Nojoto: Largest Storytelling Platform
shrikantpatekar1167
  • 22Stories
  • 3Followers
  • 145Love
    19.8KViews

shrikant patekar

बस इतना सा हुनर सीखना है जमीन पर रहकर आसमान जितना है।

  • Popular
  • Latest
  • Video
c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

दुर्लक्षिले कुणी जर का, तर निराशेने झुकणे आहे,

 घ्यावी माघार या वाटेतून, हेच बहुदा शिकणे आहे,

 शब्दांच्या प्रवासात असल्या, अक्षरांचे थकणे आहे,

घेता का कुणी विकत, आयुष्याची कविता विकणे आहे....

©shrikant patekar #Books
c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

मरगळ गुंतलेल्या भावनांची, मनातच आज ठेऊन ये, 
शेवटच्या भेटीला आपल्या, एक सूर्यास्त घेऊन ये.... 
समुद्रकिनारी तुझ्या हातात हात देऊन,
 विसरायचंय मला, जे जपलंय मनात ठेऊन, 
त्याचवेळी पाण्यात, दोघांची पावलं भिजावित
 वाळूसकट त्याखाली, पाहिलेली स्वप्न निजावित,
 अंधार होत असताना, तू करावीस निघण्याची घाई, 
एकटं जावं लागेल तुला, आज मी सोबत येत नाही,
 तेव्हा कुठेतरी व्हावा, हृदयावर घातक वार
 पावलं दूर जात असताना, कोसळावी अश्रूंची धार, 
निघताना मात्र त्या सागराला, सारं काही देऊन ये, 
शेवटच्या भेटीला आपल्या, एक सूर्यास्त घेऊन ये....

©shrikant patekar #SunSet
c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

कसे कोण जाणे | असे काय घडले |
कसे नाते तुटले | एकाएकी ||

विश्वास आटता | काळीज फाटले.
संभ्रम वाढले | प्रेमामध्ये ॥

कोणामुळे झाले। कश्यामुळे झाले |
मला न कळाले । काही तेव्हा ॥

दोष जरा सुद्धा | तुला न मी देतो | 
स्वतःवर घेतो | आळ सारा ।

प्रेम जपताना | झाले नको तेच ।
सगळे माझेच | चुकलेत ||

©shrikant patekar #Past
c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

उष्मा सुन्या निशेची; आली चिरून थंडी, 
वारा मुजोर भारी न्हाली पिऊन थंडी!

खिडकीत आज माझ्या एकांत सोबतीला, 
चिंता, व्यथा, खुशाली, जाते पुसून थंडी! 

गेला निघून सारा रुसव्यात पावसाळा,
 प्रेमामधे अताशा घेऊ जगून थंडी!

(अस्वस्थ तू तिथे अन् येथे अधीर मीही, 
चल साजरी करूया दोघे मिळून थंडी!)

©shrikant patekar #smog

10 Love

c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

खरंच सोपे असेल का सतत आनंदी राहणे ?

२४ तास आनंदी दिसणारा माणूस का सर्वसुखी असतो ?
 प्रसन्न चेहऱ्या मागचा संघर्ष सगळ्यांनाच कुठे दिसतो...

खांभिर तो मनाने, सगळ्या भुमिका लिलया तो पेलतो, 
परिस्थितीच्या काचांवर, तो हसतमुखाने चालतो....

कुणीतरी विचारावे कधी, असा अट्टाहासही नाही त्याचा,
ना दिखाऊपणाचा आव, ना सहानुभूतीचा हाव फुकाचा....

हसण्यावारी नेणे बहुदा अंगवळणीच पाडून घेतले त्याने, 
खरंच इतके सोपे असेल का, सतत आनंदी राहणे ???

असह्य होता विचारांचे ओझे, त्याच्याही मनाचे पारडे कधीतरी जड होत असेल, 
विचारून पहा आपुलकीने, बोलक्या डोळ्यात त्याच्या सगळं काही दिसेल....

©shrikant patekar #Travel
c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

0 Bookings

c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

मेरे इस दर्द का इलाज मत पूछो
यारों कभी उसका नाम मत पूछो।।।

बस आपकी खुशी से खुश है वो
माँ के दुँआवो का दाम मत पूछो।।।

दवा काम ना आए तो दुआ करो
पर खुदा को उसका काम मत पूछो।।।

©shrikant patekar #BookLife

9 Love

c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

कशी सांग रोखू ,नदी आसवाची
किती वाट पाहू , आता साजनाची

कथा ना समजली, खुळ्या पावसाला
कशी प्रित झाली, अमर चातकाची

लपेटून आला , तिरंगी कफन तो
 कुणा दाखवू मी ,चमक काकणाची

नको गोष्ट सांगू , मला त्या सश्याची
कळली ना त्याला , गती कासवाची

नको मान पैसा , हवी फक्त टाळी
असे भूक इतकी , खऱ्या शायराची

©shrikant patekar #WritersSpecial
c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

(पुण्य नाही आज पदरी मोजणीला)
साचले मग दुःख सारे वाटणीला...

तू दिलेले घाव अन त्या आसवांचा
सोसवेना भार आता पापणीला...

लागते बघ गोड नात्यांची शिदोरी
प्रेम अन् विश्वास असता फोडणीला...

ना हवे सोने तिला ना चंद्रतारे
एक प्रेमळ शब्द पुरतो साजणीला...

सोडुनी दे तू चमक त्या चांदण्याची
दे नवा तेजो किरण तू लेखणीला...

©shrikant patekar #SunSet

8 Love

c48a070449e53a6e34c32756a87da321

shrikant patekar

© shrikant Patekar

©shrikant patekar

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile