Nojoto: Largest Storytelling Platform
rahulmohite2172
  • 3Stories
  • 12Followers
  • 10Love
    0Views

Rahul Mohite

maa ka ladla papa ka prince

  • Popular
  • Latest
  • Video
9dfb3a984b79d8efcc47b0ccde0be993

Rahul Mohite

अशी एक तरी मैत्रीण असावी 
जीवन वळणावर सदा साथ देणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी 
चांगलं काम केल्यावर पाठ 
थोपटणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी 
वाईट काम केल्यावर थोबाड फोडणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी 
माझ्या मैत्रीत फायदा तोटा न बघणारी


अशी एक तरी मैत्रिण असावी
शांत व मनमिळावू असणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी 
मी हताश झाल्यावर मला प्रेरणा देणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी
मला उन्नतीच्या शिखरावर बघणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी
मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारी

अशी एक तरी मैत्रीण असावी
माझ्या अंधाऱ्या आयुष्यात 
उजेडाची किरण बनून येणारी


शेवटी अशी एक तरी मैत्रीण असावी 
या राहूल ला मित्र म्हणणारी

Prince(राहुल साहेबराव मोहिते)

9dfb3a984b79d8efcc47b0ccde0be993

Rahul Mohite

आजच्या पावसाची
गोष्टच वेगळी होती
कडक चहाला 
कांदाभजीची सोबत होती

उनाड वारा नुसताच
वाहत होता
आभाळ आपल्या 
जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी
पाहत होता 

त्या दोघांची प्रेमकहाणी 
थोडी आगळी होती
आजच्या पावसाची गोष्टच 
वेगळी होती

समोरच एखादी वीज 
कडकडत होती
ढगांसोबत जणू ती बडबडत होती

उन्हाळ्याची उष्णता आता 
संपणार सगळी होती
आजच्या पावसाची 
गोष्टच वेगळी होती

आजचा पाऊस 
नुसताच बरसत होता
जमिनीला भेटणयासाठी 
खुप तरसत होता
मातीचा सुगंध चोहीकडे
पसरत होता

मातीच्या त्या सुगंधाची 
चवच वेगळी होती
आजच्या पावसाची 
गोष्टच वेगळी होती
✍🏻राहुल साहेबराव मोहिते 
prince🤴🏻
At. वडनेर तालुका मालेगाव जिल्हा नासिक

9dfb3a984b79d8efcc47b0ccde0be993

Rahul Mohite

#DearZindagi आजचा तो पाऊस तुझीच आठवण करत होता
आणि माझ्या डोळ्यातला पाऊस बस्स तुझ्याच आठवणीत बरसत होता # prince shayari

# prince shayari #DearZindagi #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile