Nojoto: Largest Storytelling Platform
surajgodghate6737
  • 4Stories
  • 14Followers
  • 12Love
    0Views

Suraj Godghate

Doctor in future....love for poetry and sketching

  • Popular
  • Latest
  • Video
8cf504d8dec9ebc7414e328002d98412

Suraj Godghate

जळले  सारे पुन्हा हे, आकाश चांदण्याचे
उरले उरी न माझ्या, ते दवं पावसाचे

पेटवून गेला वारा,  विझवण्यास वाहला जो
अंतरंगाच्या अंतराला, सारत दूर होता

झालो गुलाम मीच,एका फसव्या जगाचा
घात करणारा म्हणे , पहरेदार माझा होता

आता कसे रडावे,आता किती हसावे
केला माझा स्व:ताने,बहिष्कार होता

आता नेऊन ठेऊ ,कुठे लक्तरे माझी ?
उरला असा ना कोणता ,देव्हारा होता

झाले आता पुरे ,हे द्वंद्व बुस्दीलाचे
लढाया हवे आता, हा पुकार होता

8cf504d8dec9ebc7414e328002d98412

Suraj Godghate

जरी उन्ह दिवसाची ,जाळून खाक गेली
आभाळ चांदण्याचे सोडून रात गेली

उरले पुन्हा माझे ,माझेच प्रश्न सारे
वय कोवळे उन्हाचे सांगुन दुपार गेली

आला जरी न ओठी काहूर भावनांचा
फसले सारे बहाणे ,पटवून चूक गेली काहूर

काहूर

8cf504d8dec9ebc7414e328002d98412

Suraj Godghate

एक चंद्र ,एक रात ,चांदण्या अनेक
तुझ्या माझ्या भेटीचे, बहाणे हे नेक.

भेट माझी,आस तुझी, इशारा नजरेचा
नुसताच काजव्यांना बघण्याचा, खोटा बहाणा डोळ्याचा .

गार वारा ,लख्ख उजेड,पूर्णिमेचा साजणे 
हात तुझा, हातात माझ्या, उगा मनाचे लाजने.

गारद शांती,गोड थंडी ,शिशीराची वाजने
डोकं तुझं ,खांदा माझा ,स्वप्नांचे तेथे विसावने.

दोन जीव , अंतरिक्ष एक, तारकांनी सजलेलं
कुशी तुझी,श्वास माझा शांत कसा निजलेला.

रातीचा अंत,सुर्याची खंत ,दुलईस सोडण्याची
भेटीचा गोडवा ,ह्रदयात माझ्या ,आता पर्वा नको जगाण्याची 
-सुरज एक चंद्र एक रात...

एक चंद्र एक रात...

8cf504d8dec9ebc7414e328002d98412

Suraj Godghate

उधळू नकोस रंग ,अनोळखी वाऱ्यावर 
हा दरवळणारा सुगंध , त्याचा सखा नाही #NojotoMarathi


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile