Nojoto: Largest Storytelling Platform
prasadraj3819
  • 8Stories
  • 20Followers
  • 37Love
    0Views

Prasad Raj

प्रेमाखातर जन्म घेतला... कलम घेतली शब्दांसाठी...

  • Popular
  • Latest
  • Video
a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

तु चाल तुझ्या वाटेवर...एकटा चालायला शिक.
कोणी सोबत असो नसो वाईट वाटून घेऊ नकोस. तरी जे लोक सोबत आहेत त्यांच्यावर प्रेम कर.जे सोबत नाहीत त्यांचा द्वेष नको करू पण त्यांना महत्व देऊ नको. तुझं आयुष्य तुला  एकट्याला घडवायचं आहे.काही लोक गरजेपुरता तुझा वापर करतील आणि काही तुला त्यांच्या प्रत्येक गोष्टींत सहभागी करून घेतील, त्यांना महत्त्व दे.
जे तुला सदैव उंचावर जाण्यासाठी प्रोत्साहित करतात अशांना महत्त्व दे.पण प्रत्येक गोष्ट विचार करून कर. कारण तू जेव्हा कूठे चूकशील तेव्हा हजार जण तुझ्याकडे बोट दाखवायला तयार असतील.
म्हणून स्वतःवर प्रेम करत आणि स्वतः च्या क्षमतेवर विश्वास ठेऊन क्षितिजाला भिडन्याचा प्रयत्न कर...
                                                                         
                                                                         -©प्रसाद
a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

पाऊस मला आठवण करून देतो त्या प्रेमाची 
जे कधीतरी कुणावर तरी झालं होतं...

पाऊस मला आठवण करवून देतो त्या धडधडत्या हृदयाची
जे बरसत्या पावसातच कुणाला तरी दिलं होतं...

पाऊस आठवण करवून देतो त्या थेंबाची 
जे थेंब त्या संगमरवरी अंगावरून ओघळत होते...

पाऊस आठवण करवून देतो त्या गोड मिठीची
जी वीज चमकताच तिने मारलेली...

पाऊस आठवण करवून देतो
 त्या कोवळ्या ओठांची जे थंडीने थरथरत होते...

a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

आता उद्या १५ ऑगस्टला अनेक जणांची राष्ट्रभक्ती उफाळून येईल.अंगाला,हाताला,गाडीला तिरंगा लावतील.आणि व्हॉट्सअपवर भसाभसा स्टेटस सोडतील दिवसभर...ठिक आहे,अभिमानाची गोष्ट आहे...
पण,नंतर वर्षभर यातलेच काही लोक एकमेकांना शिव्या देतील,
दुसऱ्याचं यश बघून जळतील,
   जाती पातीचे राजकारण करतील,भेदभाव करतील,मग इथे त्यांच्याकडून 'व्यक्तिप्रतिष्ठा आणि बंधुता' 
या संविधानातील शब्दांची पायमल्ली होईल.
रस्त्यावरचे सिग्नल तोडतील,कचरा कुठेही फेकतील... 
  वाहतुकीचे नियम मोडतील,काही नाहीतर सरकारलाच चुकीचे ठरवतील. देशाच्या पाठीशी ना राहता देश असा देश तसा असा करत ' या देशाचं काही होणार नाही' असे नकारात्मक बोलतील,मग अशा लोकांनी कितीही तिरंगे फडकवले तरीही ते भारत देशाचे नागरीक म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे नाहीत.
अशांमुळे,मग कसा होईल हो देश महान!
                                                                                                     -©प्रसाद

a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

या जगात कोणी  लहान थोर नाहीये. सर्व आपापल्या ठिकाणी  एक चांगला व्यक्ती आहे. 
आपल्याला जे काय करायचंय ते करत रहा. उगाचच कुणाशी स्पर्धा करून काही उपयोग नसतो.कारण तुम्ही तुमच्या ठिकाणी एक योद्धा आहात. 
जे करण्याची इच्छा आहे ते संघर्ष करून मिळवा.इतरांनी काय केलं याचा विचार करू नका.आपल्याला काय करता येईल हे बघा प्रत्येकाचीच बुद्धी आणि स्वभाव काही सारखा नसतो त्यामुळे आपण स्वतःला ओळखून,जे करायचं आहे त्यासाठी संघर्ष करून स्वतः चं जीवन सार्थ करण्यातच मजा आहे. 
                                                                         ‌ ‌  ‌‌-©प्रसाद   .

a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

मिळाले नवे आकाश तुला,त्यात स्वच्छंद हो तू
त्याचेच होऊन जावे, आता असाच ध्यास ठेव तू...

तो बागडणारा भुंगा, 
तुज एकट्या फुलाचा होऊनी जावा...
प्रेम जगतास तुझ्या प्रिये, नवा गंध यावा...

भिजताना त्या पावसात बेधुंद तू व्हावे,
पेटलेले दोन दिवे आता ना कधी विझावे...

घेतला जो डाव खेळण्यास, तो मोडू नकोस तू
धरले जे तू हात त्याचे ,कधीही सोडू नकोस तू...

सोसले आघात त्याने, स्मरणात ठेव तू,
जीव दोन तरी श्वास एक आहे,
असाच एक मनी विश्वास ठेव तु...
                                                    
जसे धरिले हात त्याचे सखे तसेच ठेव तु,
तोडू नको कधीही बंध जुळलेले, 
त्याच्या ओंजळीत तुझा श्वास ठेव तु...
                                                    -प्रसाद
a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

मला असे वाटते माझे मन व्हावे तुझे,तुझे मन व्हावे माझे,
तू होशील माझी की या कविताच बनतील जीवन माझे...
पूरे झाले आता हे आठवणींचे ओझे
स्मरूनी तुला ओलावतात अक्ष माझे... 
                                                       -©प्रसाद

a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

आज अंतरीची ती माझ्या स्वप्नात आली
असं वाटलं क्षणभर,ती माझीच झाली.
पण,त्याच रडवणारऱ्या आठवणी पून्हा देऊन गेली...
काही न बोलताच ती निघून गेली,मग काय शेवटीं पहाट झाली...
                                   -©प्रसाद

a24bd6e2282c1c595449fbfe87f612f3

Prasad Raj

सर्वांवर प्रेम करायचं असतं...सर्वांशी आपुलकीने वागायचं असतं रे!
जगण्याच्या वाटेवर भेटतात अनेक माणसं त्या सर्वांना आपण आपलं समजायचं असतं.
जी भेटली, ती सर्व आपली माणसं;
  पण कोण आपलं नाही, हे सांगणे मला तरी अवघड!
काही जातात निघून त्यांना हवं तिथे,पण त्यांच्यासाठी रडून आणि कुढून होणार काय? ते निघून गेले म्हणून काही फरक पडणार नाही पण त्यांच्यात गुंतलात तर आयुष्य निघून जाईल...
मग ते परके झाले म्हणून राग आणि पश्चाताप करण्यापेक्षा,
 त्यांच्याबद्दलचं प्रेम मनात ठेऊन स्वतःच आपली राख उधळीत जाणे केव्हाही           चांगलं..
                                                                                   -प्रसाद


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile