Nojoto: Largest Storytelling Platform
prajaktagharve9261
  • 14Stories
  • 18Followers
  • 94Love
    99Views

Me_praju

प्राजू...मी माझी...✨🌠✍🏻

  • Popular
  • Latest
  • Video
b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

सहवासाचा आनंद,
भावनांच सुख 
भोगण्यासाठी प्रेमचं हवं.
प्रेम सोबत असेल तर मग 
जगण्यासाठीअजून काय हवं..

प्राजू मी माझी

©Prajakta Gharve Ghogale मी माझी ✨

मी माझी ✨ #मराठीकविता

15 Love

b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

आनंदलहरी समुह आयोजित 
विषय - शब्दाविना
©️®️ प्राजू मी माझी 🪄✨
**********************************
@everyone 

कळेल का रे तूला सख्या भाव माझ्या मनातला..
हृदयात माझ्या अपार प्रेम अन् तुच अंतरात वसलेला..

ध्यानात मनात सगळीकडेच अस्तित्व  तुझंच..
शब्द हरवतात माझे अन् होते मी अबोल हतबलच.

मांडू कसे शब्द मी समोर असताना पडते भूल..
शब्दा विना कळेल का रे तूला माझ्या अंतरातली सल..

जाणून बघ एकदातरी मला काय वाटतं..
शब्द पोकळ माझे तोकडे हळवी अबोल प्रीत..

नाही गरज शब्दांची डोळेच माझे बोलतील बघ..
हृदयात वाढेल धडधड अन् स्पर्शच मन मोकळं करतील बघं..

शब्दाविना चल प्रेम करून तर बघू..
जमेल नक्की दूर राहून जन्मभर नाती जपू..

©️®️ प्राजू मी माझी ✨

©Prajakta Gharve Ghogale
b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

मनातलं मनात ठेऊन उगाच जगत होते, 
पाऊस नसतांनाही आठवणींत चिंब भिजत होते.
तुझ्या पसंतीत तर मी उतरले नव्हते.
तरी मनापासून तुला देवासारखं पुजते.

©Prajakta Gharve Ghogale
  मी माझी ✨🖋️✨🪄

मी माझी ✨🖋️✨🪄 #मराठीकविता

27 Views

b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

जीवनाचा प्रवास माझा 
तुझ्या मिठीतच संपावा.
शेवटचा श्वास माझा
तुझ्या समोर थांबावा.

©Prajakta Gharve Ghogale #walkingalone ©® प्राजू मी माझी ✨💕

#walkingalone ©® प्राजू मी माझी ✨💕 #मराठीकविता

8 Love

b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

तिन्ही सांजेला केशरी रंग उधळतो भास्कर
आठवांचे ढग दाटून आले उरी मिलनाची लहर.
@प्राजू मी माझी

©Prajakta Gharve Ghogale प्राजू मी माझी..💞

#merimaa

प्राजू मी माझी..💞 #merimaa #मराठीकविता

2 Love

b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

वळणावळणाच्या वाटा तर कधीतरीच तुझ्या घरापर्यंत जातात..
मन भरकटत जातं अनेकदा पण पुन्हा पावले माघार घेतात..

तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसते मी आजही..
तुझ्या प्रतिक्षेत निरंतर झुरते मी आजही..
तू येत नाहीसच पण तरी मी न्याहळते आजही..
वाटेवर तुझ्या पावलांची चाहूल लागते आजही..

वळणावळणाच्या वाटा तर कधीतरीच तुझ्यापर्यंत पोचतात..
पण माझं वेडं मन माझ्यात नसतंच असतं फक्त तुझ्यासोबत..

©Prajakta Gharve Ghogale मी माझी 💞

मी माझी 💞 #मराठीकविता

5 Love

b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

#mepraj (शब्दऋणी✨🪶)
@Praju...
मनातली खळबळ लिही ना..
हृदयातलं माझ्यासाठीचं प्रेम लिही ना..
तुझ्या मनातल्या तळ्यात 
आकंठ बुडायला आवडेल मला..
तुझा आकांत, आक्रोश ऐकायला आवडेल मला..
वाटलं कधी तर हो रिक्त..
मनमोकळ करून 
हो ना माझ्याकडे व्यक्त..

©Prajakta Gharve Ghogale
b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

क्षण अलगद निसटून जातात वाळूसारखे..
आठवणी रुंजी घालतात अहोरात्र मनामधे..
गतकाळाच्या सावल्या छळतात 
बिलगतात स्वप्नामधे..

©Prajakta Gharve Ghogale
b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

शपथ
शपथ पत्र...हे मी तुला लिहीत आहे..
माझ्या हृदयातल्या भाव मी त्यात ओतत आहे..
अंता पासून अनंता पर्यंत 
माझ्या आयुष्यात.. 
मनात, ध्यानात, विचारात, स्वप्नात
नसानसात फक्त तू आहेस..
तुझे शब्द तुझ्या आणाभाका
वाचनाची तुला शपथ आहे..
साथ जन्मोजन्मीची  
सोडू नकोस एक तुझीच आस आहे..

©Prajakta Gharve Ghogale @ प्राजू..मी माझी...✨💕#Mee Maazi..✨💞
©®मराठी कविता #लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी
उर्दू शायरी# विचार# भावना #बरचं काही....प्राजू..मी माझी ✨💕



#apart

@ प्राजू..मी माझी...✨💕Mee Maazi..✨💞 ©®मराठी कविता लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी उर्दू शायरी# विचार# भावना बरचं काही....प्राजू..मी माझी ✨💕 apart

2 Love

b8e530e77345102d575f7934069afe08

Me_praju

पहिली भेट तूझी माझी..
कायम राहील माझ्या स्मरणात .
आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण
म्हणून मी माझ्या हृदयावर 
कोरलंय सुवर्ण अक्षरात..

वेळ भेटीची..
मिलनास मी आतूर किती..
हजार विचारांचा गोंधळ मनात..
भेटीसाठी बहाणे मी बनवू किती..?
प्राजू मी माझी ✨....

©Prajakta Gharve Ghogale #भेट 
@ प्राजू..मी माझी...✨💕#Mee Maazi..✨💞
©®मराठी कविता #लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी
उर्दू शायरी# विचार# भावना #बरचं काही....प्राजू..मी माझी ✨💕

भेट @ प्राजू..मी माझी...✨💕Mee Maazi..✨💞 ©®मराठी कविता लेख# चारोळी# दोनोळी # हायकू रचना # तिनोळी उर्दू शायरी# विचार# भावना बरचं काही....प्राजू..मी माझी ✨💕

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile