Nojoto: Largest Storytelling Platform
mukeshnagdeote0152
  • 30Stories
  • 140Followers
  • 174Love
    0Views

Mukesh Nagdeote

तु बेभान कोसळणार्‍या सरी मी ऊनाड रान वारा तु धुंद बहरणारी रातराणी मी मंद सुवास मोगरा..!! मुकेश

  • Popular
  • Latest
  • Video
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

कमनिय बांधा तुझा
तुझा वेगळाच थाट..
सख्ये थोडं जपुन चाल
आहे काटेरी पायवाट

         गोर्‍या गोर्‍या तळपायात
         काटा कसा रूतला..,
         तुझ्या नजरेचा तिर
         काळजामधी बसला..!!
  मुकेश नागदेवते

©Mukesh Nagdeote
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

मैत्री तुझी..

कधी काट्यात रूतली...
कधी फुलात हसली...
कधी दवात भिजली..
कधी सावलीत निजली..!
       मुकेश
     
                 तुझ्या प्रेमाचा ऋतु
                    सदैव राहु दे..,
                तुझ्या मैत्रीच्या पावसात
                   चिंब न्हावु दे..!!
                          मुकेश #Yaari
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

भिजलेलं रूप तुझ
डोळ्यात साठवु दे..,
तुझ्यासोबत सख्ये
पावसात  न्हावु दे..!!
               मुकेश
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

नथ नाकात बसली
सख्ये काया ही सजली..
जणु विड्याच्या पाणाला
सख्ये लवंग टोचली..!!
               मुकेश
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

माय दिव्याची ती वात...
माय मंदिराचा कळस...
माय अंधाराची ती साथ... 
माय अंगणातील तुळस...! 
                  मुकेश Matrudin

Matrudin

99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

तुझ्या कष्टाच्या घामानं
 बहरते काळी आई..,
तुझ्या अपार कष्टाचा
कसा होऊ उतराई..!!

  मुकेश #weather
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

पहाटे पहाटे स्वप्नात तु आलीस
प्रितीचे रंग लावुन तु गेलीस..
एकदा ये ना प्रेमाचे रंग उधळाया..,
प्रेमाचे रंग माझ्या जिवनात भराया..!!!
                             मुकेश..
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

मी दिलेला गुलाब
तु केसामध्ये माळायचीस..,,
हलकेच मिठीत येऊन 
तु खुदकन लाजायचीस..!!
                     मुकेश
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

तुझ्या ओठावरचा तिळ
माझ्या नजरेमधी भरला..,
माझ्या ओठानीही सख्ये
ध्यास तिळाचा धरला..!
                        मुकेश
99402151296fbe65c0642472d0a8755b

Mukesh Nagdeote

तुझ्या विरह‍ाची होळी
मनं राख करून गेली..,
तुझ्या आठवांची दिवाळी
मनात बहरून आली..!!
                मुकेश..!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile