Nojoto: Largest Storytelling Platform
eknathdhanke2131
  • 67Stories
  • 11Followers
  • 725Love
    237Views

Eknath Dhanke

  • Popular
  • Latest
  • Video
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White बाजूस काठ दोन्ही अन् आत भोवरा
ठरवू कसे? जिवाचा वळवू कुठे झरा

वरवर स्वरूप माझे जे पाहिलेस तू 
तो मी नव्हे, न माझा तो चेहरा खरा

त्याची दरार होऊ शकते पुढे कधी
जो वाटतोय सध्या साधासुधा चरा

सगळी भडास निघते कविते तुझ्यामुळे
तू सोबतीण माझी अन् तूच मोहरा

संकल्प तोडण्याची आलीच वेळ तर
शोधून ठेव नाथा तू एक आसरा

एकनाथ

©Eknath Dhanke #emotional_sad_shayari
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White एकाएकी ना मी केले रूप आजचे धारण
माझ्यामधला काढलाय मी बिनकामाचा कण कण

जश्या जश्या मी वाढवल्या माझ्या दृष्टीच्या कक्षा
प्रसरण पावत गेले माझ्या भोवतालचे रिंगण

जीव जन्मभर मोहाची आसक्ती शमवत गेला 
दुःखे जन्मत गेली इच्छा होत राहिल्या गाभण

छोट्या छोट्या सुखांमधे मी मशगुल आहे सध्या
पाहू कुठले सुख ठरते माझ्या मुक्तीचे कारण

कोण कुणाला जसेच्या तसे अंगिकारतो नाथा
कुणास नाही येत आडवे, ज्याचे त्याचे मीपण
.
.
(वेगवेगळे बैल जुंपले दुनियेने गाड्यांना
पण सगळ्या चाकांमध्ये एकच वापरले वंगण)

एकनाथ

©Eknath Dhanke #GoodNight
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White हे कर्ज त्याचे एवढे फेडाल कोठे
मिळतो असा फुकटात अस्सल माल कोठे

इकडे उभी आधीच टोळी लांडग्यांची 
तिकडून आला वाघ तर धावाल कोठे

आत्ताच कापा पंख जर कापायचे तर
पक्षी उडाल्यावर सुरा फिरवाल कोठे

मोठीच पंचाईत झाली ऐन वेळी
तलवार दिसली पण दिसेना ढाल कोठे

नाही कळाला अजुनही धोका तुम्हाला
रस्ते अजुन झालेत तुमचे लाल कोठे

आनंद झाला आज आल्यावर तुम्ही पण
इतकेच सांगा सर्व होता काल कोठे

घेऊन मी आलोच नाथा एक श्रीफळ 
तोवर पहा तू भेटते का शाल कोठे

एकनाथ

©Eknath Dhanke #save_tiger
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White एक थरथरते शिडी अन् वेगळा पडतो असर
कोण ढासळतो, कुणाची मात्र गच्चीवर नजर

आजही सगळे सुरू आहे जसे होते तसे
राहिल्या ना फक्त पहिल्या सारख्या इच्छा जबर

व्हायचे तादात्म्य इतके की मिटावी नग्नता 
शेवटी होवोत अपुले देह उघडे फार तर

कोणत्या निद्रेत दुनिये पहुडली आहेस तू 
काय ह्याचे मी करू, कोणास देऊ हा बहर

शेवटी आलीच बागेवर नको ती आपदा
फुल बहरले नेमके अन् आंधळा झाला भ्रमर

याहुनी काहीच नाथा वेगळे नाही पुढे
तेच ते आता नव्याने उलगडत जातील थर
.
.
(काय वर्णावी घराने  ह्या कलेची थोरवी
लावला आहे चुना पण वाटतो संगमरवर )

एकनाथ

©Eknath Dhanke #alone_quotes
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White आत्ताच नका टाकू माझ्या गळ्यात माला 
अजून माझा शेवटचा टवका न उडाला 

कोणी म्हणतो आले तर येऊ द्या खाली
कोणी म्हणतो टेकू लावा आकाशाला 

एकनाथ

©Eknath Dhanke #Emotional_Shayari
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

White ह्या खडतर पण अद्भुत स्वप्नाचा प्रवास आहे हा 
क्षितिजाला चिमटीत पकडण्याचा प्रवास आहे हा 

असेच आधी अवतीभवती धूसर धूसर दिसते
हळू हळू रस्ता प्रकाशण्याचा प्रवास आहे हा

एक संपतो तर लगेच पुढचा खुणावतो रस्ता
रस्त्याने रस्ता उलगडण्याचा प्रवास आहे हा

माझी सोबत जी काही होती ती इथवर होती
इथून पुढचा तुझ्या एकट्याचा प्रवास आहे हा 

कसे पोहचू कधी पोहचू माहित नाही नाथा
अनवट वाटांवर अज्ञाताचा प्रवास आहे हा 

(नंतर पुढचे आणि मागचे काहीच दिसत नाही
ठायी ठायी वळणा वळणाचा प्रवास आहे हा)

एकनाथ

©Eknath Dhanke #Night
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

एकच असू शकते गुपित जागेपणाचे 
झाले न अजुनी स्वप्न इथल्या वास्तवाचे

लाजळुच्या पाना सहन कर स्पर्श थोडा
चल आज मिटवू दे तुझे भय जंगलाचे

तू आज ज्या ह्या मारतो आहेस डुबक्या
बक्षीस आहे का तळे सांभाळण्याचे?

राबायला ये सोहळा समजून घरचा  
रुसणे बरे नाही जवळच्या माणसाचे

इतकेच आयुष्यामधे कर्तृत्व माझे
मी जॉब केला, फेडले हफ्ते घराचे

दुनियाच झाली एवढी रंगीन ही की
दुःखच निरर्थक वाटते डागाळल्याचे 
.
.
.
.
जीवंत तात्पुरती पुन्हा झालीत नाती
कारण पुन्हा ठरले मरण नात्यातल्याचे

जावे कुठे मग गावकडच्या कावळ्याने
चिमणीस जर अप्रूप शहरी कबुतराचे

एकनाथ

©Eknath Dhanke #Anger
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

उघडा उघडा
मोहाचे कोठार
कैवल्याचा भार
पेलवेना

खुणावतो देह
बावरतो जीव
आत्म्याची कणव
येते पुन्हा

आता कशाला मी
करू जप तप 
तुझे एक रूप
आठवेना

लागलाच नाही
शोध अज्ञाताचा
पत्ताही स्वतःचा
विसरलो

आपल्याच साठी
झुरायचे मग
आपलेच जग
येता जाता

कोणती अशी ही
कसोटीची रीत
संकल्प मिठीत
आटवले

एवढ्याने मात्र
एक झाली गोची
शरीरावरची
इच्छा मेली

बरी झाली आत्म्या
जन्माची भ्रमंती
झाल्या भेटीगाठी 
आप्तेष्टांच्या 

ज्याच्यातून इथे
निसटाया आलो 
त्यातच पावलो
अंतर्धान 

एकनाथ

©Eknath Dhanke #Preying
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

Blue Moon ही किती भिन्नता चालणाऱ्यांमधे
कोण रस्ता कुणी अडथळा शोधतो

सोबतीला तिथे खूप लाटा हव्या
मी किनारा जरी मोकळा शोधतो

एकनाथ

©Eknath Dhanke #bluemoon
861cd10d6a6fcf75cab5e60c8c0b2ff5

Eknath Dhanke

तुला कवटाळले त्रासून ज्याला मी
रुपांतर आज त्याच्यातच तुझे झाले

एकनाथ

©Eknath Dhanke #hibiscussabdariffa
loader
Home
Explore
Events
Notification
Profile