Nojoto: Largest Storytelling Platform
poojamane5309
  • 11Stories
  • 10Followers
  • 67Love
    13Views

pooja Mane

खूप भावली ही कविता ! माहिती नाही कोण लिहली आहे ! --------------------------------------- *दोन शब्द जगण्याविषयी* 🕊 कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले वागू नये कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशीबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे होऊच नये सहजच विसरून जावे सारे सल मनात जपू नये नकोसे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे. *कारण* जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात..... *माणसं !* संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात ती ही असतात..... *माणसं !* वेडं लावतात, वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात ती ही असतात..... *माणसं !* पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात , वाट लावतात ती ही असतात..... *माणसं !* शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात ती ही असतात ...... *माणसं !* दूर राहतात, तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील, परक्यासारखी वागतात ती ही असतात ...... *माणसं !* नाना प्रकारची अशी नाना माणसं, ओळखायची कशी *सारी असतात आपलीच माणसं !*

  • Popular
  • Latest
  • Video
a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

आपण चंद्राच्या शितल छायेत मसालेदार , केसरयुक्त दुधाची चव घेतो . ... पण आज एक ऐतिहासिक घटना घडली होती . कोजागरी निमित्त रायगडावर दुधविक्री साठी गेलेल्या हिरकणीची कथा .. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर केवळ पुत्र प्रेमापोटी अंधाऱ्या रात्री , आपल्या लहान बाळाला भेदण्यासाठी कडा उतरण्याची हिम्मत दाखवणाऱ्या शूरवीर मातेला शतशः नमन.🙏🙏

©pooja Mane
a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

ऊन एकटं कधीच येत नाही सावलीला घेऊनच येते दुःखाच आणि सुखाचं हेच नातं असतं.

©pooja Mane

5 Love

a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

#Diwali

27 Views

a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

#mohabbatein
a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

༒͢♥⃝🅾ғͥғɪᴄͣɪͫᴀʟ༒ᶦᶰᵈ᭄🆀ueen✍

💖💖💖💖

नका लावू कुणाला जिव ..
दुनिया निघाली बडी निर्जिव .. भावनेशी खेळून लोक ह्रूदय तोडतात ...
बर्बाद करुन शेवटी SORRY बोलतात....
🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁

💯💯💯💯

༒͢♥⃝🅾ғͥғɪᴄͣɪͫᴀʟ༒ᶦᶰᵈ᭄🆀ueen✍

©

5 Love

a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

👉 #पुजा 💚🥀 

  *आयुष्य दर दिवशी आपल्याला*

    *नवे कोरे २४ तास देते..*

   *आपण त्याच भूतकाळाच्या गोष्टीत झगडत*
        
   *बसायचे कि*

   *भविष्याचा विचार करत*
           
    *बसायचे कि*

   *आलेला क्षण आनंदाने जगायचे *
       
                  *हे आपण ठरवायचे..*💕💕💕

©Pooja Mane #poojamane

#coldmornings
a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

@poojamane_official
💖💖💖

अधुर प्रेम ज्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काहीच स्थान नसतं त्याच व्यक्तिवर आपण जीवापाड प्रेम करतो. जी व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते त्याला आपण नकळत दुखावतो. आजुबाजुला पाहिलं तर खुप काही आहे जगण्यासाठी , आनंदी राहण्यासाठी पण माझ्या प्रेमाचं दुःख एवढं मोठ आहे की सगळ आयुष्य संपल्यासारखं वाटतं.
💔💔💔

©Pooja Mane @poojamane

@poojamane

5 Love

a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

@poojamane
💔💔💔
आज काय झालंय काय माहित पण कळतच नाही , चुकलेली मी आहे की चूकीची वेळ आहे , जवळची व्यक्ति आज दूर का जात आहे??

©Pooja Mane @poojamane

@poojamane #thought

4 Love

a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

......आई..‼
 
 रात्री साडेअकरा वाजता एक वयस्क आई स्वयंपाकघरात भांडी घासत असते तिच्या घरात दोन सुना असतात ज्यांना भांडीच्या आवाजाने त्रास होत असतो आणि त्या आपल्या नवऱ्याला आईला जाऊन बोलायला सांगतात

 सुना नवऱ्याला बोलतात तुझ्या आईला रात्री भांडे घासायला मना कर सकाळी पण ५ वाजता उठून पूजा करून आवाज करत असते त्याच्या मुळे आमची झोप मोडते आणि त्रास होतो आम्हाला तुम्ही जाऊन हे नको करू सांगा

 मोठा मुलगा उठून किचनच्या दिशेने जातो. वाटेत हीच गोष्ट त्याच्या धाकट्या भावाच्या खोलीतून ऐकू येत होती. त्याने धाकट्या भावाची खोली ठोठावली. लहान भाऊ बाहेर आला.

 दोन्ही भाऊ स्वयंपाकघरात जातात आणि आईला भांडी साफ करण्यास मदत करतात,आई नकार देते पण ते ऐकत नाही आणि भांडी साफ झाल्यानंतर दोन्ही भाऊ आईला मोठ्या प्रेमाने तिच्या खोलीत घेऊन जातात, मग आवाज ऐकून त्यांचे वडील पण जागे होतात

 दोन्ही भाऊ आईच्या पलंगावर बसतात आणि म्हणतात, "आई सकाळी आम्हाला ही पूजा करायला उठव आणि आम्ही सकाळी वडिलां सोबत योगा पण करू.

 आई म्हणाली ठीक आहे
 दोन्ही मुले रोज सकाळी लवकर उठून पूजा करू लागले
 आई सोबत त्यांनी रात्री ९.३० वाजता भांडी साफ करण्यास सुरवात केली, मग त्यांची पत्नी  म्हणाली आई भांडे घासत आहे मग तुम्ही का मदत करत आहात तिला त्यावर ते म्हणाले आमचे लग्न करण्या मागे हे एक कारण पण होते आमच्या आईला मदत होईल पण काही हरकत नाही आम्ही आईला मदत करत आहोत

 *आमची आई आहे आम्ही मदत करतो यात काही चुकीचे नाही आहे*

 पुढील तीन दिवसांत घरात पूर्ण बदल झाला सुना लवकर भांडे घासून ठेवायला लागल्या कारण त्यांच्या पतीला भांडे घासावे लागत होते म्हणून सकाळी लवकर देव पूजेला देखील उठायला लागल्या

 काही दिवसात संपूर्ण घराच्या वातावरणात पूर्ण बदल झाला.

 *सुनांनी सासू सासर्यांना पूर्ण आदर करण्यास सुरवात केली.*

          कथा सार

 जेव्हा सून त्यांचा आदर करत नाही तेव्हा आईचा आदर कमी होत नाही
 जेव्हा मुलगा आपल्या आईचा आदर करीत नाही किंवा आईच्या कार्यात सहकार्य करत नाही तेव्हा आईचा आदर कमी होतो.

 *जन्माचा संबंध आहे.*

 *आई वडील पहिले आहेत.*
  धन्यवाद्.....🙏🙏🙏

©Pooja Mane #farmersprotest
a3de4c14dee002f638303802f4b224f7

pooja Mane

#myvoice
loader
Home
Explore
Events
Notification
Profile