Nojoto: Largest Storytelling Platform
omkarbhuvad4832
  • 2Stories
  • 1Followers
  • 8Love
    60Views

OMKAR BHUVAD

  • Popular
  • Latest
  • Video
835ba7f79b921251dc230795bc2c7736

OMKAR BHUVAD

नको आता हा प्रेमाचा खेळ सारा
उगा जातो वेळ आपला निघुनी
शेवटी हाती काहीच नसत आपल्या
उरतात त्या फक्त काही आठवणी ...

कित्येक वर्षांपासून जपलेलं नातं
शुल्लक कारणा वरून तुटून जातं
प्रेमात होतात चुका दोघांकडून ही पण
कोणीच नसतो घेत कोणाला समजुनी
मग उरतात त्या फक्त काही आठवणी.....

सुरवातीला प्रेमात सर्व आनंदी असतं
काही दिवसांनी तेच प्रेम नको का वाटतं
कोणत्याही नात्यात वाद हे होतच असतात
कोणी तरी कमी पणा घ्या स्वतःच्या मनानी
मग उरतात त्या फक्त काही आठवणी.....

असतो हा चार दिवसाचा खेळ सारा
नका येऊ देऊ मनात संशयाचा वारा
त्याच संशयाने वेगळी होतात नाती सारी 
पाहिलेली स्वप्न सारी जातात राहुनी
मग उरतात त्या फक्त काही आठवणी.....
               ओंकार भुवड..✍️
             9657975808

©OMKAR BHUVAD #Light
835ba7f79b921251dc230795bc2c7736

OMKAR BHUVAD


       त्या भेटीची आठवण....
आज जाताना ती काहीच कशी बोलली नाही
कधी केलाच फोन  तर बोलणं तिचं  कमी नाही
आज ती जास्त असं काही बोलली सुद्धा नाही
आज तिने जाताना वळून सुद्धा पाहिलं नाही...

कितीतरी दिवसांनी आज आम्ही भेटणार होतो
 समोरासमोर भेटून जास्त कधी बोललो नव्हतो
आज ती भेटणार म्हणून आस मनाला लागली 
त्या होणाऱ्या भेटीची मनात मी स्वप्न सारी रंगवली

ठरवलं होतं आज तिला सर्व मनातलं सांगेन
तिच्यावर असलेलं प्रेम आज शब्दात व्यक्त करेन
पण तिला असंशांत पाहून मी सुध्दा शांत झालो
आज ती अशी शांत का याच विचारात मी बुडून गेलो..
 
जाताना तुझ्या अबोल्याच कारण तरी सांगून जायचं
 तुझ्या अबोल्याचं नेमक मी कोणत कारण समजायचं
 तुला काही बोलायचं नव्हतं तर भेट तरी का ठरवली
या एका भेटीची आठवण माझ्या कायम मनात राहीली....

         ओंकार भुवड......✍️
       9657975808

©OMKAR BHUVAD
  ऋणानुबंध...

ऋणानुबंध... #मराठीकविता

87 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile