माझा सहवास

तुझा माझा सहवास असा काही असावा 
हाय , हॅलो नी सुरू झालेला प्रवास 
कुठ तरी दोघांच्या मनात ठसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा 

तुझचं चॉकलेट खाऊन तुझ्यावरच असावा माझा रूसावा
आपल्या या गोड नात्यात प्रत्येक जण येऊन भिजावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

उशीर का होईना पण प्रत्येक दिवस तू मला दिसावा
आणि हळूच माझी मस्करी करत माझ्या सोबत येऊन बसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

तू उदास असता माझ्यामुळे हसावा
तुझ्या डोळ्यात अश्रूचा थेंब देखील माझ्यामुळे नसावा
असा काळजी घेणारा मित्र तुझ्या आयुष्यात माझ्या नंतर ही दिसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

तुझ्या माझ्या मध्ये दुरावा मात्र नसावा
माझ्या मित्र स्नेही जाळ्यात तू नेहमी फसावा
अन या क्षणानंतर ही माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात तू नक्की दिसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

©Muskan Shaikh कविता - तुझा माझा सहवास

कविता - तुझा माझा सहवास #मराठीकविता

4 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile