Nojoto: Largest Storytelling Platform
eraniketbmodake3045
  • 7Stories
  • 27Followers
  • 50Love
    0Views

Er Aniket B Modake

https://m.facebook.com/aniketbmodake

https://m.facebook.com/aniketbmodake

  • Popular
  • Latest
  • Video
5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

दिवाळी तोपर्यंत
दिवाळी वाटत नाही
घराला जोपर्यंत
आकाश कंदील लागत नाही

दिवाळी तोपर्यंत
दिवाळी वाटत नाही
जोपर्यंत घरातल्या
माणसांची गर्दी एकत्र जमत नाही

दिवाळी तोपर्यंत
दिवाळी वाटत नाही
जोपर्यंत फटाक्यांची
आतिषबाजी कानावर पडत नाही

5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

जिवाचे रान केले मी
जमिनीत सोने पिकवले
पिक आले जोमाला
वाटले कष्टाचे चीज झाले

वळीवाचा पाऊस
धो-धो बरसू लागला
पाहून जीव माझा
तिळतिळ तुटू लागला

मातीत सोने उगवले मी
ते पावसाने मातीमोल केले
अवकाळी पावसाने बघा
जगणे किती मुश्कील केले..

5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

उतरतली एक परी
नभातून थेट खाली
कन्यारत्न ते
भेट अनोखी नशिबाने दिली

बोल बोबडे तिचे
बाबा बाबा ती म्हणू लागली
हाक तिची ती
हवी हवीशी वाटू लागली

पाऊले तिची
घरात अंगणात उमटली
तिच्या पायगुनाने
घराची भरभराट झाली

बोलता बोलता ती
लहानाची मोठी झाली
एक वेळ अशी आली
स्वतःच्याच घरची ती पाहुणी झाली

5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

तुझ्यासाठीच
लढलो, झगडलो मी
मरमर माझी
कधी तुला कळलीच नाही

तुझ्यासाठीच
जगत आलो मी
तळमळ माझी
कधी तुला कळलीच नाही

-- कविता संग्रह--
5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

काळाच्या ओघात
हरलेल्या मनाला
थोडा आधार देता यावा
म्हणून मी हार मानली नाही

जीवाचा आटापिटा
करून थकलेल्या मनाला
थोडा विसावा देता यावा
म्हणून मी हार मानली नाही

दुःखाचा डोंगर
पालटून आलेल्या मनाला
सुखाचा मार्ग शोधता यावा
म्हणून मी हार मानली नाही

दुःख जिव्हारी
लागलेल्या मनाला
सुखाचा अनुभव देता यावा
म्हणून मी हार मानली नाही
-Er Aniket B Modake
5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

----मैत्रीण----
मला मैत्री आवडते
मैत्रीण म्हणून तू आवडते
तू हसते कधी रुसते कधी
तुझी हिच नौटंकी मला आवडते

मला मैत्री आवडते
मनातलं ऐकणारी तू आवडते
तू हसते मला हसवते
तुझी हिच अदा मला आवडते

मला मैत्री आवडते
मैत्रीवर जीव ओतनारी तू आवडते
हसते, हसवते रडते कधी
रडता रडता हसणारी तू आवडते
--Er Aniket B Modake--
5bb725e252a42998990d1caef672876c

Er Aniket B Modake

ओळख स्वतःची
स्वतःच करून देईल मी
नव्या युगाचा नवा चेहरा
बनून समोर येईल मी

स्वप्नांची शिदोरी
जिद्द कोरी घेऊन येईल मी
लढाई अस्तित्वाची
अभिमानाने लढत राहील मी

स्वप्नांची दुनिया
सत्यात घेऊन येईल मी
हरलेल्या स्वप्नांसवे
पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेईल मी #कविता संग्रह

#कविता संग्रह #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile