Nojoto: Largest Storytelling Platform
suchitakulkarni8793
  • 13Stories
  • 31Followers
  • 65Love
    32Views

Suchita Kulkarni

  • Popular
  • Latest
  • Video
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

घाव

किती अमानुष कृत्य
किती पाशवी रे वृत्ती
काय दोष हत्तींनीचा
तिला मारलीस जिती


मुक्या प्राण्यांच्या भावना
कधी कळतील लेका
ठेवी विश्वास निखळ
दिला मात्र तिज धोका


होती गर्भार हत्तीण
वाढे अंकुर उदरी
जग पाहण्या आधीच
घाव घातलास उरी

भूक लागता पोटाला
भूक भागण्या निघाली
घेता मरता आहार
भुईवर कोसळली

धावे सैरावैरा फार
जीव वाचवण्यासाठी
स्फोट फटाक्यांचा होता
सुरा खुपसला पाठी

संत सज्जन सांगती
करा सोबती प्राण्यांशी
म्हणे माणुसकी होती
मानवाच्या हृदयापाशी

अरे मानवा मानवा
कुठे गेले तुझे मन
जन्मे उलटे काळीज
बुद्धी पडली गहाण?

नको करूस  रे हत्या
मुके प्राणी  ,निसर्गाची
कोप होईल जीवनी
 अंत  होई मानवाची

सुचिता कुलकर्णी(जोशी)
ता.परतूर.जि.जालना
8275232045 #RIPHUMANITY
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

आता तरी धाव ना

देवळातील देवा आता कुठे गेलास सांग ना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना
गोरगरीब जनतेचा काय गुन्हा सांग ना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना।।धृ।।

बाळ रडते आई विना बाप भुकेला राहतो
भाकरीचे दोन तुकडे लेकराला चारतो
जगणे ,मरणे तुझ्याच हाती मुक्ती मार्ग दाव ना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना

तडफडून जीव जातो काय असेल गुन्हा हा
स्वस्त झालाय प्राण का रे नीट मजला सांग ना
दुःख डोळा पाहताना जिव्हारी लागे घाव ना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना

श्वास घेई मुश्किलीने  पिंजऱ्यात कोंडलो किती
भावना कोराट झाली मनामनात भरली भीती
स्थिरावले मग पाय आता मुक्त छंद ही जोडना
कहर केला कोरोनाने आता तरी धाव ना

सुनी पडली नगरी देवा सुन्या झाल्या दाही दिशा 
सुन्न झाले मन माझे खुंटल्या साऱ्या आशा
दिव्यतेजातूनी प्रगटशी घेई तुझाच धावा ना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना

सुख सारे शोधताना दुःख पचनी पडेच ना
तिमिर दाटला चहू दिशांनी गर्द अंधार दाटला
ज्योत तेजाची तळपू दे हीच मनीची भावना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना


महामारी संकटाने तोंड वरती काढले
क्रूर कर्मी जीवितांनी विषवायू पेरले
निरपराधी जीव देवा मुकले रे जगण्या
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना

मोलमजुर करणारा कोस कोस चालती
कबाडाचे धनी देवा भीक फिरुनी मागती
लढव काही शक्कल देवा आयडियाची कल्पना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना

डॉक्टर , नर्स, पोलीस , शिक्षक देशसेवा करती
देशभक्ती ओतप्रोत देश भावना मनी किती!
घर ,संसार पाहताना अश्रू डोळा मावेना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना
कहर केलाय कोरोनाने आता तरी धाव ना।     


--- #Beauty
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

#sholay
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

#Lala_Lala
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

वाचन छंद

जाऊ पुस्तकांच्या गावी
ध्येय गाठावे अंतरी
वाचू भाव मनातील
मुक्त डुंबावे सागरी

अंतरीच्या पाऊलखुणा
फेर धरून नाचती
भाव मनातील वेडे
अंत:करण वाचती

जाऊ पुस्तकांच्या गावा
हात प्रेमाने धरावा
दिशा दाखवेल योग्य
झेंडा त्रैलोकी फडकावा

भाव मनातील खोले
नयनांची भाषा बोले
स्पर्श हृदयाशीच होता
मन अंतरंग डोले

मन गुंतते पुस्तकात
ज्ञानदानाची हो खात्री
प्रगल्भता ही लाभते
 पुस्तकांशी होते मैत्री 

मौनातच सारं काही
सांगत असतात पुस्तके
एकांतात धुंद पणे
राज खोलतात पुस्तके

वाचनाचा जडे छंद
मिळे सर्वांगी आनंद
ज्ञानगंगेच्या किनारी
धुंद फिरते स्वच्छंद

वाचनाने जीवनात
मिळे आत्मिक आनंद 
चला मग  नियमाने
जडवू वाचनाचा छंद


सुचिता कुलकर्णी(जोशी)
ता.परतूर.जि.जालना
8275232045

8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

वाचन छंद

जाऊ पुस्तकांच्या गावी
ध्येय गाठावे अंतरी
वाचू भाव मनातील
मुक्त डुंबावे सागरी

अंतरीच्या पाऊलखुणा
फेर धरून नाचती
भाव मनातील वेडे
अंत:करण वाचती

जाऊ पुस्तकांच्या गावा
हात प्रेमाने धरावा
दिशा दाखवेल योग्य
झेंडा त्रैलोकी फडकावा

भाव मनातील खोले
नयनांची भाषा बोले
स्पर्श हृदयाशीच होता
मन अंतरंग डोले

मन गुंतते पुस्तकात
ज्ञानदानाची हो खात्री
प्रगल्भता ही लाभते
 पुस्तकांशी होते मैत्री 

मौनातच सारं काही
सांगत असतात पुस्तके
एकांतात धुंद पणे
राज खोलतात पुस्तके

वाचनाचा जडे छंद
मिळे सर्वांगी आनंद
ज्ञानगंगेच्या किनारी
धुंद फिरते स्वच्छंद

वाचनाने जीवनात
मिळे आत्मिक आनंद 
चला मग  नियमाने
जडवू वाचनाचा छंद


सुचिता कुलकर्णी(जोशी)
ता.परतूर.जि.जालना
8275232045

8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

किती सांगावं लेका तुला
तू शिकलास की सवरलेला
नुसती बुकं  वाचून
शहाणं होता येत नाही गड्या
विवेकाने सारासार विचार करता आला पाहिजे.
स्वतः साठी नाही तर इतरांसाठी जगता आलं पाहिजे
जीवनाचं गणित सारं जुळवता आलं पाहिजे
स्वार्था पुढं तुला भलंबुरं  काही बी कळना
हुशार हुशार म्हणता म्हणता काही बी वळना
किती झटावं लोकांनी तुझ्याचसाठी
किती झटाव शासनाने तुझ्याचसाठी
तुमच्या सुखा समाधनासाठी
अन तू मात्र फिरतोस रस्त्यावरून
गल्लीबोळातून, मनाला वाटेल तसे फिरत
जीवघेणा प्रसंग ओढावलाय आपल्यावर
कोरोनाचा प्रकोप वाढतच चाललाय
सारीकडे महामारीने हाहाकार पसरलाय
सारे जग आता संकटात सापडलाय
संयम मात्र तू ढळू देऊ नकोस
लक्ष्मण रेषा मात्र तू ओलांडू नकोस
जीवनावश्यक गोष्टी तुला मिळतील 
जाणून घे जरा तू इतरांचे दुःख 
मग तुला इतरांचे दुःख सारे कळतील
नव्या सालात किती तरी संकल्प केले असतील
वाटलही नाही कोरोना विषवायूचा विळखा वाढवत जातील
जे आपले रक्षक आहेत त्यांना आपण त्रास देतोय
दगडफेक करून त्यांनाच आपण मारतोय
हे मात्र आडाण्यासारख आपण वागतोय
संयम आणि शिस्तच आपल्याला लढायला शिकवेल
घरातच राहून बघा जीवन जगणे शिकवेल
वाईटा मागे ही चांगली गोष्ट असते असे म्हणतात
कोरोनाने खरच लढायला शिकवलं
माणुसकीने मदतीचा हातात हात द्यायला शिकवलं
संकटाशी सामना करायला शिकवलं.
जीवनाचे गणित जुळवायला शिकवलं
सर्वांनी आता एक करायचं कोरोनाची साखळी
 मात्र घरात राहून खंडित करायची .जगायचं इतरांसाठी
 मारायचं इतरांसाठी .
मनोमन करू प्रार्थना हे देवा जाऊ दे कोरोना

सुचिता कुलकर्णी(जोशी)
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

धुंदीत आज न्हाली, धरती सुगंध ल्याली


आनंद जीवनाचा  सांगून अर्थ गेला
8b7780860437adf64f56ad2d87297e12

Suchita Kulkarni

आनंद देत नि घेत
करू आयुष्याचं सोनं
मनमुराद लुटू सुवर्ण क्षण
गाऊ आनंदाच गाणं

सुचिता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile