Nojoto: Largest Storytelling Platform
prasadghadge4973
  • 4Stories
  • 37Followers
  • 20Love
    0Views

Prasad Ghadge

  • Popular
  • Latest
  • Video
b61c20fe7badc0ce0ba81ea35d1eca71

Prasad Ghadge

प्रेम करा पण प्रेमात Timepass नको
तो - I Love You
ती - फक्त एका अटीवर हो बोलेन.
तो - अट सांगून तर बघ.
ती - जर आयुष्यभर साथ देणार असशील तरच हो बोलेन.
तो - अगं राणी ही काय अट झाली का, मी तर सर्वस्व तुझाचं झालोय ग, मला आता माझं उरलेलं आयुष्य तुझ्या सोबतचं काढायच आहे.

(ती निर्भान होऊन त्याचा शब्द न् शब्द ऐकत होती, तिला विश्वास बसत नव्हता की कुणी तिच्यावर सुद्धा इतकं प्रेम करणार आहे, तिने एक ही क्षण न घालवता त्याला हो बोलून टाकलं, दोघे एकमेकांसोबत खुप खुश होते वेळ पण छान जात होता, गप्पा टप्पा, भेटी- गाठी, रूसवा-फुगवा, जे प्रेमात असत ते सगळ अगदी व्यवस्थित सुरू होतं की अचानक तिला एक प्रश्न सारखा सतावू लागला, त्याने पण तिच्या मनातला अस्वस्थपणा बरोबर हेरला)

तो - काय ग पिल्लू काय झाल माझं काही चुकल का?
ती - नाही रे तुझं काहीच नाही चुकलं.
तो - मग तू इतका विचार कसला करत आहेस, दोन दिवस झाले पाहत आहे मी तू खुप टेंशन मधे आहेस.
(त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळयातून चटकन पाणी आले व ती बोलू लागली)

ती - तुझ्या घरचे मला Accept करतील ना रे.....
तो - अगं बस एवढसं कारण आणि तू एवढं टेंशन घेतलं आहेस मी आजच बोलेन घरच्यांशी.
एवढ बोलून तो निघून गेला, ती त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहतच राहीली )
तो - आई बाबा मला तुमच्याशी खुप महत्वाच बोलायचय.
वडिल - काय बोलायचयं.
आई - अरे बोल ना बाळा काय झालं.
तो - माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचय....
(हे ऐकताच त्याच्या वडिलांना त्याचा खुप राग आला, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या आवेशातच त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली, त्याची आई मध्ये आली व बोलू लागली)
आई - अरे तुला कळतय का तू हे काय बोलतो आहेस, तुझी हिंमत झालीच कशी आमच्याशी अस स्वत:च्या लग्नाबद्दल
बोलायची, हेच संस्कार दिलेत का आम्ही तुला, कोण कुठली मुलगी पसंत केली आहेस कुणास ठाऊक....
(कोण कुठली मुलगी पसंत ......केली आहेस कुणास ठाऊक हे त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानावर पडताच त्याला राग अनावर झाला)
तो - आईईईईई.....! मला हव तेवढ बोला पण प्लिज तिला नका काही बोलू, खुप खुप खुप चांगली आहे ग ती खुप प्रेम करते ती माझ्यावर....
(हे ऐकताच त्याची आई स्तब्ध झाली, तिला कळून चुकलेल की त्याची काहीच चुक नव्हती तरीही आपण त्याला बोलत आहोत, पण त्याचे वडिल काही ऐकण्याच्या मन:स्त्थितित नव्हते)
वडिल- तू काहिहि बोललास तरी आम्हाला हे पटलेलं नाही, आता तू हा विषय काढून टाक डोक्यातून.

तो- बाबा जर हेच वाक्य मला जर बहिण असती अण् तिला वापरल गेलं असत किंवा तिला जर या परिस्त्थितीला सामोरं जाव लागल असत तर तुम्हाला कसं वाटल असतं...
(हे ऐकून त्याचे वडिल त्याच्याकडे पाहतच रहिले, त्याने ही लढाई जिंकली होती, त्याने होकार मिळवला होता, त्याच्या आई वडिलांनी मुलीला न पाहता लग्नासाठी परवानगी दिली होती. आता तीची बारी होती घरी सांगायची, त्याआधी दोघांनी भेटायच ठरवल.)
ती- मला खुप भिती वाटत आहे रे, खुप कडक आहेत माझे बाबा, मला मारतील ते मी जर हा विषय काढला तर...

तो- मग काय करायच ठरवल आहेस.
ती- तू येना प्लिज माझ्या घरी, तू सुरूवात कर मग मी सांभाळून घेईल सगळ.
तो- PROMICE.
ती- हो रे बाबा PROMICE.

तो- ठिक आहे मी येतोय उद्या तुझ्या घरी, तू फक्त तयार रहा OK.

ती- OK..

(ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला, त्याने सगळी परिस्त्थिती तिच्या वडिलांना सांगितली तिच्या वडिलांचा रागाचा पारा चढला, तळपायाची आग मस्तकात, तिला जोरात हाक मारून बाहेर सगळ्यासमोर बोलवण्यात आलं, ती थरथर कापत होती, दरदरून घाम आलेला, तिची अग्निपरीक्षा तर नव्हती पण त्यापेक्षा कमी पण नव्हती, ती बाहेर आली सर्वासमोर, तिला विचारण्यात आलं की हा मुलगा जे बोलतो आहे ते खरे आहे काय, तिला फक्त हो किंवा नाही हे उत्तर द्यायच होत, त्याने त्याची कामगिरी एकदम चोख बजावली होती आता तिची बारी होती, तिने त्याच्याकडे पाहिले तो आशाभूत नजरेने तिच्याकडे पाहत होता बहुतेक त्याला कळून चुकलेल की ती भितीपोटी माघार घेईल, वातावरण खुप तापलेलं होत, सगळे तिच्या उत्तराची वाट पाहत होते, ती बोलू लागली) …

ती - बाबा खुप विश्वास आहे ना तुमचा तुमच्या लेकिवर, तर मग माझ पण हे कर्तव्य बनतं की माझ्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगावी जर मी तुम्हाला हे नाही सांगितल तर मी तुमचा विश्वासघात केल्यासारख होईल. बाबा तो जे जे बोलत आहे ती एक न् एक गोष्ट खरी आहे, हो प्रेम करते मी त्याच्यावर आणि तुमची परवानगीने मला लग्न करायचय त्याच्याशी, प्लिज बाबा एकदा सकारात्मक पणे विचार करा आमच्या नात्याबद्दल आणि हो तुमच्या पद्धतिने त्याची कसोटी घ्या पण प्लिज एकदा त्याचा विचार करा.....

(तिच्या घरचे सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते अन् ती बेभान होऊन आपल्या प्रेमाची बाजू मांडत होती, आणि तो आनंदाश्रू ढाळत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता, त्याला गर्व वाटत होता की एका खुपच जबाबदार व समजुतदार मुलीशी तो प्रेम करत होता) यानंतर काय.... अहो काय होनार तिचे वडिलांनी काहीच प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले व काही वेळांनी परत आले व तिच्याकडे पाहून एक मस्त स्माईल दिली, तिनेही जराही विलंब न करता बाबा अशी मोठी किंकाळी मारून बाबांना जोरात मिठी मारली.... मित्रांनो आता हे सांगायला नको की त्यांच लग्न झाल, प्रेम करायला सोप्प आहे पण ते निभवायला वाघाचं काळीज लागतें.
                                                            S.D....... #Sachin_Tendulkar_Birthday
b61c20fe7badc0ce0ba81ea35d1eca71

Prasad Ghadge

RIGHT CARE PATHOLOGY LAB .
रक्ताच्या तपासण्या या सवलती च्या दरात उपलब्ध केल्या आहेत.त्याचा फायदा जास्तीत जास्त  करून घ्यावा अशी विनंती.
*तपासण्यांचा संच :(पॅकेज)*

1) *IRON PROFILE*
-Complete blood count
-Iron TIBC
-ferritin lavel

*Regular Cost : 1250/-*
*सवलत दर :835/-*

2) *DIABETIC PROFILE*
-Blood Suger F/PP
-HbA1c
-Lipid Profile

*Regular Cost : 1060/-*
*सवलत दर: 625/-*

3) *KIDNEY FUNCTION TEST*
-BUL
-Creat
-Uric Acid

*Regular Cost: 370/-*
*सवलत दर : 185/-*

4) *LIVER FUNCTION TEST*
-Total and Direct billi.
-SGPT
-SGOT
-Alkaline
-Total Protein
-Albumin

*Regular Cost: 550/-*
*सवलत दर : 275/-*

5) *WELL WOMEN PROFILE*
*(वयाच्या चाळीशी नंतर करावयाच्या तपासण्या)*
-Haemoglobin
-BSL f
-Calcium
-Lipid Profile
-FSH
-TSH
-Urine Routine

*Regular Cost : 1380/-*
*सवलत दर : 790/-*

6) *VITAMINS*
- Vitamin B12
-Vitamin D

*Regular Cost : 2100/-*
*सवलत दर : 1470/-*

RIGHT CARE PATHOLOGY LAB ,
ATHANG MULTISPECALITY HOSPITAL SINHGAD COLLEGE ROAD AMBEGAON BK.
8080666732/9529849687 #Corona_Alert #health
b61c20fe7badc0ce0ba81ea35d1eca71

Prasad Ghadge

मृत्यू



खूप दिवस झालो जगत होतो, जगता जगता उन्हाळा पावसाळे पाहत होतो. 
त्या मध्ये ही कधीतरी  आनंद,दुःख, आॠ,  वेदना सहन करत होतो. 
यातही मृत्युचा विचार करत होते. 

मृत्यू म्हणजे काय?
आयुष्यात दोन मिनिटेसुदधा  माझ्या  जवळ बस कोणी बसले नाही पण आज मात्र  सगळे  माझ्या  सोबत बसले होते.

 कधी कोण  दोन पावले माझ्या सोबत चालायला  तयार नव्हते पण आज पूर्ण समाज माझ्या  सोबत चालत होता.

कधी कोणी एक साधी भेटवस्तूही  दिली नाही पण आज मात्र  माझ्या फुलांचा वषाॅव होत होता 
पण त्याच्या सुगंध घेण्यासाठी माझ्या मध्ये जीवच नव्हता. 
कधी कोणी एक साधा रुमाल दिला नाही पण आज मात्र माझ्यावर  शुभ्र पांढरा कापडाचा आहेर चढवला जात होता ,तोही माझ्यावर शोभून,उटाळून दिसत होता.

कधी कोणी  दोन क्षण निवांत बसण्याची  इंचसुदधा जागा दिली नाही आणी आज कायमचे झोपण्यासाठी लाकडाचा सुंदर गलिच्छा सजवला होता. 

आज मला कळाले की मृत्यू किती सुंदर आहे ते आणि उगीच मी जगत होते .!!!!!!!!!🙏🏻
    
-----------------  Kranti Ghadge मृत्यू

मृत्यू #poem

b61c20fe7badc0ce0ba81ea35d1eca71

Prasad Ghadge

मृत्यु


खूप दिवस झालो जगत होते, 
जगता जगता उन्हाळा पावसाळे पाहत होतो.

 त्या मध्ये ही कधीतरी  आनंद,दुःख, आॠ,  वेदना सहन करत होते.
 यातही मृत्युचा विचार करत होते. 

मृत्यू म्हणजे काय?
आयुष्यात दोन मिनिटेसुदधा  माझ्या  जवळ बस कोणी बसले नाही पण आज मात्र  सगळे  माझ्या  सोबत बसले होते. 

कधी कोण  दोन पावले माझ्या सोबत चालायला  तयार नव्हते पण आज पूर्ण समाज माझ्या  सोबत चालत होता.

कधी कोणी एक साधी भेटवस्तूही  दिली नाही पण आज मात्र  माझ्या फुलांचा वषाॅव होत होता 

पण त्याच्या सुगंध घेण्यासाठी माझ्या मध्ये जीवच नव्हता. 
कधी कोणी एक साधा रुमाल दिला नाही पण आज मात्र माझ्यावर  शुभ्र पांढरा कापडाचा आहेर चढवला जात होता ,तोही माझ्यावर शोभून,उटाळून दिसत होता.

कधी कोणी  दोन क्षण निवांत बसण्याची  इंचसुदधा जागा दिली नाही आणी आज कायमचे झोपण्यासाठी लाकडाचा सुंदर गलिच्छा सजवला होता. 

आज मला कळाले की मृत्यू किती सुंदर आहे ते आणि उगीच मी जगत होते .!!!!!!!!!🙏🏻

                   -----      Kranti Ghadge 8080666732 Anshuman tripathi My_Words✍✍

Anshuman tripathi My_Words✍✍


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile