Nojoto: Largest Storytelling Platform
durvaswapniltawa5769
  • 9Stories
  • 7Followers
  • 41Love
    81Views

Durva Swapnil Tawade

  • Popular
  • Latest
  • Video
8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

माझं कोकण 

कोकण म्हणजे सागर निळाई 
पाचूच्या रानातील गर्द वनराई 

शहाळ्याचं गोड गोड पाणी 
भजनांची सुमधुर गाणी 

नारळी पोफळीची वेगळीच शान 
ताडा माडांचा मोठा मान 

अबोली, चाफा, जास्वंदी फुलांची दाटी 
सारे मिळून सजवू देवघरातील माटी 

फणस, आंबे, काजू, जांभळी 
साजिऱ्या कोकणाची रूपं ती आगळी 

शुभ्र वाळूतील पाऊलखुणा आपल्या 
चांदण चुऱ्यातील शंख नी शिंपल्या 

इथला निसर्ग घेतो मनाचा ठावं 
स्वर्गाहून सुंदर माझं कोकणचं गाव..

सौ. दुर्वा स्वप्निल तावडे

©Durva Swapnil Tawade
  # माझं कोकण ❤️

# माझं कोकण ❤️ #मराठीकविता

108 Views

8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

वसुंधरा नटली

वरुण स्पर्शाने ती, ओली चिंब झाली
खुलली तनू तिची, रंग आला गाली

नेसली साडी, गर्द हिरव्या वेलींची
पांघरली शाल, कोवळ्या पर्ण फुलांची

शिंपडले अत्तर,जणू ओल्या सरिंनी
गंधाळाली धरा, त्या मोहक क्षणांनी

साज लेवूनी नवा,नवी पालवी उमलली
नव्या शृंगाराने अशी, वसुंधरा ही नटली

दुर्वा स्वप्निल तावडे

©Durva Swapnil Tawade #NatureLove
8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

वसुंधरा नटली

वरुण स्पर्शाने ती, ओली चिंब झाली
खुलली तनू तिची, रंग आला गाली

नेसली साडी, गर्द हिरव्या वेलींची
पांघरली शाल, कोवळ्या पर्ण फुलांची

शिंपडले अत्तर,जणू ओल्या सरिंनी
गंधाळाली धरा, त्या मोहक क्षणांनी

साज लेवूनी नवा,नवी पालवी उमलली
नव्या शृंगाराने अशी, वसुंधरा ही नटली

दुर्वा स्वप्निल तावडे

©Durva Swapnil Tawade #NatureLove
8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

*तुळस साजिरी*
तुळस साजिरी अंगणी माझ्या
आणते समृद्धी गृहात माझ्या

तुझ्या सेवेने मन होते प्रसन्न
घरादारा सुख होई निष्पन्न

आयुर्वेदात तुझी वेगळीच शान
कृष्णसखीचा तुला मिळतो मान

अशीच दिमाखात उभी रहा
माझं अंगण रुजवत रहा

तुझ्या कृपेने सामर्थ्य घरी आण 
देऊन मला सौभाग्याच वाण

*दुर्वा स्वप्निल तावडे*

©Durva Swapnil Tawade

3 Love

8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

*मातृत्व*

स्वप्नांच्या जगातून, भावनांच्या मनातून
माझ्या गर्भात तू आलास बाळा..

तुझ्या येण्याच्या त्या चाहूलने
माझ्या सर्व वेदना घेऊन गेलास बाळा.

तुझा प्रत्येक श्वास अनुभवताना
पापण्यांखाली सुखद स्वप्न देऊन गेलास बाळा..  

तुझ्या इवल्याशा हालचाली गर्भात जपताना,
निशब्द सुख देऊन गेलास बाळा..

मनात रेखाटलेले तुझे निरागस चित्र
प्रत्यक्षात पाहताना खुप समाधान देऊन गेलास बाळा..

माझे आईपण सुखावते *स्वराजमुळे माझ्या* 
मी आई म्हणून मिरवते तुझ्याचमुळे बाळा ..

दुर्वा स्वप्निल तावडे

©Durva Swapnil Tawade

5 Love

8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

मातृत्व
स्वप्नांच्या जगातून, भावनांच्या मनातून
माझ्या गर्भात तू आलास बाळा..

तुझ्या येण्याच्या त्या चाहूलने
माझ्या सर्व वेदना घेऊन गेलास बाळा.

तुझा पत्येक श्वास अनुभवताना
पापण्यांखाली सुखद स्वप्न देऊन गेलास बाळा..  

तुझ्या इवल्याशा हालचाली गर्भात जपताना,
निशब्द सुख देऊन गेलास बाळा..

मनात रेखाटलेले तुझे निरागस चित्र
प्रत्यक्षात पाहताना खुप समाधान देऊन गेलास बाळा..

माझे आईपण सुखावते स्वराजमुळे माझ्या 
मी आई म्हणून मिरवते तुझ्याचमुळे बाळा ..

दुर्वा स्वप्निल तावडे

©Durva Swapnil Tawade

5 Love

8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

आज पुन्हा नव्याने तूझ्या आठवणी आल्या
बालपणीच्या गोष्टी नव्याने हसवून गेल्या...

किती निरागस होत्या जाणीवा त्या क्षणातल्या
किती भाबड्या होत्या भावना त्या मनातल्या...

हरवले ते जग आता, पण आठवणी सापडल्या
मनाच्या कुपीत पुन्हा नव्याने गंधाळल्या..

                                     दुर्वा स्वप्निल तावडे.

©Durva Swapnil Tawade

2 Love

8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

पहिला पाऊस

ढग दाटूनी आले, मन ओले चिंब झाले
पावसाच्या सरीने पहिल्या, मन हे सुखावले..

बेभान आला वारा, घेऊन सरी ओल्या
तनुवरी क्षणभर थांबल्या, नं थेंब होऊन ओघळल्या..

ओल्या सरिंनी केली, गार वाऱ्याशी सलगी
दूरवर नभात गुंजते,वीज ढगांची हलगी..

धूसर धूसर नजर, धुंद धुंद सरी वाऱ्यावर
होऊन स्वछंद वाहते, दूर दूर क्षितिजावर..

                दुर्वा स्वप्नील तावडे

©Durva Swapnil Tawade #CloudyNight
8b2489ac6eaccf62ff07736295a19f83

Durva Swapnil Tawade

पहिला पाऊस 

पहिला पाऊस मनातला माझ्या 
तुझ्या मनी दाटेल का 
माझ्या मनीची साठवण 
तुझ्या मनाला आठवेल का 

कितीदा तोच पाऊस 
पुन्हा नव्याने बरसतो 
तोच तू, मीही तीच 
पुन्हा नव्याने बहरतो 

त्याच त्या सरीतून पुन्हा 
नवीन अशी पालवी फुटे 
तोच तो गारवा स्पर्शून 
कोमल तनूही पुन्हा हसे 

पावसाच्या सरी त्या झेलत 
पुन्हा स्पंदने आर्त झाली 
पुन्हा वाऱ्याचे स्वर ते ऐकत 
सर्व इंद्रिये तृप्त झाली 

चिंब ओल्या स्पर्शाने त्या 
अंग अंग मोहरून गेले 
पुन्हा ओल्या मिठीत तुझ्या 
मन माझे विरघळून गेले 

दुर्वा स्वप्निल तावडे #Freedom

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile