Nojoto: Largest Storytelling Platform
prakashtotewad1900
  • 11Stories
  • 36Followers
  • 59Love
    0Views

Prakash Totewad

  • Popular
  • Latest
  • Video
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

संवाद
___________________________
तुझ्या माझ्या संवादाने 
प्रीत जणू बहरली
दूरस्थ अबोल मने
एकत्र अशी जुळली

आयुष्यात तू नाहीस
तरी प्रेमात पडलो
निरंतर संवादाने
सदा वाहत राहिलो

तुझ्या माझ्या काळजात
साठे भावना प्रीतीची
न बोलता तू काहीही
वाढे स्पंदने हृदयाची

तुझे प्रेम कळूनही
व्यक्त होत रे येईना
वळणावरती या माझ्या
मौन आता रे सुटेना

दे एक वाचन मला
प्रेमरंगी मनी न्हाऊ
झाले शक्य तर तू,मी
संवाद कायम ठेवू

©Prakash Totewad #covidindia
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

तुझीच वाट पाहतोय
__________________________________

सुसाट धावणारा वारा जेंव्हा
वळला तुझ्या गावाकडे
माझा ही निरोप सांग जरा
बोट दाखवून म्हणालो
तुझ्या काढलेल्या चित्राकडे.........!

तुझे कल्पना चित्रच रेखाटतोय
तुला प्रत्यक्ष पाहणे शक्य होईल का...?

प्रश्न विचारतोय यासाठी सखे
तुझे ही मन 
माझे कल्पनाचित्र रेखाटत असेल का..?

तुझ्या न पाहिलेल्या चेहऱ्यातच
मी सारखा गुंतून राहतोय
भेटशील तू येऊन कधीतरी
ही आस मनात ठेवून
तुझीच वाट पाहतोय... ...
_____________________________________________
                                          ◆ प्रकाश तोटेवाड

©Prakash Totewad #walkingalone
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

तुझ्या मिठीत
______________________________

आज मला रे वाटते
तुझ्या मिठीत विसावे
क्षणभर का होईना
सारे दुःख विसरावे

बोलताना तुझ्यासवे
तुलाच रे मी पाहावे
क्षणभर का होईना
प्रीतीत या धुंद व्हावे

तोडूनी सारी बंधने
नाते आपुले जपावे
क्षणभर का होईना
तुझ्या भेटीत जगावे

डोळ्यातल्या आसवांना
सांग कसे थांबवावे
क्षणभर का होईना
 काळजात साठवावे

मागणे हे शेवटचे
तूच पूर्ण रे करावे
तुझ्या मिठीत माझे
आयुष्य सारे संपावे
_______________________________

©Prakash Totewad #wetogether
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

*विसरता येणं शक्य नाही*
_________________________

आभासी जगतातली
तुझी माझी पहिली भेट
विसरता येणं शक्य नाही.....

तुझ्यासोबतच्या प्रत्येक 
संवादाने वृद्धिंगत झालेले नाते
विसरता येणं शक्य नाही.....

संसारफुलाच्या दुःखातील 
तुझी काळीजफुंकर
विसरता येणं शक्य नाही......

तुझा आठवणीतला सहवास
अन संगतीचा प्रवास
विसरता येणं शक्य नाही......

आयुष्याच्या अंतिम प्रवासाच्या
सुखदुःखाच्या वळणावर तुला
विसरता येणं शक्य नाही.....
_________________________
              ✍️ प्रकाश तोटेवाड

©Prakash Totewad #horror
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

*विसरता येणं शक्य नाही*
_________________________

आभासी जगतातली
तुझी माझी पहिली भेट
विसरता येणं शक्य नाही.....

तुझ्यासोबतच्या प्रत्येक 
संवादाने वृद्धिंगत झालेले नाते
विसरता येणं शक्य नाही.....

अंकुरासम दुःखातील 
तुझी काळीजफुंकर
विसरता येणं शक्य नाही......

तुझा आठवणीतला सहवास
अन संगतीचा प्रवास
विसरता येणं शक्य नाही......

आयुष्याच्या अंतिम प्रवासाच्या
सुखदुःखाच्या वळणावर तुला
विसरता येणं शक्य नाही.....
_________________________
              ✍️ प्रकाश तोटेवाड

©Prakash Totewad #horror
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

माणुसकी हरवली
_______________________________
हरवली माणुसकी
कोठेही नाही दिसत
माणसांच्या रे मनात
 प्रेमच नाही बसत...

धावू लागले आहेत
 सगळे पैशाच्या मागे
माणसा माणुसकीला
कर थोडेफार जागे...

तंत्रज्ञानाच्यामुळे तू 
माणुसकी विसरला
या नात्यातील गोडवा
कुठेतरी घसरला...
________________________________
कवयित्री:-वर्षा भोळे

©Prakash Totewad #Woman
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

याला जीवन ऐसे नाव


कितीही लिहाव म्हटलं तरी लिहिता येत नाही..
सारख जगावं म्हटलं तर जगता येत नाही.....

खूप दुःख आहे मनामध्ये दाखवता येत नाही..
सुखामध्ये दुःख काही लपवता लपत नाही....

माझ्या मनातील भाव सांग ना का कळत नाही..
 तुझे माझे नाते कधीही जुळविता जुळत नाही....

मनाचे समाधान माझ्या काही केल्या होत नाही..
खोचक तुझे बोल मनातून का जाता जात नाही....

अबोल बोल माझे मलाच बोलता का येत नाही..
मैत्रीमध्ये नाते आपुल्या दोघांचे का घट्ट होत नाही....


विश्वासावर नात्याला चालता का येत नाही..
याला जीवन ऐसे नाव मला तर  देता येत नाही....

वर्षा भोळे नांदेड

©Prakash Totewad #wetogether
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

भास हा माझ्या मनी 
तुझा असा छळतो 
जिकडे-तिकडे रे
तूच मला दिसतो

अलवार यावे
डोळे मिटावे
भोवताली माझ्या
तूच असावे

पाण्यात मी तुझे रे
प्रतिबिंब पाहते 
आठवणीत तुझ्या 
रातंदिस राहते

सुख दुःखे असावी 
सोबत तुझी  माझी
दिसांदिस खुलावी
प्रीत तुझी न माझी

असावा फक्त 
तुझाच भास
तुझ्यासाठी हा
अखेरचा श्वास....

वर्षा

©Prakash Totewad #Hopeless
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

*आठवण* 

मनात माझ्या तुझी सख्या 
तुझीच सदा आठवण
 हृदयाच्या काना कोपऱ्यात 
तुझीच आहे साठवण...

केला प्रयत्न जरी तुला 
खुप मी रे विसरण्याचा
का  येतो जुळून प्रसंग 
परत तुला आठवण्याचा....

 विसरावे तुला म्हटले
 तरी अशक्य हे विसरणं 
माझ्या प्रत्येक  रे श्वासात
 तुझे आहे सदा  स्मरण

तुझ्या आठवणीत वाटे
मज नेहमीच उल्हास
विसरून जाईल सख्या
जीवनाचा कठीण प्रवास...


वर्षा भोळे

©Prakash Totewad #standAlone
ae24410e7efe1063d37361b0c7735950

Prakash Totewad

*अखेरचा श्वास*
----------------------------------------

तू नाहीस पण,तुझाच होतो रे भास
तुझ्यासाठी घेणार मी,अखेरचा श्वास

सोडलीस का रे ,अर्ध्यावरती ही साथ
कुरवाळील कोण रे, मायेचा हा हात

नाही आता रे मला, जगण्याची ही आस
तुझ्यासाठी घेणार मी, अखेरचा श्वास

दिस येती रे जाती,तमा माझी कुणाला
झाल्या किती रे वेदना, वेड्या या मनाला

नाही होत रे प्रिया, सहन मला त्रास
तुझ्यासाठी घेणार मी, अखेरचा श्वास

एकांती जगते रे, दुःख हे माझे असे
नको जिणे रे उपाशी,सुख मना भासे

प्रीत पुन्हा फुलवण्या, घेऊ का रे घास
तुझ्यासाठी घेणार मी, अखेरचा श्वास
_________________________
      ● *कवयित्री-वर्षा भोळे* ●

©Prakash Totewad #Shades  Anshu writer

#Shades Anshu writer #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile