Nojoto: Largest Storytelling Platform
nishadange8800
  • 4Stories
  • 47Followers
  • 29Love
    0Views

Nisha Dange

  • Popular
  • Latest
  • Video
91a618a86bdbdc2c17434757b38a9675

Nisha Dange

बोलू नकोस खोटे तू बोल सांत्वनांचे

कळतात अर्थ सारे डोळ्यात भावनांचे



निशा डांगे गझलेतून

गझलेतून #Quote

91a618a86bdbdc2c17434757b38a9675

Nisha Dange

जातीपातीचे कोडे सुटेल का?

एकच असे विश्वविधाता
निर्मिली त्याने एक मानवजात
एकाच ईश्वराची आपण लेकरे
तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई
कधी विभागलो कळलेच नाही.....
सर्वांच्या अंगी सळसळतो
फक्त लाल रंग
तरीही फडकतो वाऱ्यावर जातरंग
कुठे गेली ती भारतीय संस्कृती?
विविधतेत एकता जपण्याची
स्मरावा गौरवशाली इतिहास
क्रांतिकारांच्या गळ्यातील फास
जातीय दंगलीसाठीच का त्यांनी....
दिले आपले बलिदान?
जागवा स्वमनाला 
नि विचारा प्रश्न........
खरा तो एकचि मानवधर्म
मनामनात दरवळेल का?
आतातरी जातीपातीचे कोडे सुटेल का?
चला माणुसकीची ज्योत पेटवू 
मनांनात मानवसेवा रुजवू
असू देत कितीही......
वेगवेगळे रंग, वेश, भाषा,
तरीही नांदावी मनी नित्य
देशभक्तीची अभिलाषा 


निशा डांगे
पुसद जातीपातीचे कोडे सुटेल काय?

जातीपातीचे कोडे सुटेल काय? #poem

91a618a86bdbdc2c17434757b38a9675

Nisha Dange

प्रेम जे नव्हते कधी ते, लागला दावावयाला
जीव घेणाराच आला आज खांदा द्यावयाल

केवढ्या नजरा भुकेल्या, माणसे झाली गिधाडे
बापही आता मुलीला लागला हुंगावयाला

मूग गिळुनी गप्प बसते सज्जनांची मांदियाळी
 त्यामुळे दुर्जन अताशा लागले माजावयाला

चोर बनती कार्यकारी, फास संन्यासास लागे
भेटती ना संत येथे भरवसा ठेवावयाला

ओल बहुधा भावनांची, संपली ह्या लेकरांची
नाळ माते पुत्र आता लागले तोडावयाला

निशा डांगे


पुसद jayram More Harishchandra R. Dhiwar Snehal Kadam

jayram More Harishchandra R. Dhiwar Snehal Kadam #poem

91a618a86bdbdc2c17434757b38a9675

Nisha Dange

तुझ्या प्रीतीची लालीमा
मम अधरी चढली
श्वासा श्वासात गुंफता
नसा नसात भिनली चारोळी

चारोळी #Shayari


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile