Nojoto: Largest Storytelling Platform
kunalbane6439
  • 3Stories
  • 11Followers
  • 28Love
    0Views

Kunal Bane

Artist... Editor/Director

  • Popular
  • Latest
  • Video
736daa5907c9b6087182ad80fa9617c2

Kunal Bane

वादळी हा पाऊस सारा
मुसळधार बरसून गेला
काही जणांना सुख
तर काही जणांना दुःख देऊन गेला

कधी रिमझिम बरसून धारा
कुणाचा तरी खेळ मांडून गेला
वेड्या सारखा कोसळून
काही जणांचे घर मोडून गेला

आता भरकटली सगळीच शाळा
पुस्तकाचा तंत्र ही बिघडून गेला
आयुष्यात मोकाट सुटून
ज्ञानाचा विस्फोट करून गेला

                                         
                                   -KUNAL BANE

9 Love

736daa5907c9b6087182ad80fa9617c2

Kunal Bane

ज्या भावनेने मिळालेले प्रतीक
आज त्याच भावनेनं कोमेजले आहे,
ज्या फुलपाखरू सोबत उडान भरारी पाहणार तर
आज त्याच फुलपाखरूनी स्वताचे पंख छाटले आहे,
मनातला मोकळा श्वास घेतलेला देखील
आज तो निराश होऊन दाटले आहे
आवेशात मिळणारी सावली सुधा
आज कुठेतरी हरवलेली आहे,


-KUNAL BANE

6 Love

736daa5907c9b6087182ad80fa9617c2

Kunal Bane

तू हात दिलास, मी बेफिकीर झालो
तू साथ दिली, मी नभ फिरलो
तू हाक दिलीस, मी स्पंदनात अडकलो
तू श्वास दिला, मी रुजू लागलो

तू दिलासा दिला, मी त्यात गुरफटलो
तू उजेड दिला, मी त्या खालची सावली झालो
तू क्षण दिले, मी आठवणीत गुंतलो
तू पेहेराव दिला अन मी तो घेत गेलो

पण कुणास ठाऊक तू फक्त एक वादळ होती,
अन मी त्यात स्वतःला हरवत होतो,
काळजाला घाव देऊन तू परती निघून गेली,
अन मी आता तुझ्या विरह पायी मनाला वेदना देऊ लागलो.

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile