Nojoto: Largest Storytelling Platform
komalborkar6567
  • 12Stories
  • 20Followers
  • 107Love
    0Views

komal borkar

  • Popular
  • Latest
  • Video
81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

White फातिमा! 

निर्भयतेने लढणारी फातिमा
उस्मान शेखची बहीण होती
स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी
फातिमा  समाजाची ढाल होती!

परंपरेला न जुमानता 
घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, 
जात, धर्म बाजुला ठेवून
इथल्या बहुजनांना शिकविले! 

सावित्रीसोबत शिक्षण घेऊन
शाळेत जाऊन शिकवू लागली
शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन
पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! 

घर सोडले फुले दाम्पत्याने
तेव्हा आसरा दिला फातिमाने
शाळा उघडली सावित्रीने
तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! 

अन्यायाचा प्रतिकार करत
न्याय दिला  गोरगरिबांना
स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन
कणखर बनवलं दीनदुबळ्यांना!

©komal borkar #sad_quotes  मराठी कविता संग्रह

#sad_quotes मराठी कविता संग्रह #मराठीकविता

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

White महापरिनिर्वाण दिन

मनुस्मृतीने तुला निच समजलं
तुला दासी समजुन उपभोगल
त्या मनुस्मृतीच दहन करून
आम्हा स्त्रियांना सन्मान मिळाला
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? 

आरक्षण तुम्हालाच दिलं म्हणत
कलम 340, 341,342लिहुन
या संपूर्ण बहुजन समाजाला न्याय दिला 
म्हणून आम्ही  डॉक्टर ,वकील, पायलट झालो
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? 

रूढी परंपरेने जखडलेल्या स्त्रीला
कधी वारसाहक्काने नाकारले तर 
कधी समाजाने नाकारले त्या स्त्रियांना
हिंदू कोटबील देऊन गुलामगिरीतुन मुक्त केलं
तरी म्हणतात  बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? 


पाणी पिण्याची मुभा नव्हती 
चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन
मानवमुक्तीचा लढा दिला , 
पुरूषांसमान हक्क देऊन
प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया उच्च पदावर  गेल्या
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल? 

शुद्र म्हणत मंदिराचा प्रवेश नाकारला
काळाराम मंदिराचा सत्याग्रह करुन
इथल्या मनुवाद्यांचा विटाळ दुर केला
तरी म्हणतात बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केल? 

गर्भवती महिलेसोबत गर्भात असलेल्या
बाळाची काळजी घेणारा कायदा लिहुन
सर्वाना समता , स्वातंत्र्य, बंधुतेचा आधार दिला. 
संविधान देऊन या भारताला समतेचा थारा दिला 
तरी म्हणतात बाबासाहेबांनी  आमच्यासाठी काय केलं. ?

©komal borkar #sad_quotes  मराठी कविता

#sad_quotes मराठी कविता #मराठीकविता

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

White समाजसुधारक महात्मा फुले

मुलींसाठी शाळा सुरू करून
स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखविला
पाण्याचा हौद चालू करून, 
अस्पृश्यांचा नवा इतिहास घडविला... 

सावत्रीआईना शिकवून
नवा आदर्श समाजासमोर ठेवला
नाव्ह्यांचा संप घडवून , 
अनिष्ठ रुढीपरंपरेचा त्याग केला... 

मनुवाद्यांशी लढा देऊन
मूलनिवासी लोकांना न्याय दिला 
विधवा पुनर्विवाह  करून
महिलांचा सन्मान केला... 

बहुजनासाठी शाळा सुरू करुन
मनुवाद्यांवर घणाघाती प्रहार केला
सत्यशोधक समाजाची स्थापना करुन, 
सत्य आणि मानवतेचा लढा दिला... 

शिक्षणासाठी वस्तीगृह चालू करुन
अनेकांचा उध्दार केला
गुलामगिरीला नष्ट करून, 
बहुजनांचा क्रांतिकारक होऊन गेला...

©komal borkar #sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता

#sad_quotes समाजसुधारक महात्मा फुले मराठी कविता #मराठीकविता

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

White संविधान 

अंधारच होता नशिबी आमच्या
संविधान देऊन परिवर्तित केलं भीमानं, 
जेव्हा माणूस माणसांचा गुलाम होता, तेव्हा
समानतेचा हक्क  देऊन, गुलामी दुर केली संविधानानं. 


चुल आणि मुलंच आमचं अस्तित्व म्हणत
50टक्के आरक्षण देऊन साक्षर केलं स्त्रीयांना, 
पतिच्या संपत्तीत समान वाटा देऊन
सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानानं. 


आरक्षन देऊन अठरा पगळ जातिला 
बळकट बनवलं इथल्या बहुजनांना, 
स्वातंत्र्य देऊन इथल्या भारतीयांना
सुट-बुटात आणलं संविधानानं. 


प्रसुती रजा देऊन मातेला
गर्भातल्या बाळाची काळजी घेतलं संविधानानं, 
जन्मताच हक्क प्रदान करून
भारतीय होण्याचा सन्मान मिळाला संविधानानं.

©komal borkar #sad_quotes संविधान दिवस

#sad_quotes संविधान दिवस #मराठीकविता

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

चला मतदान करूया! 

चल दादा मतदान करु
आपल्या हक्काचा माणुस निवडून देऊ
तुझं-माझं भविष्य उज्वल करु 
लोकशाहीला बळकट बनवु! 

एका दारुच्या बाटलीसाठी
आपली  मत नको  विकू, 
पंधराशे रुपये भेटले म्हणून
आयुष्यभर गुलामीची बेळी
गळ्यात नको टाकू! 

रात्रभर चिकन मटन खावुन
पैश्याने खिसे भरून
बेरोजगारीने पिळलेल्या 
मुलाचे भविष्य  धोक्यात नको घालु! 
फक्त निवडणुकीपर्यंतच
मानाच स्थान मिळालं म्हणुन
लोकशाहीच्या विरुद्ध नको चालू!

जाती -धर्माच्या नावाखाली 
हजारो आमिष दाखवतील
तरी तु विकला जाऊ नको
कितीही घोषणा देऊन 
फसवणूक करतील
तरी तु आपला स्वाभिमान गहान ठेवु नको!

©komal borkar #मतदान करु, लोकशाहीला बळकट बनवु# motivational thoughts in marathi  motivational thoughts in marathi  motivational quotes in marathi

#मतदान करु, लोकशाहीला बळकट बनवु# motivational thoughts in marathi motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

महान क्रांतिकारक, समाजसुधारक, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे 
महान विद्वान पंडित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏

एक क्रांतीची मशाल, स्त्री कर्तुत्वाची प्रेरणा, 
बहुजनांचे कैवारी, दिन दुबळ्यांचा महान सुर्य, समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले .
ज्या महान सुर्याने स्वत:च संपूर्ण जीवन इथल्या बहुजन समाजासाठी खर्ची केल, बहुजनासाठीच नाही तर इथल्या ब्राह्मण वर्गातील स्त्रियांना लढण्याचे सामर्थ्य दिलं.स्त्रि ही जरी ब्राह्मण वर्गातील असली तरी तीलाही बंधने होती,  पुरुषप्रधान संस्कृती  असल्याने तीलाही हिन दर्जाची वागणूक मिळत होती
म्हणून समाजातील सगळ्या स्त्रियांना सन्मानाने जगता यावं यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. 
1940ला जेव्हा महात्मा ज्योतीबा फुलेंच लग्न माता सावित्रीआई सोबत झाले तेव्हा  ज्योतीबा 12वर्षाचे आणि सावित्रीआई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या, सावित्री आई शिकल्या नव्हत्या,परंतु सावित्रीला शिकण्याच धाडस होतं,
त्या लहानपणापासूच कर्तुत्वान होत्या,परंतु त्या काळामध्ये  स्त्रिया शिक्षण घेण म्हणजे महापाप समजल्या जात होतं. स्त्रियांना अबला समजल्या जात होत, स्त्री शिकली म्हणजे त्या अक्षरांच्या अळ्या पडतील आणि त्या मग नवऱ्याच्या ताटात पडतील  अशा पद्धतीच्या जुलमी नियमांना त्यांना सामोरे जावे लागत होते , त्यांना घराबाहेर पडु देत नव्हते ,
अशा परिस्थितीत  महात्मा ज्योतीबांना समजलं होत की शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही  पर्याय नाही,स्त्रि शिकली तर स्वतंत्र होणार, तीचे स्वतंत्र मत असणार,घरातील मुलां-मुलींना शिकवणार, स्त्रि प्रगत होणार. 
म्हणून त्यांनी शिक्षणाची सुरूवात स्वत:च्याच  घरापासुन  केली आणि सावित्रीला शिकवलं. 
समाजासाठी त्यांनी स्वत:च्या घराचा त्याग केला, वडीलांनी विरोध केला, तरीही न डगमगता फुले दाम्पत्य लढण्यासाठी तत्पर झाले. 
हे फुले दाम्पत्य म्हणजे  चंदनासारख सुंगध देणार होतं, 
ज्या मनुवादी संस्कृतीमुळे स्त्रिवर अत्याचार केला ,स्त्रिला सती जाव लागे, नवरा मेल्यावर तीच मुंडण केल्या जात होत,तीला दुसर लग्न करण्याचा अधिकार नव्हता , अशा  गुलामीत जीवन जगणाऱ्या  स्त्रियांना सक्षम करणारे विचार अठराव्या शतकात एखाद्या पुरुषांमध्ये असणे म्हणजे एक महान थोर विचारवंतच होय. 
स्त्री ही शिकली पाहिजे ,प्रगत झाली पाहिजे म्हणून
1 जानेवारी 1848ला  पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात  मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली , आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्रीआई ह्या होत्या .शाळा ही 6 मुलींनी सुरु झाली,हळुहळु मुलींची संख्या वाढु लागली फुले दाम्पत्यांना खुप आनंद झाला,आणि त्यांची प्रेरणा वाढत गेली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक शाळा सुरू केल्या. परंतु यामुळे मनुवादी लोकांच्या पोटात दुखायला लागलं ,धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून ओरडु लागले याकडे दुर्लक्ष करत आपले कार्य सुरळीतपणे चालू ठेवले. 
इ.स 1849 ला  उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांसाठी शाळा सुरू केली.आणि तेव्हापासून  खरी शिक्षणाची सुरुवात झाली, हि शिक्षणाची सुरुवात करत असतांना ज्योतीबांच्या अनेक मित्रपरिवारांचा सहभाग होता.
केशवपन प्रथा बंद करण्यासाठी नाह्वाचा संप घडवून आणला, 1853मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली,भृणहत्त्या टाळावी म्हणुन 1864 ला अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम चालू केलं
ज्योतीबांच हे कार्य अविरतपणे चालू होते. 
1865 ला एका काशीबाई नावाच्या बालविधवेच्या मुलाला दत्तक घेतात आणि त्याच नाव यशवंत अस ठेवण्यात येते ,त्याला डॉ बनवतात,यशवंतही समाजासाठी योगदान देत असतो
पाणी हि निसर्गाची देणगी आहे, सर्वांना पाणी पिता याव साठी 1868 ला स्वत:च्याच घरी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद चालू केला. 
इ.स 1876-77 मध्ये खुप दुष्काळ पडला होता, एक वेळच्या जेवणासाठी लोकं वनवन फिरु लागली होती, भुकेने लोकांची जीव जात होते तेव्हा फुले दाम्पत्याने 52अन्नछत्रे चालु केली. 
महात्मा ज्योतीबा फुलेंना स्वत:च मुल नव्हतं म्हणून त्यांच्या  वडिलांनी म्हणजे गोविंदरावांनी दुसर लग्न करण्याचा सल्ला दिला आणि यासाठी सावित्रीआईचा सुध्दा होकार होता तेव्हा ज्योतीबा रागानेच सावित्रीला म्हणाले, "तुही असं म्हणते साऊ " तेव्हा  सावित्री हो म्हणतात,आपला 'वारसा ' समोर नेण्यासाठी, तेव्हा ज्योतीबा म्हणतात-
 की जो माझे कार्य समोर नेणार तो फुल्यांचे नाव चालवील, त्या साठी दुसरं लग्न करण्याची गरज नाही,यावरून महात्मा ज्योतिबांचे किती महान विचार होते हे समजून येते. 
स्वता 40वर्ष चंदनासारखे झिजले ,सर्वांना स्वतंत्र जगण्याची संधी दिली अशा महान व्यक्तीला  1888 ला महात्मा ही पदवी मिळाली. 
त्यांच्या या कार्याची दखल घेत कोल्हापूरचे राजरत्न सयाजीराव गायकवाड त्यांच्या कार्याची महान चर्चा बघुन फुले दाम्पत्याला   भेटायला आले, त्यांचे कार्य बघुन त्यांना गहिवरून आलं, 
अशा महान सुर्याच महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 झालं, या महान क्रांतिकारकांचे विचार मात्र संपणार नाही, यासाठी आजच्या तरुण पिढीला सक्षम होण्याची गरज आहे. 
असे महान क्रांतिकारक या जगात पुन्हा  होणे शक्य नाही,परंतु त्यांचे कार्य समोर घेऊन जाण्याच निर्धार करूया आणि त्यांच्या महान विचारांना वदंन करूया. 

जय ज्योती जय क्रांती

©komal borkar महात्मा ज्योतीबा फुले जयंती

महात्मा ज्योतीबा फुले जयंती #wishes

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

मायं म्हणे लेकराला ।


आस नगं त्या साळी- चोळीची 
फाटकचं लावीन
तुझ्या बापानं घेतलेलं।
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

 जाऊ नग तु राबाले वावरात 
आमचं आम्ही करून 
घेऊ कसं बसं ।
फक्त एवढं कर तु 
आमच्या कष्टाचं सोनं कर तु। 

भाडुं नग पैशासाठी तु
आम्ही खावु चटणी भाकर 
पण तुला देईन तुप- रोटीच जेवन 
फक्त एवढं कर तु
आमच्या कष्टाचं सोनं कर तु।

©komal borkar मायं म्हणे लेकराला 

#motherlove

मायं म्हणे लेकराला #motherlove

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

नेहमी वाट पाहते
त्या जगण्याची 

शुक्र तारेही 
लाजावे अश्या प्रेमाची ।

©komal borkar प्रेम 

#BooksBestFriends

प्रेम #BooksBestFriends

81ca2f96c1fc88d6a72dc1320fcaa769

komal borkar

समोर आहे ते नेहमी सत्यचं असतं 
अस नसतं ।
पडद्याआड असलेल्या गोष्टीमध्येही 
सत्य दडलेलं असतं।

लहान दिसणाऱ्या मुंगीमध्ये
बलाढ्य हत्तीला हरवण्याचे 
सामर्थ्य असते ।

असचं काहीस आपल्या आयुष्याचं असतं।
म्हणुन दिसणाऱ्या  प्रत्येक गोष्टीचं
सत्य ओळखायला शिका। 
 Bkomal

©komal borkar सत्य###

सत्य### #Thoughts

loader
Home
Explore
Events
Notification
Profile