Nojoto: Largest Storytelling Platform
ribakapandhare5886
  • 4Stories
  • 4Followers
  • 34Love
    0Views

Rubi

चेहऱ्यावर तुझ्या नेहमी असतो हर्ष मोहवून टाकतो तुझ्या प्रेमाचा तो स्पर्श ✍🙈मीच🙈

  • Popular
  • Latest
  • Video
a8e7d574dd4e22dd312f5c1f25441d41

Rubi

माझ्या मराठी मातेने घडविले लोकं थोर
घडिले ज्या मातीत शाहू - फुले - आंबेडकर

लाभली जिथे शिवबांना जिजाऊंसारखी आई
केले तिने संस्कार निर्माण झाली शिवशाही

रामदासांचे श्लोक अन् ऐकली ज्ञानोबांची ओवी
तिथेच ऐकू येते तुकोबांच्या अभंगांची गोडी

आपुलकीच्या प्रेमासोबत होतो लहान - थोरांचा आदर
वासरांना लाभतो आईच्या मायेचा पदर

उभे राहुनी सह्याद्री गातो महाराष्ट्राची गौरव गाथा 
नमन करुनी महाराष्ट्रास जपू परंपरा आणि प्रथा

अभिमानाने गात राहीन ही गोडवी महाराष्ट्राची
स्वाभिमानाने जपत राहीन ही थोरवी महाराष्ट्राची

कवियत्री:🖋️ रिबका पांढरे

©Rubi महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
जय महाराष्ट्र 🚩

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩 जय महाराष्ट्र 🚩

a8e7d574dd4e22dd312f5c1f25441d41

Rubi

मनाने समजूतदार अशी वेडी आहेस तू
निखळ हसणारी माझी एक अल्लड मैत्रीण आहेस तू

आकाशात चमकुन उठणारी छोटीशी चांदणी आहेस तू
 मला नेहमी साथ देणारी माझी सावली आहेस  तू

कलाकाराने कोरलेली रेखीव मूर्ती आहेस तू
माझ्या परिकथेतली मोहक परी आहेस तू

सुगंध दरवळणारी  मोगऱ्याची कळी आहेस तू
 नाजुक गुलाबाच्या पाकळ्या तील एक पाकळी आहेस तू

सुंदरतेने भरलेली अप्सराच आहेस तू
माझ्या स्वप्नातली सुंदर राजकुमारीच आहेस तू

©Rubi ❤️तु ❤️

#lovetaj

❤️तु ❤️ #lovetaj #poem

a8e7d574dd4e22dd312f5c1f25441d41

Rubi

मनातलं समजणारी एक व्यक्ती असावी
दोन्ही मने एकमेकांशी connected राहावी
जिथे शब्दांची गरजच नसावी
शब्द न वापरता संवादाची गाठ घट्ट बसावी

©Rubi #lovebirds
a8e7d574dd4e22dd312f5c1f25441d41

Rubi

#Nationalgirlchildday बाई
जिद्द उंच उडण्याची तिच्यात ही आहे
पण दृष्टीत समाजाच्या ती फक्त एक बाई आहे

स्वप्ने बघून साकार करण्याची क्षमता तिच्यात ही आहे
पण विचारात समाजाच्या ती फक्त एक बाई आहे

अन्यायाला प्रतिकार करण्याची हिम्मत तिच्यात ही आहे
पण कल्पनेत समाजाच्या ती फक्त एक बाई आहे

ती आणि तिच्या भावना समाजाच्या नजरेआड आहेत
कारण ती फक्त आणि फक्त एक बाई आहे

सन्मानाने जगण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क तिचाही आहे
कारण हातातलं खेळणं नसून ती सुध्दा एक बाई आहे 
ती सुध्दा एक बाई आहे
रिबका पांढरे

©Rubi ❤️बाई❤️
#girlsquotes #girlsrighttostalkmen 
#girlrespect 
#girlseducation 
#girlsempowerment


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile