Nojoto: Largest Storytelling Platform
pawarrohan5871
  • 7Stories
  • 14Followers
  • 25Love
    0Views

Pawar Rohan

  • Popular
  • Latest
  • Video
7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

हरवलोय मी

तुझ्या असण्याने आयुष्य आहे,
तुझ्या नसण्याने सर्व काही व्यर्थ आहे
तुझ्या होकारात माझे जीवन आहे,
नकार तुझा मला म्रुत्यू समान आहे
कधी स्वप्नात माझ्या, कधी सत्यात असते
कधी आठवणीत माझ्या दाटून येते,
कधी श्रावणधारा बनुनी बरसते,
कधी गंध मातीचा बनुनी दरवळते,
कधी फुलांपरी बहरुनी येते,
कधी पाखरांपरी हुंदडत राहते,
कस जगावं काही कळत नाही...
मिटावे डोळे तर तुझ्याशिवाय काही दिसत नाही,
विचार जरी आला मनात तर त्यात ही तू असतेस
तुझी ओढ लागलेय इतकी की जिथे तिथे तुच दिसतेस
सांग आता तू
कस आवरू मी स्वत:ला,
कसं सावरू मी स्वत:ला
हरवलोय मी कुठे, शोधू कुठे स्वत:ला... Rohan....

Rohan.... #poem

7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

अरे माणसा...

अरे माणसा,
तुला हा मोह कसला
मी ही माणूस, तू ही माणूस
तुला हा गर्व कसला

जगतो आहे तू जगत राहिला
स्वार्थासाठी धडपडत राहिला
कसला होता हेवा तुला तू माणूसकी विसरला
अरे माणसा...

उमलताच कळी गर्भाशयात तू मारलेस तिला
हवी आहे तुला आई, बहिण अन् बायकोसुद्धा
मात्र मुलगी नको तुला
अरे माणसा...

पैशासाठी विकलेस देशभक्त जवानांचे कफन तू
भ्रष्टाचार केला अन् केले दंगे फसाद ही तू
काय मिळाल हे सर्व करुन तुला
देशभक्तीच्या नावाखाली तू लुटलेस देशाला
अरे माणसा...

इतके शिकूनही तू अडाणीच राहिलास
धर्म, जात, भाषा अन प्रांत विवादामध्ये गुंतत गेलास
पर्वा नाही केलीस तू कधी आपल्या माणसांची
माणूस असूनही तू माणुसकीला कलंक लावला
अरे माणसा... bighadaleli samaj vyavasta...

bighadaleli samaj vyavasta... #poem

7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

मला हवाय मृत्यू...

डोळ्यात भीती नसताना शत्रू पुढे उभा असेन,
श्वास मिटेल शेवटचा जेव्हा शव शत्रूचे धारातीर्त पडलेले असेल,
शत्रूला ही थरकाप बसेल तुझ्या वीर पुत्राचे रुद्र रूप पाहता,
मला हवाय मृत्यू जो गौरवशाली असेल...

वाऱ्यामुळे ना सही श्वासामुळे फडकेल,
अश्रू गाळीत भारत माता तिरंगा छातीवरती असेल,
हिमालयाच्या उंचीहूनि त्याची गाथा,
मला हवाय मृत्यू जो तिरंग्यासाठी असेल...

देह पडलेला भूमीवरती भारत मातेच्या कुशीमध्ये असेल,
रक्ताने नाहलेली मातृभूमी दरवळेल वाऱयातूनी आसेतुहिमाचल,
संपूर्ण विश्वात कीर्तिवान असेल माझी भारत माता,
मला हवाय मृत्यू जो मातृभूमीसाठी असले... Rohan Pawar... Mla havay mrutyu...

Rohan Pawar... Mla havay mrutyu... #poem

7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

तुझी वाट पाहीन

काल तुझ्या नकाराने जणू आभाळच कोसळलं.
पावसाच्या माऱ्याने पुरात वाहणार गाव तसं माझं हृदय गेलं,
सुंदर गाव, ओबड-धोबड वाढलेली झाड, जे ओसाड पडलेलं, 
पडलेल्या इमारती पाहून थक्क होणार मन,
तुझ्या नाकारणं आज अस्वस्थ झालं,
काय करावं, काय नाही काहीच कळतच नव्हतं,
फक्त तुझा विचार चालू होता,
मनात संघर्षाचं वादळ होत,
खोल सागराच्या तळात मन डुबत होत,
जगण्याची आस नव्हती, मरण्याची भीती नव्हती,
मी तर सर्वस्व हरलो होतो, तुझ्या शिवाय हरवायला दुसरी कोणती गोष्ट नव्हती,
तुला समजवून आता थकलो होतो,
प्रेमात तुझ्या प्राण पणाला लावून बसलो होतो,
फक्त एकच इच्छा मनात अजून हि वावरतेय,
तू येणार, तू नक्की येणार, विश्वास मनी भासवतेय,
क्षणामागून क्षण जातील दिसामागून दिस
मृत्यूच्या दारात असूनही तुझी वाट पाहीन मी,
आयुष्यभर... Rohan Pawar

Rohan Pawar #poem

7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

कैसे कहू तुझे

कैसे कहू तुझे, मेरे दिल में है क्या,
अगर कह भी दु तो, प्यार मेरा समज सकोगी क्या,

ना तुम्हारे सीवा कभी देखा है किसीको,
मोहब्बत कि काई तुमसे, ना चाहा तुम्हारे सीवा किसी को,
तुमसे लगाया है दिल, हाल दिल का जाण सकोगी  क्या,
कैसे कहू तुझे, मेरे दिल में है क्या,
अगर कह भी दु तो, प्यार मेरा समज सकोगी क्या,

जब मुस्कुरा ये तुम, बरसे बिन बदलो कि धारा,
जब छुके गुजर जाओ तुम, लगे हलकी हवा का झोका आवारा,
मिठासा दर्द होता है दिल में याद आये जब तुम्हारी,
इस दर्द कि दवा हो तुम, मरहम बन जाओगी क्या,
कैसे कहू तुझे, मेरे दिल में है क्या,
अगर कह भी दु तो, प्यार मेरा समज सकोगी क्या,

बाते करता हू चांद-तारो से तुम्हारी जब याद सताती है,
बातो-बातो में सो जाता है चांद रात ढल जाती है,
कटने से ना कटती है घड़ी, आस तुम्हे देखने की लग जाती है,
पल पल जान जाती है मेरी, तुम जिंदगी बन जाओगी क्या
कैसे कहू तुझे, मेरे दिल में है क्या,
अगर कह भी दु तो, प्यार मेरा समज सकोगी क्या,

अब तो खुद को भी भुलने लगा हू, जबसें तुम मुझ में बसने लगे हो,
आइने में भी देखू खुद को, अब तुम ही दिखने लगे हो,
न जाने हाल मेरा हुआ है कैसा, बस तुझमें ही खोने लगा हू,
होने लगा है प्यार तुमसे, इस दिवाने से प्यार करोगी क्या,
कैसे कहू तुझे, मेरे दिल में है क्या,
अगर कह भी दु तो, प्यार मेरा समज सकोगी क्या...


- रोहन पवार Rohan pawar

for someone who is in my ♥ Heart

Rohan pawar for someone who is in my ♥ Heart

7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

आठवण

आठवतात ते दिवस मला, 
पहिल्यांदा पाहिलं होतं जेव्हा मी तुला ,
नकळत प्रेमात पडलो होतो तुझ्या,
कळी उमलली प्रेमाची ती मनात माझ्या,
स्मिथ उमले ओठी, बावरे मन माझे होत असे,
रुप तुझे शीतल चंद्रापरी मनमोहक दिसे 
आवाज तुझा कानी माझ्या अजूनही गुणगुणतो,
पहिला स्पर्श तुझा अजूनही मला जाणवतोय
ती भेट पहिली तुझी अन् माझी,
अजूनही मला आठवते,
भास ही तुझेच होतात,
कमी तुझ्या असण्याची जाणवते,
विचारात तुझ्या गुंतलो असताना,
भान ही नसते माझे मला,
विसरूनी जातो मी स्वतःला,
आठवण येते तुझी, क्षणाक्षणाला...


- रोहन पवार Miss you... 😎

Miss you... 😎 #poem

7d6af942e61a65797426030b9203c3f8

Pawar Rohan

साथ तुझी

नकळत पडलो प्रेमात तुझ्या
नकळत गुंतत गेलो तुझ्यात
भास हि तुझे होऊ लागले
हरवून जाई तुझ्या स्वप्नात
चंद्र चांदण्यात पाहतो तुला
गंध मातीचा भासतो तुझा
स्पर्श वाऱ्याचा जाणवतो तुझा
फुलपाखरापरी चंचल स्वभाव तुझा
सतत विचार तुझे, सतत आठवणी तुझ्या
स्वप्ने ही माझी, मात्र त्यात चेहरा तुझा
ओढ लागली तुझी माझ्या मनाला
करमत ही नाही तुझ्याविना बावऱ्या जीवाला
कस सांगू मी तुला, विश्वास तरी ठेवशिल का...?
माझ्या प्रेमाला होकार तू देशील का...?
गुपित हे प्रेमाचं आज सांगतोय मी तुला
देशील का साथ तुझी आयुष्य भरासाठी मला...

- रोहन पवार i wrote this poem for my first love.

i wrote this poem for my first love.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile