Find the Best Pournima Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about kojagari pournima, pournima, bayticol pour on how to use in hindi, you cannot pour from an empty cup, pour meaning in hindi,
Pournima Mohol
तमाचा अंधार, षड्रिपूंचे वादळ, तशात माझी जीवन नौका , हेलकावणे अटळ... वाऱ्या सम वेग मनाचा आवरता आवरेना, देवालयातला देव मज कुठे दिसेना... मनाची होता गुंता गुंत , आठवले मज संत, तुका,सावता,गोरा,चोखा अन् ज्ञानिया सारखे महंत ... सत्व गुणांचे मग मेघ दाटले , काम ,क्रोध वाहून गेले, लोभ ,मोह,मद, मत्सर मातीत निमाले... मज आता दिसू लागले ज्ञानाचे स्वयं प्रकाशित किरण, सत्वाने स्वत्व शमले चढले स्थितप्रज्ञतेचे स्फुरण... #Pournima Mohol 21-08-2023 12:20 a.m ©Pournima Mohol #ChaltiHawaa
#ChaltiHawaa #Poetry #Pournima
read morePournima Mohol
जेव्हा शब्द मुके होतात तेव्हा लेखणीही थांबते डोळ्यातून व्यक्त होताच लेखणीतील ओळ थेंब झेलते... मुक्याच भावना साऱ्या व्यक्त होतात मुक्याने पाट वाहतात मग मनातील अबोल ओझ्याने... नयन वाचून अंतरंग मी लिहीत जाते नीरव शांततेत स्वतःला ओळखत जाते मनाशी मनाचा संवाद करत जाते... मुक्या झालेल्या शब्दांना मग मनात येतो महापूर झरा वाहतो मग शब्दांचा पण ओठांवर असते तरीही एक अबोल धून... एक अबोल धून जेव्हा शब्द मुके होतात...... #Pournima Mohol 11-06-2023. 04:00p.m. ©Pournima Mohol #merikHushi
Pournima Mohol
कधी कधी वाटतं एकांतात बसावं, निसर्गात रमावं, स्वतःशीच हितगुज करावं, लोक परिक्षण करणाऱ्या लोकांमध्ये राहून आपण मात्र स्वतःचं आत्मपरीक्षण करावे... चढा- ओढ , हेवे - दवे, रुसवे - फुगवे ही तर जगरहाटीच आहे आपण मात्र त्यापलीकडे एक वेगळं जग निर्माण करावं... स्वतःतला स्व बाजूला ठेऊन स्वतःला ओळखावं, मनाला प्रेम आणि सौहार्दपूर्ण शांततेने सजवावे... निसर्गात रमताना अहंकाराची पानगळ होताना पहावं, कधी कधी वाटतं स्वतःशीच हितगुज करावं आणि हितगुज करताना अध्यात्मात स्व समर्पण करावं... #Pournima Mohol Written on 27-05-2023 at 7.30 p.m. ©Pournima Mohol #walkalone
Pournima Mohol
नभातली चांदणी धरतीवर अवतरली शुभ्र साज अन् सुगंध लेऊन आली रातराणी अंगणी फुलली... तिच्या बहरण्याने मनी प्रेमभावना उमलली सख्या तुझ्या आठवणीने सखी लाजून भिजली रातराणी अंगणी फुलली... मनाच्या मिट्ट काळोखात अवचित चांदणी लुकलुकली प्रेम अन् अध्यात्माची घट्ट वीण पडली रातराणी अंगणी फुलली... तिच्या फुळण्याने अंगणी माझ्या रुख्मिणी संसार रस प्राशली राधा श्रृंगार रस ल्याली अन् मीरा भक्ति रसात न्हाली रातराणी अंगणी फुलली... सख्या तुझ्या आठवणीने सखी व्याकुळ झाली ओढ प्रितीची ओढ भक्तीची आज एकसंग झाली रातराणी अंगणी फुलली... #Pournima Mohol 17-05-2023 ©Pournima Mohol #Hum
Pournima Mohol
ये चांद जब भी आसमान में आता है मेरे मेहताब की याद दिलाता है ये रात की खामोशी ये हवा की मदहोशी उन्हें आसपास महसूस कराती है उनके करीब होने का एहसास जताती है जब भी बादलों में ये चांद खो जाता है मेरा मन दर्पण बिखर सा जाता है ये तन्हासी होती है फिर जिंदगी रूठी रहती है चांद से उसकी चांदनी #Pournima Mohol ©Pournima Mohol #चांद
Pournima Mohol
The silence of the moon. The silence of his eyes. The silence of the breeze. The silence of the night The silence of the mind The silence of the soul The silence of our love keep us together silently... #Pournima Mohol ©Pournima Mohol #lovequote
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited