Nojoto: Largest Storytelling Platform
jayramsitarammor5063
  • 174Stories
  • 442Followers
  • 2.2KLove
    41.3KViews

jayram More

मै पल दो पल का शायर हूँ...

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

माय जिजाऊ सारखी तीच वागत नाही
म्हणून शिवबा घरा घरात जन्मत नाही

इंन्स्टा पब्जी  फ्रि फायरमध्ये लेक गुंतला
 तलवारीला धार आता ती लावत नाही

*एमजे*

©jayram More
  #Love
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

मी तुझ्यावर प्रेम करतो काय चुकले सांग ना
मी तुला हृदयात जपतो काय चुकले सांग ना 

ठेवतो आहे तुला मी स्पंदनाच्या वर्तुळी
नाव माझे मी विसरतो काय चुकले सांग ना

एक वेळा बोल ना तू   शब्द 'ते ' प्रेमातले
मी तुझ्या स्वप्नात जगतो काय चुकले सांग ना

 *एमजे*

©jayram More
  #Marriage
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

विश्वासाने आलीस सोबतीला 
तर मी तुझी सावली होईन
अंधारामध्ये वाट दाखवाया
मी लुकलुकणारा तारा होईन

*एमजे*

©jayram More
  #eternallove
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

किती स्वप्ने दडवून ठेवलीस पापणीत तुझ्या
चंद्र तारे जागतात अहोरात्र काळजीत तुझ्या

 ठेवला आहे रिता मी काळजाचा एक कप्पा
सजवायचा आहे अता त्याला संगतीत तुझ्या

©jayram More
  #standAlone
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

काहीच नको फक्त तुच हवी
जगण्यासाठी हो उमेद नवी

©jayram More
  #aashiqui
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

भरून येतं
आभाळ मनाचं
दाटून येतेय पापणी
वाटू लागत हे जग सूने सूने
तुझ्या भेटीच्या ओढीनं
सैरावैरा पळतं मन 

तुझी आठवणं बाकी काही नाही

©jayram More
  #boat
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

आठवणीने 
आठवून घेत चल मला
जसा मी तुला आठवणीने आठवतो
आठवणींचा प्रत्येक क्षण मी
तुला आठवणीने कवितेतून
लिहून पाठवतो

©jayram More
  #phool
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

उभा पांडूरंग ||भक्ताचिये दारी || 
घडविली वारी || साधू संता ||

युगे आठ्ठावीस || उभा विटेवरी ||
नामाचीया दारी ||  पंढरपुर

झाला पाठीराखा || सखू जनाईचा ||
 राणा पंढरीचा || विठूराया

तुझ्या पालखीचे || झालो आम्ही भोई
भक्तांची तू आई || मायबापा

दर्शन सोहळा || पहीला लोचनी ||
शुध्द चित्त वाणी || झाली माझी


 *जयराम मोरे सोनगीर*

©jayram More
  #SunSet
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

सिंहले घोमालीसन
बैल राजदंडवर बशी गया अन्
घोडास्ना बजारम्हा गधडाले 
दाम भेटत गया

व्हता येस का हो महासत्ता
आंडा निंबूना निवद दायीसन
या लबाड कोल्हास्ना पायरे
विविधताम्हा नटेल देश
कुरापतीसम्हा गुंती गया

©jayram More
  #mountain
6f793f7a27c028f4e49c14d24e4606db

jayram More

तुझ्या आठवात झुरतो आहे
तिळ तिळ रोज मरतो आहे

पाहून जा काळजाची दशा
भेटीस तुझ्या तळमळतो आहे

©jayram More
  #Parchhai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile