Nojoto: Largest Storytelling Platform
kalpana4788
  • 13Stories
  • 1Followers
  • 77Love
    37Views

k_c_writes_96k

गुपित त्या शब्दांतील मनामध्ये साठवते लिखाणाच्या माध्यमातून मनातील भावना मांडते...!!✍️

  • Popular
  • Latest
  • Video
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

प्रेमभंग

तुझी न माझी भेट,
त्या झाडाखाली जाहली होती.
पाहून तुझे रूप सुंदर,
झाडांची पाने-पाने सुद्धा भावली होती.

प्रीत माझे सारे,
जडले होते तुजवरी.
क्षण ते आठवून आता,
मनातच राहती सारी.

स्वप्नात मला तूच,
दिसाया लागली होती.
पाहतो जेथे-जेथे मी,
तुझाच मुखडा भासत राहती.

प्राजक्ताच्या फुलासम,
दिसणारी तू नाजूक कळी.
रूप तुझे आठवून आता,
मनातल्या मनात रोज मरी.

क्षणभर भांडणाने तू,
सोडून गेलीस मला.
आयुष्य हे माझं तुझ्या आठवणीतच झुरतं,
हे कसं सांगू तुला.

भावनांना माझ्या आवर घालणं,
जमलंच नाही मला.
हृदयाचे कप्पे-कप्पे तुझ्या,
आठवणीने भरेल राहील सदा.

सोडून जायच्या आधी,
विचारायचं होतं तू स्वतःला.
राणीविना राजा,
कसा राहील आता.

-कल्पना चवंड पाटील #BreakUp #माझ्या_लेखणीतून 
#प्रेमभंग
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

नऊ महिने,नऊ दिवस
पोटात वाढवावे लागते लेकराला
जन्म देतांनाच्या त्या असाह्य वेदना
स्पर्श करून जातात मनाला
खरंच आई होणं सोपं नसतं हो....

स्वताःहा अर्ध्या पोटी उपाशी राहून
आपलं लेकरू जेवलं का नाही
ते पाहावे लागते आईला
जेवलं नसेल लेकरू तर खूप वेदना
होतात हो मनाला
खरंच आई होणं सोपं नसतं हो....

स्वतःकडे दुर्लक्ष करून
घरच्यांसाठी काय लागते,काय नाही
ते पाहावे लागते आईला
पतीचा डबा, मुलांची शाळा
यातच सगळा वेळ जातो तिचा
खरंच आई होणं सोपं नसतं हो....

कधी मुलगी,कधी सून तर
कधी सासू होऊन वेगवेगळ्या
भूमिका साकाराव्या लागतात तिला
स्वतःला विसरून घरच्यांची देखरेख
करावी लागते ते आईला
खरंच आई होणं सोपं नसतं हो....


-कल्पना चवंड पाटील #MothersDay
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

#माझ्या_लेखणीतून 
#sholay
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

चेहरा

भाव तो अनोखा, तोच सांगून जातो.
हसरा,दुःखद माणूस तोच दाखवून जातो.

नजर ती पाहण्याची चेहऱ्यावरूनच समजते.
चांगल्या, वाईट माणसांची ओळख करून देते.

स्वभाव एखादयाचा कडक, चेहराच बोलून दाखवतो.
रंग,रूप त्याचे तोच सांगून जातो.

नाराजी पण माणसाची तोच दाखवतो.
वेगवेगळ्या परिस्थितीतला चेहरा,चेहराच दाखवतो.

कल्पना चवंड पाटील #माझ्या_लेखणीतून✍️ 
#river

माझ्या_लेखणीतून✍️ #river

8 Love

b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

Sad quotes in hindi उदास झालेल्या मनाला कधी हसवून बघ.
कदाचित हसेलही ते  पण आपणच जर असंच पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचा विचार करून उदास होऊन बसलो तर ते अंतर्मनाला सुद्धा काय नाव ठेवावे..
कधी कधी ताण मुक्त होण्यासाठी आपले कुठेतरी मन रमवावे लागते.जेणेकरून परत परत त्याच गोष्टीची आठवण येणार नाही...

-कल्पना चवंड पाटील

3 Love

b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

कधीच्या पिंजऱ्यात अडकून बसलेल्या त्या पक्षाला मी मुक्त केले आज...
त्याच्या आवडत्या मार्गाने हवेत झेप घ्यायला लावली त्यास...
कल्पना चवंड पाटील #Freedom

4 Love

b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

रोज रोज छेडत होतं
ते एक अनोळखी काहीतरी होत
आठवण तर दररोजच येतं होती
मनामध्ये पण बसलं होतं
मात्र ओळखल्या जात नव्हतं
काही बोलताही येत नव्हतं
आणि विचारताही येत नव्हतं
खरंच एक स्वप्न होतं की अनुभव होता...
समजलाच तयार नव्हतं

kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून #अनोखं_काहीतरी
#shadesoflife
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

"पुस्तकाचं पान उलगडल्याशिवाय ज्ञानाचं गणित कळत नाही...
आणि अनुभव घेतल्याशिवाय माणसाची पारख होत नाही"...


kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

कोणी निस्वार्थी प्रेम करत असेल तर त्याचा वापर करू नका..
कोणाला साथ देणं जमत नसेल तर त्याचा हात धरू नका..
कोणी विश्वास ठेवला असेल तर त्याचा विश्वासघात करू नका..
कोणाचा आदर करणं जमतं नसेल तर त्याचा अपमान करू नका..
कोणाबद्दल चांगले ऐकायला जमत नसेल तर त्याला बदनाम तरी करू नका....

"कारण तुमच्या एका चुकीमुळे समोरच्याला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागते"....!!


kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून

#feather
b4e1c1ab9348829d024bf5b5642c3183

k_c_writes_96k

माणूसच माणसाशी वागत आहे असा,
ज्यांने विसरून जात आहे माणुसकीचा वसा.
नाही राहिली कोणालाही कोणाबद्दल दया-मया,
स्वार्थी ते मन स्वतःशीच करत आहे गया-वया.
पैशाच्या त्या प्रेमात लोक, झाले आहेत अंधे,
पैशासाठीच करत आहेत नको ते धंदे.
कोण म्हणत पैसे कमवू नका तुम्ही,
पण त्यासाठी निदान माणुसकी विसरू नका तुम्ही...


kalpana chavand patil #माझ्या_लेखणीतून  #माणुसकी

#InspireThroughWriting
loader
Home
Explore
Events
Notification
Profile