Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4500341513
  • 9Stories
  • 65Followers
  • 48Love
    0Views

Akshay Bhosale

  • Popular
  • Latest
  • Video
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

........गझल.......
कवळी रात्र ,हळवी तु
नभी शुक्राची चांदणी तु

कृष्णाची राधा, बावरी तु
स्वर्गी अप्सरा, सावळी तु

हिवाळा, उन्हाळा पाऊसाळा तु,
गुलाबी हवेचा, झोपाळा तु

मोगरा जाई,  जुई गं तु
चंदनी दरवळ सुगंध तु,

निर्मळ सागर, बादल तु
खळ खळत्या लाटेचा आनंद तु, 

प्रितीचा मधाळ, गोडवा तु
दडलेल्या मनातील, भावना तु,

भावना मनातील, गझल तु
उसळत्या शब्दांचा कीनारा तु,

फुलपाखरू, बगीचा फुलांचा तु
पाखरांच्या मिलनांची, सावली तु,

झाकळत्या सुर्याची, कीरण तु
कमळ कळीच, फुलनं तु,

रूसरी,लाजरी परि गं तु
हृदयाची माझ्या,  राज कुमारी तु.

                      अक्षय भोसले.
                बारामती.

©Akshay Bhosale #Star
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

*........ कविता......?*
का गं तु अशी सोडुन गेलीस
काळीज माझं तुडवून गेलीस
 
         खोलवर जख्मा रूजवूण गेलीस
आसवांचा पाझर फोडुन गेलीस.....

का गं तु अशी सोडुन गेलीस
स्वप्न जिवनाचं जाळुन गेलीस

        नशिबाचा चंद्र घेऊन गेलीस
दुःखी अमावस्या लावुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
अर्ध्या वाटेत हात सोडून गेलीस

          दिलेलं वचन विसरून गेलीस
धागा नात्याचा उसवुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
फुलास प्रितीच्या सुकवून गेलीस

         भोळ्या मनास विसरून गेलीस
वेडा बनवुन निघुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
गालावरचं हसन घेऊन गेलीस

        भावना मनाच्या सोलुन गेलीस
पाखराचे पंख छाटून गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
विष प्रेमाचं पाझुन गेलीस

         श्वासातला श्वास घेवुन गेलीस
देह आत्म्याचा जाळुन गेलीस.....

का गं तु  येवढी निष्ठुर झालीस 
निष्ठुर मनाने निघुन गेलीस
        का गं तु अशी सोडुन गेलीस.......
                   अक्षय भोसले
               (बारामती

©Akshay Bhosale #WalkingInWoods
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

...जरा माणसात यारे
           ..जरा माणसात या...
.जाती-धर्मात जाती यतेची दंगली घडवणाऱ्या,मनुवादी विचारांच्या नासलेल्या बुध्दीच्या गाढवांनो,
             .छञपती शिवरायांच्या
फुले-शाहु आंबेडकरांच्या अशा अनेक महा-मानवांच्या विचारांची आणि पुतळ्यांची विठंबना करनाऱ्या भडव्यांनो,
    .जरा माणसात यारे
जरा माणसात या...........
पांढरी- शुभरी कपडे नेसुन,हात पाय जोडुन,आश्वसने झाडुन,मोठा मोठाली भाषने ठोकुन जनतेच्या मतांवर निवडणूक लढुन त्यांचीच पिळवुणुक फसवणुक करणाऱ्या हारमखोर मंञ्या संञ्या नेत्यांनो,
          .जरा माणसात यारे
  जरा माणसात या.......
खाकी वर्दी वाल्या रं,काळ्या कोट वाल्या,
सरकारी हुद्या वाल्या रं,खाजगी हुद्या वाल्या
टेबला खालचा भाड खाणाऱ्या,
भ्रष्टाचार चाटनाऱ्या लाचार कुञ्यांनो
         .जरा माणसात यारे
जरा माणसात या.........
आया-बहीनींची छेड छाड काढणाऱ्या रोड-रोमीयो माकडांनो,
अबरू-इज्जत लुटनाऱ्या वासनांच्या भुकेल्या गिदाडांनो
जाच-हाट करणाऱ्या,अत्याचार करणाऱ्या,
गर्भ पात करणाऱ्या ना मर्द स्वार्थी लाडग्यांनो,
                    .जरा माणसात यारे
जरा माणसात या.......
बूवा-बाजी करणाऱ्या,लिंबु-मीर्ची मारणाऱ्या,
करनी-धरनी करणाऱ्या
देव दुतांच्या नावावर लुटा-लुट करणाऱ्या,
स्वार्था पोटी बळी बकरी घेणाऱ्या राक्षसी गणांच्या,अंधश्रध्देच्या विचारांनो
            जरा माणसात यारे
जरा माणसात या.........
विचार करा जरा,आचार करा भारत मातेचा विकास करा,
मनाने,तनाने,मानसीक विचाराने फक्त आणि फक्त तुम्ही भारतीय व्हा,
    जरा माणसात यारे
जरा माणसात या....‌..
स्वाभिमानी मनाचा,ताट मानेचा
पुरोगामी विचाराचा सच्चा भारतीय व्हा रे तुम्ही
भारतीय व्हा...........
आणि
मानुस बणुनी माणसात या,
जरा माणसात यारे
जरा माणसात या.......
                 कवी/अक्षय भोसले
              दि.०५/०२/२०२१
             (बारामती)

©Akshay Bhosale जरा माणसात यारे,
जरा माणसात या.....

#lockdown2021

जरा माणसात यारे, जरा माणसात या..... #lockdown2021

7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

प्रधानमंत्री जी मोदी जी,

तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला
कोरोना पाहुन तुम्हाला हसला
 हसला तो हसला पण जनतेलाच डसला
हे काय करूण मोदी जी
तुम्ही वं बसला

दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला
पण कोरोना जागचा नाही वं हटला

              हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला
अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला

मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला
पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला

            मोदी जी,
आज तुमच्या माहागाईने मारलं
अन् कोरोनाने जाळलं
खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं.....

               अक्षय भोसले
                   बारामती..

©Akshay Bhosale #BaatPMSe
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

Dear Prime Minister मोदी जी,

तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला
कोरोना पाहुन तुम्हाला हसला
 हसला तो हसला पण जनतेलाच डसला
हे काय करूण मोदी जी
तुम्ही वं बसला

दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला
पण कोरोना जागचा नाही वं हटला

              हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला
अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला

मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला
पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला

            मोदी जी,
आज तुमच्या माहागाईने मारलं
अन् कोरोनाने जाळलं
खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं.....

               अक्षय भोसले
                   बारामती..

©Akshay Bhosale #BaatPMSe
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

*...........कविता........*

तुला पाहता पाहता गं प्रेम झाले 
काळजाचे गं फुल झाले
नयनांचे गं स्वर्ग झाले
हात हाती घेता, जीवाचे नाते झाले....

           तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
आयण्याला गं रूप आले
चंद्राला गं हसु आले
सोबतीने  तुझ्या,जिवनाला माझ्या अर्थ आले....

तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
रातीचा गं दिस झाले
स्वप्न माझे जागे झाले
येता नजरे समोर तु,स्वर्गि अप्सरा गं वाटे.....

                   तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
शितीजाला गं बहर आले
पाऊसाला गं सुर आले
हसता गाली तुझ्या गं, इंद्रधणुष्याचे रंग आले....

तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
कवि मनाचे गं गित झाले
धड धड ह्रदयाचे गं संगित झाले
तुझ्या अन् माझ्या प्रितला गं, मैञी जीवाचे रंग आले.....

                 तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
साता जल्माचे लव झाले
जीव की प्रानाचे श्वास झाले...

कवी/ अक्षय भोसले
बारामती..

©Akshay Bhosale #womensday2021
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

*.....  *...... *ती* *..... *.....*

अर्ध्या वाटेत माझी, सोडुनी साथ गेली
नागीनी सारखी माघे, सोडुनी कात गेली,

नको नको ते बोलुन, रागात फार गेली
काळजावरी माझ्या ती, घालुनी घाव गेली,

शब्दांच्या तलवारीने मन माझं, चिरूनी गेली
रक्ताळलेल्या मनाला, तीथेचं सोडुनी गेली,

स्वप्नांना साऱ्या माझ्या, लावुनी आग गेली
हसऱ्या सुखात माझ्या, उधळुनी राख गेली,

गेली ती गेली,  पण आठवणी सोडुनी गेली
अन् त्या आठवणींनी माझी, आज बरबादी फार केली,

हातातला हात माझ्या, सोडुनी दुर गेली
अजनबी पाखराशी, जोडुनी नातं गेली,

अखेरच्या श्वासा पर्यंत, वाट तीची मी पाहीन
डोळ्यात तीच्या प्रेम, पाहुनी प्रान सोडीन,

जळत्या ही चिते मधुन, तीलाचं पाहतं जाईन 
फुडचा ही जल्म माझा, तीच्याचं साठी जाळीन

कवी/अक्षय भोसले
बारामती..

©Akshay Bhosale #Smile
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

कविता*

*आई कुठे काय करते.. ?*

नऊ महीने नऊ दिवस जिवन मरनाच्या कळा सोसुन, तीने तुला जल्म दिला,

आपल्या छातीशी कवटळुन आमृताच्या पान्ह्याने जिवन तुझं तीने तृपत्त केलं,

मग कसं काय म्हणतोस वेड्या,की *आई कुठे काय  करते.. ?*

प्रेम,माया, ममता काळजी, असं तीचं सार सरवस्व तीने,तुझ्या साठी वाहीलं,

जरा तुला ठेचं लागताचं, अश्रुंचा महा-सागर घळा घळा तीच्या डोळ्यातुन वाहीला रे,

मगं कसं काय म्हणतोस, वेड्या *आई कुठे काय करते..?*

तीच्या स्वप्नांचा तीने गळा घोटुन,तुझ्या स्वप्नपृर्ती साठी मेहनतीने आणि चिकाटीने जमवलेली पै ना पै तुझ्या हाती दिली तीने,

तु उंच यशाची भरारी घेण्यासाठी, तुझ्या पंखात आत्मविश्वासाचं बळं भरलं तीनं,

मगं कसं काय म्हणतोस वेड्या, की *आई कुठे काय करते..?*

तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी,तव्याचे चटके अन् चुलीची धग धगती आग सोसुन, तुझ्या साठी, तुझ्या आवडीचं रोज जेवन बनवते,

आरे तीच्या आयुष्याचा सेंकन्द ना सेंकन्दं फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी धरपडत असतो,

मगं कसं काय म्हणतोस वेड्या, की *आई कुठे काय करते..?*

रोज न चुकता देवापुढे पदर पसरून,हात जोडुन भर भरून आयुष्य तुझ्या साठी ती मागत असते,

आरे जरा तु नजरे आड झाला की तीच्या मनाची आणि जिवाची घाल मेल तुझ्या वाटेला डोळा लाऊन बसलेली असते,

मगं कसं काय म्हणतोस वेड्या, की *आई कुठे काय करते..?*

कीती ही, तु तीला दु:ख दिलं,
ञास दिला,हानलं मारलं तरी ही ती तुझ्याचं सुखाचा विचार करतं असते रे,

कारण ती देव रूपी आई असते,

आता तरी म्हणा वेड्या, की
*आई सगळं काही करते..३*

       

                   *अक्षय भोसले*
                   *बारामती

©Akshay Bhosale #MothersDay2021
7e68114e48e77707af74deba9b463150

Akshay Bhosale

*आज दिस माझ्या आईचा,* 
कोकराच्या माईचा
वासराच्या गाईचा
आभाळाच्या छायेचा
ममतेच्या मायेचा.......


 *आज दिस माझ्या आईचा*
चांदो मामाच्या गोष्टीचा
अंगाईच्या बासुरीचा
मांडीवरच्या झुल्याचा
स्वर्ग गादिच्या खुशीचा.......


 *आज दिस माझ्या आईचा*
कष्ट करणाऱ्या माईचा
तळहाताच्या फोडाचा
गोड गोल फुगणाऱ्या भाकरीचा
भुख भागवणाऱ्या गासाचा.......


 *आज दिस माझ्या आईचा*
अमृत दुधारी पान्ह्याचा
तोंड पुसणाऱ्या पदराचा
काळजी करणाऱ्या काळजाचा
ठेच लागताचं शब्द फुटनाऱ्या आईचा......


 *आज दिस माझ्या आईचा*
दैवी रूप त्या मुर्तीचा
यश कीर्ती त्या आशिर्वादाचा
अन्
जिजाऊ माझ्या मातेचा
साविञी माझ्या माईचा
अहिल्या माझ्या देवीचा
रमाई माझ्या आईचा......

 *आज दिस माझ्या आईचा*
 *आज दिस माझ्या आईचा*.....



                 **अक्षय भोसले* 
                 *बारामती**

©Akshay Bhosale Happy mother's Day....

#MothersDay2021

Happy mother's Day.... #MothersDay2021


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile