Nojoto: Largest Storytelling Platform
rebelrushi6723
  • 36Stories
  • 20Followers
  • 312Love
    40Views

Rushikesh bhadange

  • Popular
  • Latest
  • Video
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

लग्न! दोन व्यक्तींना एका पवित्र बंधनात अडकवणारा विधी! पण हाच विधी आहे ज्याने आजवर असंख्य लोकांचं आयुष्य अगदी राखही करून टाकलं आहे. दोन व्यक्तींच्या वादाने सुरू झालेला दुरावा दोन परिवारांमधील लोकांनाही सहन करावा लागतो! मग ते लग्न लव्ह मॅरेज असो नाहीतर अरेंजमॅरेज! आणि या सर्व परिस्थितीचं एकमेव कारण आहे स्वतःचे निर्णय समोरच्यावर थोपवण्याची अतिशय तुच्छ आणि घाणेरडी सवय! मग तो मुलगा असो वा मुलगी! विरोधी विचार आणि स्वभावाचे काही कमकुवत पैलू एका श्रेष्ठ नात्याचा अंत करून टाकतात हे देखील लोकांना समजत नाही! पण चूका आत्मसात करण्याची कुवत नसलेला माणूस करणार तरी काय?









@Mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange #Hum
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

White मृत्यू म्हणजे नेमकं असतं तरी काय? आयुष्यभर इतरांसाठी वेदना सहन करत जगायला प्रवृत्त करणाऱ्या खुपणाऱ्या काट्यांवर दिलेला पूर्णविराम, की पुन्हा नव्याने आयुष्यात येणाऱ्या लोकांसाठी सहनशक्ती बहाल करून दिल्या जाणाऱ्या जिवावरचा स्वल्पविराम! गहन प्रश्न!






@mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange #Sad_shayri  प्रेरणादायक सुविचार

#Sad_shayri प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

प्रेम माणसाला जगायला शिकवतं म्हणतात! पण तेच प्रेम कोणाचातरी जीवही घेऊ शकतं, जिवंतपणी अगदी मृत अवस्थेत जगायला प्रवृत्त करू शकतं, मनाला अतीव वेदना देऊन जाऊ शकतं हे सांगणं मात्र जणू अट्टहासाणं टाळलं जातं! आणि त्याच अज्ञानात माणूस प्रेमाच्या जाळ्यात अडकतो आणि मग सुरुवात होते एका विक्षिप्त घुसमटीची! आणि तीच विक्षिप्त घुसमट आजवर अन्वी अनुभवत आली होती. पण इश्वाच्या एकाच क्रियेने तिला अगदी कठोर बनवलं होतं. आणि त्यामुळेच ती एका निर्णयावर येऊन पोहोचली होती.







अनि💔इशू....















Rowdy - A Madness Lovestory...💔💔💔

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

White " अजून किती चान्स द्यायचे सांग बर! तूच सांग किती फरक आहे इश्वा आणि अर्णवमध्ये! किती इनोसेंट मुलगा आहे तो! एकदा स्वतःला आमच्या जागी ठेवून विचार कर ना तू!" दादू पुन्हा समजावणीच्या सूरात म्हणाले. 

" सॉरी दादू! मी तयार आहे अर्णवशी लग्न करायला. आणि मी काही रागात बोलत नाहीये. तो बहुदा माझ्या नशीबातच नाहीये." ती आपले अश्रू लपवत म्हणाली आणि तशीच तेथून निघून गेली.





Rowdy - A Madness Lovestory...💔💔

©Rushikesh bhadange #sad_shayari
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" सांगायची संधी दिली होती का तू मला? आणि प्रत्येक वेळी काय तेच करत बसू का मी! मला गरज नाहीये कोणाच्या नजरेत स्वतःला प्रुव्ह करायची. ज्याला रहायचं आहे तो राहील आणि ज्याला जायचं आहे तो जाईल! आणि त्याच लोकात आता तुही आहेस!" तो अतिशय शांतपणे तिच्या नजरेशी नजर भिडवत म्हणाला आणि पुन्हा बाहेर पहायला लागला.

" सॉरी! मला खरंच तूला हर्ट करायचं नव्हतं. माझ्याकडून रागात झालं ते!" ती पाणावलेल्या डोळ्यांनी रडतच म्हणाली.

" तुला नव्हतं करायचं पण हर्ट केलंसच ना! मग झालं तर! आता बोलून काहीच फायदा नाहीये. उद्या करतेय ना रजिस्टर मॅरेज! मग ठीक आहे ना! आता माझ्या असण्याचा किंवा नसण्याचा तुला काहीच फरक पडला नाही पाहिजे." तोही रागातच बोलला.






















Rowdy - A Madness Lovestory...❤️❤️❤️

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" तुम्ही तयार आहेत लग्नाला?" तिनेही सरळ विषयलाच हात घातला. 

" तुम्ही नाहीयेत का?" त्याने उलटपक्षी तिलाच विचारलं.

" मी नाही म्हणाले तर?" 

" माझी काही हरकत नसेल. तुम्हाला मी आवडलो नसेल तर स्पष्ट शब्दात सांगू शकता तुम्ही तसं! मला वाईट नाही वाटणार! आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे. मग जोडीदार आवडता नको का करायला!" तो किती सहजपणे बोलून गेला. ती अगदी नवलाने त्याच्याकडे पाहत होती. अशी मुलं कोणाला नाही आवडणार! अगदी पाण्यासारखे नितळ आणि निर्मळ!











Anvi & Arnav...❤️❤️

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" आपल्या प्रेमाचं अंकुर मला माझ्या पोटात वाढवायचं होतं. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहिली आहे रे मी! मला तुझ्या मुलाची आई व्हायचं होतं. पण कदाचित ते या जन्मात शक्य दिसत नाहीये मला!

©Rushikesh bhadange #Love
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

रिमझिम पावसात अगदी मंदपणे वळण घेणाऱ्या बसच्या खिडकीत बसलेली "ती" त्याच्या नजरेस पडली होती. पण तिच्यापेक्षा जास्त तिच्या एका छोट्याशा वस्तूने त्याचं लक्ष जास्त वेधलं होतं. आणि ती छोटीशी वस्तू होती तिच्या कानात वाऱ्याच्या झोताने इकडून तिकडे डुलणारा अगदी नाजूकसा झूमका! तिच्या वाऱ्याने भुरभुर उडत असलेल्या केसांच्या सानिध्यात तिच्या साधारण झुमक्याला कितीतरी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. तो डोळ्यांची पापणीही न लवता तिकडेच पाहत होता. अगदी एकटक!

Ek Deewana Tha...❤️❤️

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" का बरं बदलू मी स्वतःला? प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे स्वतःला बदलून का जगायचं मी? मग माझ्या विचारांच काय? बाप बोलतो असा वाग, सिद्धू बोलतो तसा जग, तू बोलतेस असं कर भाई बोलतो तसं कर! सगळं तुमच्याच मर्जीने! मग माझं काही अस्तित्व आहे की नाहीssss." तो आपले दोन्ही हात पसरवून अगदी रागाने ओरडला आणि ती तशीच दचकून मागे सरकली. किती राग दिसत होता त्याच्या डोळ्यात तिला! 

Rowdy - A Madness Lovestory...💔💔

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

मर्यादित आयुष्यात अमर्यादित सुखांच्या क्षणांची अनुभूती करून देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मित्र! आणि त्या मित्राला रक्ताच्या नात्यापेक्षा वरचढ ठरवून घनिष्ट सबंध प्रस्थापित करणारं नातं म्हणजे मैत्री!

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!❤️❤️

©Rushikesh bhadange friendship day...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile