Nojoto: Largest Storytelling Platform
mudhals5016
  • 14Stories
  • 1Followers
  • 104Love
    884Views

mudhals

  • Popular
  • Latest
  • Video
80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

तू घरी नसल्यावर ,
मोठं मोठं लागत घर
पाऊल ठेवता घरात 
आठवणींची येते सर.
         
    - साहेब मुधळ

©mudhals
80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

दीपावली निमित्त आपणा सर्वांना 
मनःपूर्वक शुभेच्छा💐


ऊन सावल्या येतील जातील,
 कोंब जपावे आतील हिरवे,
चला दिवाळी आली आहे, 
ओंजळीत घ्या चार दिवे.
पहिला लावा थेट मनातच,  
तरीच राहील दुसरा तेवत 
घरात आणि प्रियजनांच्या, 
आयुष्यावर प्रकाश बरसत.
तिसरा असू दे इथे अंगणी, 
उजेड आल्या गेल्याना ही
चौथा ठेवा अश्या ठिकाणी,
जिथे दिवाळी माहीत नाही.

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

" ' तू 'च माझी दुर्गा "

नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाच्या
 साडया नेसून वावरणाऱ्या  स्त्रिया बघून ,
 ठिगळ लावलेली दोनच लुगडी 
आलटून पालटून नऊ दिवस नेसणारी 
माझी माय  मला आज आठवते.
मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्यायची 
कधी गरज वाटलीच नाही. 
कारण देवीची सगळी रूपं मला 
शेतात राबणाऱ्या माझ्या  माईतच दिसली.
कपाळभर मळवट भरून, 
हातात फावड घेऊन, 
बांधावर काम करणारी 
माय मला दुर्गा वाटायची.
लोकांच्या शेतात दिवसभर मजुरी करून 
माझ्या शाळेची फी भरणारी अडाणी
माय मला सरस्वती वाटायची.
स्वतः उपाशी राहून,
"फडक्यात बांधून दिलेली भाकर वेळेत खा."
 म्हणून पाठीवरून हात फिरवणारी माय 
मला अन्नपूर्णा भासायची.
कुठलीही कुरकुर न करता
 संसाराचा गाडा निर्भीडपणे रेटणारी माय
 मला गृहलक्ष्मी सारखी वाटायची.
तिच्या पायावर डोकं ठेऊन
 तिच्या कुशीत विसावलो की,
 तेहतीस कोटी देव प्रसन्न 
झाल्यासारखे वाटतात आजही.
म्हणून,
 माझ्या देवीसमान मायी च्या पायावर
रोज एकदा मस्तक ठेवावे वाटते.
                                             
                       - साहेब मुधळ

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

         माय माझी दुर्गा

नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाच्या
 साडया नेसून वावरणाऱ्या  स्त्रिया बघून ,
 ठिगळ लावलेली दोनच लुगडी 
आलटून पालटून नऊ दिवस नेसणारी 
माझी माय  मला आज आठवते.
मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्यायची 
कधी गरज वाटलीच नाही. 
कारण देवीची सगळी रूपं मला 
शेतात राबणाऱ्या माझ्या
  माईतच दिसली.
कपाळभर मळवट भरून, 
हातात फावड घेऊन, 
बांधावर काम करणारी माय
 मला दुर्गा वाटायची.
लोकांच्या शेतात दिवसभर मजुरी करून 
माझ्या शाळेची फी भरणारी माय
 मला सरस्वती वाटायची.
स्वतः उपाशी राहून 
"फडक्यात बांधून दिलेली भाकर वेळेत खा."
 म्हणून पाठीवरून हात फिरवणारी माय 
मला अन्नपूर्णा भासायची.
कुठलीही कुरकुर न करता
 संसाराचा गाडा रेटणारी माय
 मला गृहलक्ष्मी सारखी वाटायची.
तिच्या पायावर डोकं ठेऊन
 तिच्या कुशीत विसावलो की,
 तेहतीस कोटी देव प्रसन्न
 झाल्यासारखे वाटते आजही.
म्हणून,
 माझ्या देवीसमान माईसमोर
 रोज नतमस्तक व्हावेसे वाटते.

                        - साहेब मुधळ

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

फोडूनी टाहो कुणाला 
लाभला येथे जिव्हाळा?
माणसांच्या सावल्यांचा
देश हा आहे निराळा.
                -  सुरेश भट

©mudhals #Language_of_tears
80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

घडवताना 
माय मला
चंदनापरी 
झिजलीस तू......!
सुखाच्या 
सावलीसाठी 
माझ्या
माय,
घामात किती 
भिजलीस तू.......!

     - साहेब मुधळ

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

HAPPY  NEW YEAR  


वर्ष निसटले चोर पाऊली
उरले होऊन तारीख केवळ. 

संकल्पाचे नवे धुमारे
पुन्हा झटकतील सारी मरगळ.

चुकले त्याला अनुभव म्हणुनी
हुकले त्याला हसून टाळू.

डाव तोच पण मांडू नव्याने
जोवर शिल्लक मुठीत  वाळू.

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

प्रिय शिवाजी लोहोट सर यांस,


मैत्रीचा अलंकार तुम्ही 
ज्ञानाची तलवार तुम्ही
 मदतीचा हात आणि 
अन्यायावर वार तुम्ही
जो भेटत गेला त्याच्याच 
वयाचे होत गेला तुम्ही
कधी तरुण, कधी अल्लड,
कधी गाईड झालात तुम्ही
कामप्रती प्रामाणिक अन
 ज्ञानदानाला हात सढळ
तुमच्यासाठी मनातआमच्या 
कायम राहील स्थान अढळ
                                                      
             - साहेब मुधळ

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

प्रिय, अशोक यमगर सर यांस,


सर ज्ञानाचे भांडार तुम्ही ' घकव्य' चा आधार तुम्ही 
जिज्ञासा अन् कडकशिस्तीचे प्रबळ दावेदार तुम्ही.

पस्तीस वर्ष आयुष्याचे ' मनपा'स दिले सर दान तुम्ही
चौकटीत नियमांच्या बसले तेच केले सर काम तुम्ही.

होते आपुले नाते आजवर औपचारिक अन् नियमांचे
इथून पुढे मनातल्या आपुलकीचे आणि प्रेमाचे.

चाकोरीबद्ध जगण्यातून तुम्ही घेताय जरी निवृत्ती
 पुढील आयुष्याची आहे सर ही नवीनकोरी  आवृत्ती.

काही क्षणांचा प्रवास हा मनात कायम जपून ठेवा
निवृत्तीच्या एकांत वेळी आठवणींचा घ्या मागोवा.

 पूर्ण होवोत तुमच्या  इच्छा, आकांक्षा, स्वप्न सारी
असंच हसत हसत तुम्ही सर पार करावी शंभरी.
                                 
                                          - साहेब मुधळ
                                   मुख्य लिपिक ( आस्था-१ )

©mudhals

80199db770b7ca663e757afe91c5ce07

mudhals

एक ओंजळ लागते हळव्या मनाची,
चांदणे कधीच पोत्यात भरता येत नाही...
     
शुभ सकाळ... #lost
loader
Home
Explore
Events
Notification
Profile