Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझ्या_लेखणीतून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझ्या_लेखणीतून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमाझ्या की आयेगी बारात पिक्चर, लग्न करतो की माझ्यासोबत, माझ्या सोबत लग्न करते का, माझ्या सोबत लग्न करता का, माझ्या बरोबर फिरायला येते का,

  • 5 Followers
  • 39 Stories

शब्दवेडा किशोर

White #आम्ही जातो अमुच्या गावा....
शब्दवेडा किशोर
आम्ही जातो अमुच्या गावा
अमुचा राम राम घ्यावा 
अमुचा राम राम घ्यावा
घ्याया आम्हास येईल वैकुंठातुनी देवाचे रथ
म्हणूनिया आम्हा जाण्या आपण आदेश द्यावा 
आम्हा जाण्या आपण आदेश द्यावा 
ऐसा नायांचा नाथ तो तुकाराम 
ज्यासी स्वतःच्या रथातुनी नेई जवळी भगवंत
तैसेची अमुची वेळ भरली आता म्हणूनिया
आम्हा निरोप द्यावा आम्हा निरोप द्यावा
आम्ही जातो अमुच्या गावा 
अमुचा राम राम घ्यावा
अमुचा राम राम घ्यावा

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White #दाम करी काम....
शब्दवेडा किशोर
आपल्या माणसाला माणूस तेव्हाच दूर करतं
जेव्हा त्याचा आपल्या आयुष्यातील
उपयोग संपलेला असतो..
अशावेळी ज्याने साथ सोडली
तो नव्या दिशेकडे वळतो
नव्या व अपेक्षा मनी बाळगतो
पण ज्याची साथ सुटते तो मात्र
स्वतःच्या जगायची अपेक्षाच
पूर्णपणे गमवून बसतो.
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White # फुंकर
शब्दवेडा किशोर
हा मंद गारवा अन् पहाटवारा
गंधाळूनी जाई श्वास सारा
तलमस्पर्शी भाव हे माझ्या
आयुष्यरूपी फुलाचे नकळत
मनास बिलगुनी मग जाई
अन् आपसुकच मनाला सुंदरता देई
कोणत्या नवचैतन्याच्या झऱ्यास 
रोज नव्याने जागवुनी धरा ही
रोज नवे प्रसन्नतेचे लेणे
स्व:अस्तित्वावर लेऊनि घेई
एक आस आहे मनी की
मिळावी अशीच मायेची फुंकर
रोज नव्याने माझ्या मना
जी माझ्या अस्तित्वाला
रोज नव्या स्वप्नांचे रंग देई

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White #माझी रखुमाई....
शब्दवेडा किशोर
फुल मी एक सुकुमार तर
तु माझी पाकळी झाली
भावनांचा निराळा पूल मी तर
तु माझी सरिता झाली
एक सुकुमार सतेज देह मी तर
तु माझा श्वास झाली
नव्या स्वप्नांची रास मी तर
तु माझ्या जगण्याचा ध्यास झाली
एक पांथस्थ वाटसरू मी तर
तु माझा सुर्य झाली
जीवनवारीचा वारकरी मी तर
तु माझी रखुमाई झाली

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White #माझ्या आयुष्यपुष्पातील गंध....
शब्दवेडा किशोर
माझ्या आयुष्यपूष्पातील गंध
कोण जाणे कुणी चोरला
माझ्या आयुष्यपाकळ्यांनी
दुनियेच्या गर्दीतील हे शापीत असं
एकटेपण बहाल केलं मला
स्वतः अल्प सुखात कायम जगून
दुनियेवर मात्र सदा सुखाची बरसात कर
असा आदेशच त्या शापीत जगण्यासहीत जणू
नियतीनेच दिला मला
कितीही प्रयत्न केले तरी चांगल्या सुरांची साथ संगत
मिळेना माझ्या आयुष्याला
माझंच आयुष्य बहुधा माझ्यावरंच झालं ओझं
त्याचादेखील आता भार पेलता येईना मला
कुठवर जगू असा शापीत मी घेऊन सोबतीस
कोरा चंद्र असलेले हे असे आगळे वेगळे आयुष्य माझे
शापीत जगण्याचे हे विरलेले धागे हाती धरूनी कुठवर उत्तरं देत जगू
या माझ्या जन्मानेच मज लाभलेल्या फाटक्या नियतीस
हे अजूनही नीट उमजेना मला
वाट बघतोय मी कधी संपेल किंवा संपेल की नाही
हे माझे अस्तित्व असुनही नसलेले जगणे
अन्
लाभेल का मजला कधीतरी सुंदर साजिरे सालस
अन् सुखबहर असलेले
असे मनमोहक ते रुपडे माझ्या आयुष्याला

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White #देहाशिवाय जगायचं आहे..
शब्दवेडा किशोर
एकदा नियतीची चाकोरी मोडून
मला मुक्तपणे जगायचं आहे
एक शापीत जोकर ही माझी ओळख मोडून
एक हसरा जोकर हे माझं नवं रूप साकारायचं आहे......
एकदा मनभरून खरं अन् एकहाती
संपूर्णपणे माझं असणारं यश मला जगायचंय
माझ्या फाटक्या दरिद्री नशिबाला
एकदा तरी एका ग्रेट नशीबाच्या स्वरूपात
बदललेलं मला बघायचं आहे......
खुप सारं अपयश अनुभवलंय अन्
अजूनही अनुभवतोच आहे
आता पुन्हा नव्याने नियतीशी
तिनेच मांडलेला हा डाव आयुष्याचा खेळून
निदान यावेळी तरी तो डाव मला जिंकायचा आहे 
यावेळी यशासाठी हा शेवटचा प्रयत्न करुन बघायचा आहे
मात्र त्यातही अपयशच माझ्या पदरी पडलं
तर नंतर मग मला या देहाबाहेर येऊन
मज या देहाशिवाय जगायचं आहे......

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White #आज क्षणभर विसावलोय....
शब्दवेडा किशोर
आज क्षणभर विसावलोय मी तुझ्या हातावर
पण पुन्हा उंच भरारी घ्यायची आहे मला
काही क्षण मोकळा श्वास घेऊ दे जरा
विस्तीर्ण आभाळ खुणावतंय मला
होऊनिया माझ्या स्वप्नांचे श्वास
तु दे माझ्या पंखांना नव्यानं उडण्याचे सामर्थ्य
जगण्यात माझ्या भर नव्यानं
तुला हवे ते रंग सोनेरी नशिबाचे
दे एक नवा आकार तु माझ्या आयुष्याला
कर साकार एका नव्या अस्तित्वसूर्याला

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White #आज क्षणभर विसावलोय....
शब्दवेडा किशोर
आज क्षणभर विसावलोय मी तुझ्या हातावर
पण पुन्हा उंच भरारी घ्यायची आहे मला
मोकळा श्वास घेऊ दे जरा
विस्तीर्ण आभाळ खुणावतंय मला
होऊनिया माझ्या स्वप्नांचे श्वास 
तु दे माझ्या पंखांना नव्यानं उडण्याचे सामर्थ्य
जगण्यात माझ्या भर नव्यानं
तुला हवे ते रंग सोनेरी नशिबाचे
दे एक नवा आकार तु माझ्या आयुष्याला
कर साकार एका नव्या अस्तित्वसुर्याला

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

a-person-standing-on-a-beach-at-sunset #बांध
शब्दवेडा किशोर
अपेक्षांना माझ्या बांध घातले जरी मी
पण भावनांना कसे आवरू सांगा कुणी 
लग्नानंतर पहिला बांध माझ्या मनास घातला
की आता नाही करायचा तुला कसलाही चंचलपणा 
दुसरा बांध घातला माझ्या त्या ओठांना
की आता जप तु अन् सांभाळून वापर शब्दफेकीला 
तिसरा बांध घातला नयनांना
की त्याच्या व्यतिरिक्त न बघणे कुणा
चौथा बांध मित्रमैत्रिणी अन् सग्यासोयऱ्यांना
की सासर व माहेर दोन्ही घराच्या इभ्रतीला सोडून
आता सगळे असावे फक्त वायफळपणा
पाचवा बांध माझ्या खाण्यापिण्याला
की जे उरेल सरतेशेवटी ते मी खाणेपिणे 
सहावा बांध माझ्या त्या पैसे खर्च करण्याला
की नेहमीच कर काटकसरपणा
सातवा बांध माझ्या कपडे लेण्याला
की आता प्राधान्य फक्त द्यावे जे आवडे त्याला
तेच परिधान करण्याला 
आठवा माझ्या शरीरावरील हक्काला
 इथे पण भावनांचा होई रोजच चुराडा 
नववा बांध मुलांसाठी सर्वस्व अर्पणाला 
पाखरांनी घेतली भरारी ती कायमचीच 
दहावा बांध आत उफाळणाऱ्या ज्वालांना 
स्फोट तर रोजचं पण ऐकणारे कुणीच नाही 
सांगा आता घालू अजून बांध कोठे आणि किती
सगळी कामापुरतीच गोडबोली स्वार्थी नाती
जिथे भावनांना रोजच तिलांजली द्यायची
अन् विचार करावा की
असेल उद्या तरी आपला दिवस सुखाचा
समजावून सांगावे हेच कायम मीच
समाधान मानणाऱ्या त्या माझ्या मनाला

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून

शब्दवेडा किशोर

White आयुष्य हा गोतावळा
जणू कैवल्याचा मेळा
विविध नात्यांच्या नाना कळा
कधी गैरसमज चा हिंदोळा   ||१||

कुणी रागीट,कुणी भोळा
कुरबुरी वर कानाडोळा
जपायचा हा जिव्हाळा
संभाळूनी या वादळा  ||२||

भासे मधमाशी चा पोळा
सुमना भोवती पाखरं गोळा
कधी नात्यांचा पाचोळा
तर कधी बरसे घननिळा    ||३||

कधी श्रृंगार दिसती सोळा
कधी मधुर गित गायन गळा
कधी भिडे डोळ्याशी डोळा
घेई संभाळूनी विठू सावळा    
||४||

©शब्दवेडा किशोर #माझ्या_लेखणीतून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile