Nojoto: Largest Storytelling Platform
kokateabhi4991
  • 9Stories
  • 112Followers
  • 59Love
    19Views

kokate abhi

my विरंगुळा αβHij££t

  • Popular
  • Latest
  • Video
c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

स्वप्न 1

अवतरली एक परी माझी स्वप्न सुंदरी
काळ्या कुतल कुरळ्या केसांवरती 
दिसतो शोभुन गजरा रानवेलींचा
कोमल सतेज कांतीचा रंग केवड्याचा
तेजोमय पिवळ्या धम्मक्क रानफुलांचा 
बटीचा आकडा नागमोडी वळनाचा
नयन धारदार तेज तलवार
गुलाबाचे ओठ अन् त्यावरचं नाक जणु धनुष्य-बाण
मंजुळ आवाज कोकीळीचा
घेतो अचुक वेध माझ्या मनाचा
आशा देखन्या रुपानं भुरळ घातलीया 
माझ्या मनाला
                                
                                स्वप्नात..... पहाटेचं स्वप्न......

पहाटेचं स्वप्न...... #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

आज आपल्या संविधानाला 70 वर्षे झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या संविधान  बनवून दिले. त्यामध्ये बाबासाहेब असे म्हणतात की "आम्ही भारताचे लोक" विचार करा खरंच आपण भारताचे लोक आहोत? का भारतात राहतो म्हणून आम्ही भारतीय एरवी कुठे असतात हे भारतीय? खरंच तुम्हाला वाटतं का  तुम्ही एक सच्चे देशभक्त आहात .
आपण एका सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष राज्याचे सतर्क नागरिक आहोत.आजचे राजकारण पाहिले तर तुम्हाला खरंच वाटते का भारतात लोकशाही आहे ? आणि या लोकशाहीला जोपासण्यासाठी आपण खरंच प्रयत्न करता? कोणत्या पद्धतीने भारतात सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय मिळतो?. खरच भारतात विचारांचं स्वातंत्र्य आहे  का? अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व  उपासना यांचे स्वातंत्र्य आहे? दर्जाची व संधीची समानता नेमकी कोठे आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक केलेला निर्धार त्याचं काय झालं?
दरवर्षी 26  नोव्हेंबरलाच या संविधानाची आठवण येते आणि ती फक्त व्हाट्सअप फेसबूक इंस्टाग्राम ट्विटर यांवर स्टेटस ठेवण्यासाठीच खरंच तुम्हालाच वाटतं की बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे चुकीचं होतं? नाही ना मग या संविधानाचं पालन करण आणि करायला लावणार ही तुमचीच जबाबदारी आहे हे विसरता कामा नये. संविधान

संविधान #Comedy

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

नाही काही  सांगणं
 नाही काही मागणं
 नाही काही लपवलं
 तुझ्या पासनं

 तरी का गं गेलीस तु  निघूनं
 मला हे असं एकट्याला टाकूनं
 तुझ्याविना जीव गेला बघ विठूनं
 आला कोणता हा  हुंदका दाटून

 डोळ्यांमधले पाणी नाही कोणा दिसणारं
 अंतरातला घाव हा कसा कोणा कळणारं
 तुझ्याविना हा घावं सांग कसा भरणारं
  नाही कधी केली कल्पना स्वप्नातही

  तुझ्याविना मी विरह

विरह #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

झालं गेलं सारं गंगेला मिळालं
करु नको आता त्याचा विचारं
आता नाही खचायचं
जिंकण्यासाठी पेटुन उठायचं

एक विचार एक आचार
नाही बनायचं लाचारं

आहे एक एक क्षण महत्वाचा
नको विचार भविष्यातल्या भुताचा
घडायचा आणि घडवण्याचा
तुझ्यातल्या तुझ्या स्वप्नांचा ध्यास

ध्यास #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

साद घालते मन माझे तुझ्या मनाला

चालु किती मी एकला या वाटेवरी
तुझ्या आठवांचे काहूरं जळते उरी
विसरलो दुनिया जरी दुनिया विसरली तरी
तु या जिवाची स्वप्नसुंदरी या मदनाची मंजिरी

माझी दुनिया फिरते तुझ्याचं भोवती दिस्-रात
निघते न्हावुन अंतरीच्या आसवात
ओढ तुझी गोड आणते ओढीत
टाकते पुन्हा गुंतवून आठवांच्या बेडीत

सांग तरी मी आस कुठवर झुरायचं
माझ्या अंतरीचं लव तुला कस कळायचं
सांग कधी ऐकू येणार तुला या मनाची साद
हवा आहे तो फक्त तुझा एक रिप्लाय
                       





अजुनही वाट पाहतोय....... मनाचा साद

मनाचा साद #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

तु एकला चाल पुढं
मागुन येइलं सारं जनं.....

दे सोडुन मोह- मद- मत्सर
मागे पडला विचार
नको होवुस तु 
चंद पैशांसाठी लाचार 
घट्ट राखुन ठेव मातीशी ईमान 
नको होवुस तु बेइमान

तु एकला चाल पुढं
मागुन येइलं सारं जनं.....

नको करु भेद 
धर्म-पंथ-जाती अनेक
वेगवेगळे आचार-विचार
तरी साऱ्यांचे रक्त एक
कर साऱ्यांशी सलगी
नको त्या उगिचच्या दंगली

तु एकला चाल पुढं
मागुन येइल सारं जनं..... वाट

वाट #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

आई......
दगडालाही फुटतो तुझ्या मायेचा पाझरं
असा कसा मी कपाळकरंटा तुझा लेक गं

गेलो स्वतःच्या स्वर्थापोटी
स्वप्नांनच्या दुनियेत निघुन
जिनं दाखविली स्वप्नं
गेलो तिला विसरुन

जिनं माझ्यासाठी खाल्या खचता 
वेळप्रसंगी काढला उदराला चिमटा
सणा-सुदिला मला नवा कपडा
असायचा आई तुझा पदर फाटका

नाही समजली तुझी माया कधी
नाही समजला तुझा त्याग
दाटली आहे आज माझ्या डोळ्यात आग
वाटली आहे मलाच माझी लाज आई.....

आई..... #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

नको शोधुस तु गर्दीत स्वतःला
नाही बनवला त्यानं तुझ्यासारखा कोनाला
आहे गाठायाचं ध्येय तुला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा

आयुशाचा वाटेनरून चालताना 
जातील तोल सांभाळ स्वतःला
जावू नको खचुन नुसत्या सुरवातीला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा

कडु-गोड आठवणी
चांगले-वाईट अनुभव असतील साथीला 
विसरू नकोस या माय-मातीला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा

आता पर्यंत साथ देनारे हात गळुन पडतील 
पन तु नको विचार करु त्याचा 
नाही बनवला त्यानं तुझ्यासारखा कोनाला
आहे गाठायाचं ध्येय तुला
नाही थांबुन चालायाचं लेकरा
आता नाही थांबुन चालायाचं लेकरा सल्ला

सल्ला #poem

c1b44f368ebcfbdf5b80a32c9c363e01

kokate abhi

#Pehlealfaaz दिसं रोजचा नवा रोजचं गानं नवं
मानाचं अप मानाचं
चार-चार ओळींचं
जुनं-नवं पुन्हा तेच-तेच कडवं
 
हारणं जिंकणं एका क्षणाचं 
मानाचं अप मानाचं
चार-चार ओळींचं
जुनं-नवं पुन्हा तेच-तेच कडवं short poem

short poem #Pehlealfaaz


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile