Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6736782124
  • 4Stories
  • 11Followers
  • 11Love
    108Views

shivraj sagale

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
649afe26e0f4f5e4c8d220a95b76a28b

shivraj sagale

आठवांचे थवे ..!
................................................................................................
ओठ होतात मूके,आणि डोळे बोलू लागतात ,
आठवणीनं तिच्या अश्रूही डोळ्यांची साथ सोडू लागतात.

प्रेम फूलवनारे गूलाब आज जहाल वाटू लागतात,
नेहमीच जखमा देणारे काटे मात्र मवाळ वागू लागतात.

येता आठवांचे थवे,मनाच्या पारावर बसु लागतात,
गत काळातील तिच्या आठवणी,पारंब्या सोबत झुलू लागतात.

आज येणार ती,इतकेच  कळलं,
डोळे तिच्या वाटेवर पहारा करू लागतात,
स्वप्नांच्या गावात भावणाचे मळे पून्हा फुलू लागतात.

©कवी~शिवराज सगळे.
मो.नं.9561101355.

©shivraj sagale
649afe26e0f4f5e4c8d220a95b76a28b

shivraj sagale

बबन्या झाला फूल..
(कवीता)
................................................................................................
काँलेजचा पहिला दिवस तास झाला सूरू,
स्वप्न ज्याचे त्याचे लागले जोर धरू.

  बाग फूलांनी बहरलेली,त्यात रंगीबेरंगी फूलं 
      त्या फूलांवर डोर टाकित फेर धरू लागली मुलं.

धेय प्रतेकाचं जीवणात काहीतरी व्हायचं,
           बबन्याला लेक्चर म्हनला का त्याचं डोकं दूखायचं.

            मी म्हनलं बबन्या अभ्यासानी आयुष्याचं सोनं होतं, तो
   म्हनायचा वैतागून ,घरीपन रोज हेच गाणं होतं.

         शिक्षणाचा उद्देशतरी काय ,नूसता पैसाच कमायचा,
                         आण् आपल्याकडं तो बख्खळ हाय म्हणत बिनधास्तजगायचा.

एक दिवस वर्गामधे नवलच घडलं.
    गूलाबाचं फूल आमच्या बेंचवर येवून पडलं.

         चाणाक्ष आमच्या देखणे बाई,चौकशी झालीना सूरू,
      प्रयत्नांती कळलं ,ही तर आपल्या शेजारची पारू.

  गूलाबाचं फूल ते,बबन्या जिवापाड जपत होता.
                 रोज रात्री झोपताना ,एक एक पाकळी मोजून झोपत होता.

मी म्हणायचो बबन्या,अभ्यासाकडं दे लक्ष,
       पारू दिसताच समोर ,त्याची नजर व्हायची दक्ष.

जिवापाड जपला गूलाब ,अखेर तोही सूकला,
                        पारू म्हणाली बबन्याला ,तूझ्यासाठी नव्हता तो माझाच नेम हूकला.

           वहीतला गूलाब तेंव्हा तो पाया खाली तूडवत होता,
          एकांतात बसून आता बबन्या ढसा ढसा रडत होता.

©शिवराज सगळे #Travelstories
649afe26e0f4f5e4c8d220a95b76a28b

shivraj sagale

प्राक्तण (कवीता)
.....................................................................
 येता वादळ वारा,घरट्याचे वाजती बारा.
   वादळात कूठे निवारा त्या बेघर पाखरांना.

     पावसात विखरूनी जाई संसार नेमका सारा
    भंगवून स्वप्न घराचे सिळ घाली उनाड वारा.

         हैराण जीव किती हा,काट्यासंगे स्वप्न वेचताना.
       घरट्यातील पिलांसाठी मांडला हा खेळ सारा.

येता वादळ वारा माणूस शोधतो निवारा,
          झाडाझूडपात दडती जीव असे त्यांना कूठे थारा.

हतबल होतो माणूस दोश देतो प्राक्तणाला,
     घेत भरारारी नव्याने पाखरं साद घालती आकाशाला.

©शिवराज सगळे
649afe26e0f4f5e4c8d220a95b76a28b

shivraj sagale

प्राक्तण 
कवी~शिवराज सगळे.
#UnlockSecrets

प्राक्तण कवी~शिवराज सगळे. #UnlockSecrets #मराठीकविता

135 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile