Nojoto: Largest Storytelling Platform
hrishikeshpatene7128
  • 8Stories
  • 4Followers
  • 29Love
    0Views

Hrishikesh Patene

  • Popular
  • Latest
  • Video
c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

ओले झाले देह सारे,
नाही कुठे थंडावा,
ना शांततेचा निर्मल झरा 
ओथंबुन बरस विनंति गगनाला ,
जाणिवांच्या उष्ण वेदना
असह्य झाल्या घरबसल्या,
अतुर त्या खिडकीमधून
नजर दूरवर तीव्र फेकल्या,
मृगजळ दिसते नयनी आत्ता
या वलयावर भेटेन सगळ्यांना,
निराशा हाती उरल्या फक्त
अजून किती वेळ आहे हे संपायला ।।श्री।।
 
                               😓©hriship20😓 #summer#lockdown
c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

आयुष्याच्या रेषा इथपर्यंत गाठत
आत्ता तू या क्षणाला पोहोचलेस,
ह्या वेळेत कधी हसत तर कधी रुसत
आमचं मनोरंजन करत राहिलेस,
अनेक क्षण अनेक आठवणी साठवत
मैत्रीच्या जगात अविभाज्य झालेस,

अश्या Good girl साठी मागणे माझे एक :

बाप्पाकडे नेहमीच मागणे तू राहा आनंदात,
हसत खेळत हे जीवन जग तू बिनदास्त ,
प्रकटदिवसाच्या शुभेच्छा देतो या अंदाजात,
विसरू नको मात्र ह्या मित्राला मला जाणी म्हणतात .

         HBD#PooJa#©Tannu🎂💐 #Morning #friendbirthdaywish
c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

भेगाळलेल्या क्षितिजावरती 
मधाळलेला चंद्र ,
लोभस गोंडस पसरत छटांवरी
अवनी उजळीत भ्रम्हांड ।

नवी वधु नवा थाट मांडुन ,
शोभेवान नक्षत्र चांदणे लेऊन ,
अंगावरचा पदर पसरून ,
ओटी भरेल कोणी याच आशेनं ।

मधांद तो चंद्र प्रखरत चालला ,
ठावच नाही त्या ब्रह्मांडाला ,
विसरून तो आपल्या छटेला ,
रंगून गेला बघण्यात आपल्या नटीला ।

नटी म्हणजे कोण कोणाची ती ?
चंद्रावरील हरणाच्या कि सस्याच्या डागांची ?
ठावच नाही नाव त्याला त्या नकटीची ,
परिस्तिथी मात्र गंभीर स्वरूपाची ।

प्रतिष्ठावान तो चंद्र प्रेम जडले त्याला ,
अंधारी सुंदरीच्या प्रेमात तो पडला ,
केव्हाच्या काळीचा तो चांद होऊन मतला ,
भृंगासारखा कमळामध्ये तो केव्हाचा गुंतला ।

भान हरपून देह सोडून ,
समाधिस्त मग झाला ,
पौर्णिमेनंतर मग १५ दिवस 
तो अंधारीच्या प्रेमात बुडाला ।।श्री।।
                              ♥@hriship20♥ #Moon ♥
c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

🌅करुणा🌅

हे अथांग सागरा नेशील मला का रे दूर ,
दाटून एकदा वादळा सारखा,
बदलशील का रे आयुष्याचा नूर ।।

फिरवून तुझ्या नौकेवरूनी,
जगणेही फिरवशील का आत्ता 
आणून तुझ्या लाटांमधुनी ,
भेटवशील का रे त्या  दिगंता ।

सुखदुःख झाले मला आज खूप ,
चढाओढ थांबवशील का रे येथे ,
ह्यांच्याही पलीकडे नाही माप ,
नक्की नेशील मला का रे तेथे ।

पुन्हा नको तो भूतकाळ आणि भविष्यकाळ,
चिंता नाही ना कुठल्या अपेक्षांची माळ ,
दर्शन मला हे तुझेच व्हावे हाच माझा सु:काळ,
हेचि मला देशील का माझ्या हाती वर्तमान काळ ।

मला आवडतोय तो केशरी गोळा ,
थांबवशील ना तू मला तिथे ,
दर्शनात मला विसर्जित करुनि,
आणि काय मला हवे येथे ।।श्री।।
                             🙏@hriship20🙏 #river #request🌅

#river request🌅 #poem

c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

😊फक्त तू😊

तू जिथे तिथे मी असावे,
मी जिथे तिथे तू असावे,
प्रश्न तो कोणताच नसावा ,
सोबत मात्र आपुल्या कोणीच नसावे ।

कधी रुसवे कधी गोडवे,
पसरून हस्याच्या अनेक छटा,
दिलाचे तेव्हा ठोके चूकावे,
सोबत मात्र आपुल्या कोणीच नसावे ।

तू असशील माझ्या सोबत येथे ,
जगणेहीे माझे सुंदर होईल ,
जीवनाच्या सुखदुःख लाटांमध्ये,
सोबत मात्र माझ्या फक्त तूच असावे ।।श्री।।
                               😘©hriship20😘 #onlyU😘

onlyU😘 #poem

c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

जगणे सर्व उधळून द्यावे ,
जसे वाटावे फुलाचा सुगंध ,
थोडा मधाळ तर कधी धुंद,
आयुष्य असेच जगावे स्वछंद ।।

कधीतरी व्हावे लहान,
 तर कधी व्हावे प्रौढ,
तर कधी व्हावे विशाल अंतःकर्णी,
कधी अवरावी आपली उर्मी ।

कधी रुसवे कधी विनोदी,
कधी उग्र तर कधी संन्यासी,
कधी मार्गस्थ तर कधी एकांती,
तर जगावे निरपेक्ष आनंदी ।।

अश्या जगण्यात :

नको ती आशा कुणाकडूनही,
मरणे परवडेल कित्येकदा,
जीवन मरणाच्या उम्र रेषेवर ,
रिकामाच आलोय मी अनेकदा ।।श्री।।
                                         @hriship20😊 #Wish
c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

रचलेला पसारा घेऊन सोबत,
किती दिवस घरात बसलोय ,
असलेल्या कामाची करत कसरत,
गावाच्या त्या आठवणीत रमलोय ।

आज आईबाबांची खूप आठवण येते,
व्हिडीओ कॉल त्यासाठी दररोज करतोय,
अडकून मात्र प्रत्यक्षात कल्पना नेते,
यासाठी गावाच्या त्या आठवणीत रमलोय,

मित्रमंडळी तुम्ही दूर सगळं काही भयाण वाटतंय,
जैविकतेच्या युद्धात ही आग काशी उगीच पेटलेय,
कहर झालाय डोक्यात अन बरचं काही दाटलाय,
यासाठी गावाच्या त्या आठवणीत रमलोय ।

करवंद, आंबे, जांभूळ आणि फणस,
विचारात फक्त तोंडाला पाणी आलाय,
चव सोडा वास पण नाही नाकाला,
यासाठीच गावाच्या त्या आठवणीत रमलोय ।।श्री।।
                                     @hriship20 #Light
c36c1b741145d71a284413f546389337

Hrishikesh Patene

*शोध*

भेटशील कधी केव्हा मला तू,
कधी कुणास ठाऊक कळेल,
ओढ मात्र अतुरलेली जिवा,
कधी तुला ओढून आणेल ।

भेटशील कुठे आणि कशी ,
हा प्रश्न नेहमी मला छळतो,
झोपेलाही झोप नाही अशी,
तिलाही मी तुलाच मागतो ।

मागणे माझे इथेच लपते ,
तुला प्रत्येकात पाहता ,
शर्यत मात्र चालूच आहे,
तुला रोजच्या गर्दीत शोधता ।।श्री।।
                              😍©hriship20😍 #Love #शोध♥

#Love शोध♥


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile