Nojoto: Largest Storytelling Platform
drashokgosavi5729
  • 30Stories
  • 84Followers
  • 248Love
    792Views

Dr. Ashok Gosavi

  • Popular
  • Latest
  • Video
636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

White माझेच शब्द मला,  आज बोचत आहे.......
 तरी कविता नवी पुन्हा रचत आहे..,...
सारत दूर काळजात वेदनेला......
 शब्द शब्द पुन्हा, तेच वेचत आहे..

 ही कसली भागदौड जगण्याची रीत कैसी...
 वेगाच्या पाठी सारे, मृत्यूची शर्यत जैसी...
 माणसांची ही भीड माणसांना चेंदत चालली..
 मी तरी कुठे वेगळा?  तीच प्रत्येच्या खेचत आहे 


 गजबजलेल्या जीवनाने अलगद निवांत व्हावे 
 एकांताचे क्षण शांततेत नि्चिंत प्यावेत..
 रोजचेच धावणे मरणाच्या पाठीमागे...
 तरी कविता जगण्याची रचत आहे..

 बाबळीला येती फुले फुलांचे होतात काटे..
 कुणाला टोचती पायी कुणाचे कुंपण मोठे 
 काट्यालाही महत्त्व काटाही येतो कामी...
 काट्याने जगण्याला रोजच टाचत आहे 

- रचना डॉ. अशोक गोसावी

©Dr. Ashok Gosavi
  #Sad_Status
636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

0 Bookings

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

जळलो मनात, नाही झाकी राख माझी.............
थकलो थकलो.........
कितीक पेलवीत ओझी.......

ओझ्याखाली जीव.….
जीव दबला दबला ......
जगणे समजले ...
काय असते ही बला....

- AG 💖

©Dr. Ashok Gosavi
  #motivate

48 Views

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

0 Bookings

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

Yad

#WoTil

Yad #WoTil

121 Views

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

चोरीचे शब्द, खोटे ते नाव..
मलिन प्रतिमा, का कमवावी..
करुनि साधना, लिखाणाची जाण.
कवित्वाला हाक वीनवावी..

असेल हिरा, चमकेल छान..
कचरा असता, होईल घाण..
स्व:नाम रुजते श्रमाने, 
आयते , खोटे सुख, नाही तर नामुष्की०  असो जाण..

ज्याचे त्याचे शब्द, ज्याचे त्याचे वैभव..
धन संपत्ती असतसे ती..
आपण वाचून ज्ञान घ्यावे..
कधी तृशेने शब्द प्यावे...

- डॉ० अशोक गोसावी..

©Dr. Ashok Gosavi #Texture

12 Love

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

भुईतल्या भेगा तळ पायास गेल्या 
कधी कधी रक्त ही निघते 
होतात जखमा ओल्या ० 

आता काटा टोचत नाही,
नाही लागत चटके 
चाबूक किती तुटले मजवर
नियती ने मारले किती फटके .

या पायांनी भुई किती व्यापून टाकली ,
मातीने दगड केले तळवे 
माय मातीने लाज राखली .

दुःख एक आहे

अजुन कोणता आजार नाही
आणि कुठला संसर्ग ही होत नाही
तरी , मिनरल वॉटर कधी पित नाही.

जगून  जगून थकलो आहे , 
अजून पायपिट करू किती 
अजून काय भोगायचे उरले आहे
सांगून टाक बाई नियती ,

उल्लेख आनंदाचा होतो आणि ,
काळीज येथे करपून जाते 
त्याची ही होते चाळण 
आणि ही कस्ट च माजी संपती होते ०

- डॉ० अशोक गोसावी #Time

12 Love

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

दर्वळू दे न गंध, आणि उमलत रहा अशीच
चांदण्यात खुलत जाणारे रूप 
आणि पडत जाणारी भुरळ
त्यात गुंतून जाताना,
आणि स्वतःला विसरताना
बेभान झालो तर, ?
तर सामावून घे तुज्यात,
तुज्या गंधात ,
थोडा धीर दे,
अधीर होतांना,
आणि मोकळ्या केसात लपवून घे
कुशीत भितांना, 
अबोला असतोच..
पण नेत्र जरा उघडे ठेव
त्यांची भाषा आता समजू लागली आहे , थोडी...

भिन्न भिन्न आता नको
एक मेकात सामावून जाऊ
आणि अंतर नको कोणतेच 
आठवण उरेल असे एक होऊ
थर थरथरणाऱ्या ओठाना 
आधार घे ,
आणि वाढत जाणारे स्वास
मनभर प्राण वायू पिऊन घे०

-- डॉ० अशोक गोसावी #Love

11 Love

636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

#Jugalbandi_Challenge
636d3c48946176142c730b07b5cadd72

Dr. Ashok Gosavi

जारे बाबा जा कोरोना , थोडे काम आता करुदे।
भुकेत बुडले पोट , हा अंधकार सरू दे ०

शाळा बंद , ऑफिस बंद, कम्पनी बंद, उपासमारी ची वेळ आली ..!
आजार हुन आर्थिक संकट मोठे 
मनस्थिती गोंधळून गेली,

तू सोडले तरी बेरोजगारी मारून टाकेलं , जगण्या पुरते बळ मिळुदे
घरात सडतोय , पोर बाळा चे पोट भरुदे,।

असा लॉक डाउन, जीवन च सारे लॉक झाले . 
डोक्यात मुंग्या ,डोळ्यात अश्रू ,भावनांना ब्लॉक केले ०

रोज कमावतो तेव्हा खातो, आता जड जगणे झाले माझे ..
धीर सरला , सोसवत नाही लॉक डाउन चे ओझे ०

 कुठे असते घरदार, रोजगारी  ,
संकट वर मात करून जायचे आहे ० - डॉ० अशोक गोसावी

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile