Nojoto: Largest Storytelling Platform
maheshlokhande3263
  • 44Stories
  • 91Followers
  • 185Love
    0Views

Mahesh Lokhande

primary teacher 9604908854

  • Popular
  • Latest
  • Video
7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

संपू दे अंधार सारा
उजळू दे जीवन सारे
जीवनात क्षणोक्षणी
वाहू दे आनंदवारे

जागी होवो सृष्टी सारी
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट होण्या
घट्ट होवो प्रेम धागा

स्वच्छ सारे मेंदू व्हावे
अन मनेही साफ व्हावी
प्रत्येकाला प्रगतीची
वाट सहज मिळावी

वेदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणूस माणूस व्हावा.

दीप अंतरातला उजळावा
सत्य सार्‍यांना कळावे
स्नेहप्रकाशाने सारे
जीवन उजळून जावे
महेश लोखंडेसर 9604908854
7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

फातिमा शेख
देशामधली पहिली मुस्लीम
शिक्षिका फातिमाताई
ज्ञानदानाचे कार्य केले
 सोबत सावित्रीबाई

घरामध्ये आश्रय दिला
उस्मानभाई थोर
जोतिबांच्या कार्याला
दिली साथ आधार

 अडचणींना न घाबरता
लढले सत्यासाठी
फातिमाताई सावित्रीमाई
उस्मानभाई जोतीबांना
प्रणाम कोटी कोटी

कवी-महेश लोखंडेसर 9604908854 फातिमा शेख

फातिमा शेख #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

वंदन गुरूंना
प्रथम वंदन आद्यगुरुला
 जिने मला जन्म दिला....
दुसरे वंदन गुरुजींना 
 ज्यांनी ज्ञानकक्षु दिला ....
तिसरे वंदन मित्र गुरूला 
ज्यांनी नित्य आधार दिला ....
चौथे वंदन त्या सर्वांना 
ज्यांनी नवं अनुभव दिला...
पाचवे वंदन ग्रंथ गुरूंना
 ज्यांनी जीवनी अर्थ दिला...
सहावे वंदन सद्गुरूंना 
ज्यांनी मोक्ष मार्ग दिला..

कवी-महेश लोखंडेसर9604908854 वंदन गुरूंना

वंदन गुरूंना #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

वंदुया गुरुजना

वंदुया गुरूजना
आज शिक्षकदिना

गुरू ज्ञानाचा सागर
गुरू करूणेचे आगर
गुरू राष्ट्रशिल्पकार
करू तयांस वंदना
 
गुरू दाखवी वाट
गुरू तेथे पहाट
गुरू तेथे सत्यभेट
गुरू तयांसी अर्चना

 गुरू संस्कार दूत
गुरू मूल्यसंगीत
गुरू कौशल्यगीत
गुरू देई अंजना

गुरू ज्ञानामृतकुंभ
गुरू दीपस्तंभ
गुरू प्रज्ञास्तंभ
गुरू परीस जीवना

कवी-महेश लोखंडेसर9604908854 वंदुया गुरूजना

वंदुया गुरूजना #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

स्थापूया गणराया
 
मनमंदिरीत स्थापूया गणराया
स्वयंप्रकाशित बुध्दी कराया॥धृ॥

मळ काढूया आपल्या मनाचा
निर्मल करूया कायावाचा
बहुश्रुतहो सारे होऊया॥1॥

सुखयेण्याशी नि  दुःखहरण्याशी
पुण्यकर्माच्या बांधूया दुर्वाराशी
ज्ञानासोबत लगीन करूया॥2॥

शांत समंजस सरळमार्गी होऊ
मातापित्यांचा सन्मान ठेवु
शीलरक्षणास शीरही देवुया॥3॥

        कवी-महेश लोखंडेसर 9604908854 स्थापूया गणराया

स्थापूया गणराया #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी  सैनिकांना 
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी डाॅक्टरांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी शिक्षकांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी इंजिनीअरना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी कष्टकर्‍यांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी साहित्यिकांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी सुधारकांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी पत्रकारांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी कलाकारांना
देऊ चला मानवंदना

स्वातंत्र्यदिनी देशभक्तांना
देऊ चला मानवंदना

देशासाठी झटती त्यांना
देऊ चला मानवंदना

सेवा करणार्‍या सार्‍यांना
देऊ चला मानवंदना

कवी- महेश लोखंडे देऊ चला मानवंदना

देऊ चला मानवंदना #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा
इथेच झाला परमप्रतापी थोर शंभूराजा

सह्याद्रीचे कडे गर्जती ह जय जय शिवराय
दरीदरीतून नाद घुमतो हरहर महादेव

स्वराज्याचा मंत्र म्हणत लाख अर्पिल्या माना
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकीती हाच मराठी बाणा

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न इथे झाले साकार
इंग्रजांविरूध्द इथेच बनले थोर प्रतिसरकार

अजंठ्याचे सुंदर लेणे जणू नाभीतली कस्तुरी
पराक्रमाची कथा सांगते रायरी देवगिरी

मुंबई ती जललहरीवरती जणू मोती समुद्रात
अरबीसमुद्रे मंथुनी काढिले जणू ते नवनीत

कोकणकिनारा फळाफुलांनी नटला स्वागताला
सुंदरता ती मोह घाली सदा समुद्राला

भव्यरूप घेऊन सह्याद्री रोखे परकीयांना
नरदुर्गांची सोबत त्या दिसे भव्य सेना

उड्या घेती कड्यावरूनी नद्या दख्खनपठारावर
काळी आई खेळ खेळवी अंगा खांद्यावर

कृष्णा भीमा गोदा विणती सुंदर हिरवे जाळे
बंधूप्रेमाने येथे बहरले माणुसकीचे मळे

कवी-महेश लोखंडे
 जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

माणुसकीचा महापूर

आठव त्या सार्‍यांना 
जीव ज्यांनी वाहिला
देशसेवेचा  झरा 
ज्यांमध्ये राहिला

माणुसकीचा महापूर
मी येथे पाहिला
देशप्रगतीसाठी
घाम येथे वाहिला

भाऊ बनून जो तो
भावासाठी धावला
बंधूप्रेमाचा पाझर
फुटताना पाहिला

भूकेल्यास घास
तहानेल्यास पाणी
देई अंथरूण
 कोणासही कोणी

पूरग्रस्तांसाठी जो तो
गेला धाऊनी
शक्य जे ते जो तो
आला करूनी


स्वातंत्र्यदिनाला या
सार्‍यांना सलामी
भूकंप पूरग्रस्त
ना कधी होवो कोणी

कवी-महेश लोखंडे माणुसकीचा महापूर

माणुसकीचा महापूर #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

शूरवीर सैनिका

शूरवीर सैनिका तुम्हास वंदितो मी
तुम्हामुळे सुरक्षित देशात  आम्ही

थंडगार  बर्फात तुम्ही सावधान
महापुरातही तुम्ही वाचवता प्राण
देशासाठी घरादाराची देता कुर्बानी

त्यागशौर्याला नसे तुमच्या सीमा
देशापुढे कशाची न ठेवता तमा
कष्टमय जीवनाला देऊया सलामी

 वाघासारखे शूर जिगरबाज तूम्ही
देशप्रेम ज्वाला पेटती ज्योत तुम्ही
सर्वस्व वाहिले या देशासाठी नामी

कवी-महेश लोखंडे शूरवीर सैनिका

शूरवीर सैनिका #poem

7becd706c0a352950c0040b56423a5ef

Mahesh Lokhande

जयघोष

वंदे मातरम जयहिंद 
भारत माता की जय
एकमुखाने गर्जूया 
प्रजासत्ताक दिनाचा विजय

करेंगे या मरेंगे
निर्मल भारत सारा
चले जाव भ्रष्टाचार
यही हमारा नारा

जय जवान जय किसान
जय विज्ञान जय हिंदुस्थान
वीर हमारी शान
उनको हमारा प्रणाम

इन्कलाब जिंदाबाद
एक रहो ना करो वाद
क्रांती करो ना करो जिहाद
शहीद वीरोंको करो याद

कवी-महेश लोखंडे जयघोष

जयघोष #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile