Nojoto: Largest Storytelling Platform
violetcowan6466
  • 25Stories
  • 101Followers
  • 1.1KLove
    591Views

kavya_premi

I m a poetry writer

  • Popular
  • Latest
  • Video
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

फेब्रुवारी महिन्यातील या काही दिवसांनीच प्रेम व्यक्त होतं का?
प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी गुलाबच लागतं का?

रोज डे ला रोज देऊन इंप्रेस करता प्रेयसीला,
त्याच दिवशी रोज देऊन खरचं काही फरक पडतो का तिला?

प्रपोज डे ला प्रपोज करून देत असता आपल्या प्रेमाची कबुली,
या एकाच दिवसाने तुमच्या प्रेमात पडतात का मुली?

चॉकलेट डे ला चॉकलेट देऊन आपल्या प्रेमातला गोडवा वाढवतो,
पण इतर दिवशी प्रेमातला गोडवा वाढावा म्हणून काय करतो.

टेडी डे ला तिला छानस टेडीबिअर गिफ्ट करता,
पण त्या टेडीबिअर सारखं कधी तिची काळजी घेता.

प्रॉमिस डे ला सर्व वचन देतात प्रेम निभावण्यासाठी,
पण वर्षभर काय करता तुम्ही तेच प्रेम टिकवण्यासाठी.

आता हग डे ला सर्वत्र एकमेकांना मिठी मारल्या जातील,
पण वर्षभर अशी प्रेमाची मिठी मारलीत तर तुमचं नातं अजून मजबूत राहील.

किस डे ला सर्वजण चुंबन घेत आहे,
अरे हीच का आपल्या देशाची संस्कृती आहे.

व्हॅलेंटाईन डे ला तर सर्वत्र प्रेमाचे वारे वाहू लागतात,
हे दिवस फक्त फेब्रुवारी मध्येच का साजरे होतात?

मी या दिवसांच्या विरोधात आहे असं नाही,
पण प्रेम साजरे करण्यासाठी कोणता महिना वा दिवस लागत नाही.

©kavya_premi #Heart
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

पोटी मुलं जन्माला यावे म्हणून व्रतवैकल्य केलं, 
तरीपण का ग आई मला गर्भातच मारलं? 

तू सुद्धा एक स्त्री आहेस ना वाटलं होतं तू तरी मला समजून घेशील.
जर वारसापायी मुलीचा जन्म नाकारला तर पुढची पिढी कुठून जन्माला येईल? 

का करता तुम्ही सगळे वारसासाठी एवढा अट्टहास? 
स्त्री भ्रूण हत्या करून करताय जगाचा नाश? 

मुलगी जन्माला येण्याअगोदरच का झालेली असते नकोशी तुम्हासाठी? 
कारण ती लग्न करून दुसऱ्या घरी जाते त्यांचा वंश वाढवण्यासाठी. 

मुलालाच का मानला जातो गादीचा वारस? 
मुलीला पण एक संधी देऊन बघा ती ही करू शकते गादी सांभाळण्याचे धाडस. 

स्त्री भ्रूण हत्या करून मुलीला मारण्याचे माथी घेऊ नका पाप,
सगळेच मुलींना मारून टाकू लागले तर तो असेल तुमच्या वंशासाठी शाप. 

मुलीचं जन्माला नाही आल्या तर घराण्याचा कुलदीपक कुठून जन्माला येईल? 
मुलींना मारून टाकले तर तुमच्या आई, बायकोची जागा कोण बरं घेईल? 

प्रत्येकाला आई, बायको, बहीण, मैत्रीण हवी असते, 
पण मुलगी जन्माला येणे हे नको असते. 

प्रत्येक वेळी पुरुषांना दोष देऊन सत्यता बदलत नसते, 
जर आईने थोडी हिंमत केली तर मुलगी वाचू शकते. 

काही महिलांमुळेच स्त्री भ्रूण हत्येचे सत्र सुरू झालं, 
का ग आई मला गर्भातच का मारले?

©kavya_premi #MothersDay2021
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

ऐकून घेत नाही कुणी कधी शेतक-याचे मागणे,
शेतकरी म्हणून जन्माला आलो आहेच आम्हास सोसणे.

संबोधले जाते आम्हास शेतकरी हाच आहे जगाचा पोशिंदा,
पण सर्वत्र मांडला जातोय आम्हा शेतक-यांच्या मरणाचा धंदा.

जमीन आहे पण पिकत नाही,
पिकते तर त्या मालाला भाव नाही.

काय करावे आता आम्ही शेतकऱ्यांनी,
कर्जाचे व्याज वाढवून जगणे अवघड केलेय सावकारांनी.

कधी दुष्काळामुळे तर कधी अती पावसामुळे पिकांचे नुकसान होते,
ह्या सगळ्या हालअपेष्टांमुळे जगणेही असह्य होऊन जाते.

दोन वेळचे जेवायला नसले तरी आपले कर्तव्य निभावत असतो,
शेतकरी आहे ना शेतकऱ्यांचा विचार कधी कोण करत असतो.

कर्जमाफी ही फक्त नावापुरतीच मर्यादित राहते,
बघायला तर फक्त शेतकऱ्यांची आत्महत्याच येते.

सोशल मिडियावर फक्त शोक व्यक्त करतात,
पण मदत करायला कोण-कोण पुढे सरसावतात.

जगाला पोसणारा पोशिंदा स्वतःच्या कुटुंबाला पोसू शकत नाही हेच दुर्दैव आहे,
शेतकऱ्यांची ही अवस्था दुनिया उघड्या डोळ्यांनी पाहत राहे.

कोणाकडूनच नाही कसलीही अपेक्षा किंवा मागणे,
शेतकरी म्हणून जन्माला आलो आहेच आम्हास सोसणे.

©kavya_premi #farmersprotest
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

लिहिते हे पत्र तुझ्यासाठी होणारी सूनबाई, 
परकी नको समजू आहे तुझी दुसरी आई. 

हळदीच्या पावलांनी गृहप्रवेशाची स्वप्न बघत आहेस, 
माहेर सोडते हा विचार नाही तर आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्याची सुरुवात करत आहेस. 

तुझ्या रूपाने एक पंचवीस वर्षाचे झाड लावते माझ्या अंगणात,
सुरुवातीला सुनेचा ओढा अपेक्षित असतो तिच्या माहेरात. 

काहींना वाटते सूना माहेरी सासरच्या कागाळ्या करायला जातात, 
पण मला वाटते त्या माहेरी आपण सासरी किती सुखी आहोत हे सांगतात. 

तू जशी भावी संसाराची स्वप्ने रंगवली आहे, 
तसे मी तुला तडजोडी कराव्या लागू नये याची काळजी घेत आहे. 

कठीण प्रसंगातच आपला खरा कस लागतो, 
आपल्या नात्यात संवाद हवा कारण नाते तेव्हाच संपते जेव्हा संवाद संपतो. 

माझ्या मुलाने एक आदर्श पती व पिता व्हावे असेच सांगते,
पुरुषाच्या जीवनात त्याच्या आई इतकेच त्याच्या पत्नीचे अस्तित्व तितकेच महत्त्वाचे असते. 

उत्तम सहचर असेल तर उरत नाही कोणतेच भय, 
पण निवड चुकली तर आयुष्य होते नरकमय. 

एका नवथर तरुणीचे होणार आहे सुगृहिणीत रूपांतर, 
लवकर येईल या अंगणात लावलेल्या झाडाला बहर. 

मुलींना रांधा वाढा उष्टी काढा नको असतं म्हणून लग्न टाळतात, 
हे टळणार आहे का जर तुम्ही माहेरीच राहिलात? 

निर्णय तुझा तुलाच घ्यायचा आहे करू नको घाई, 
लिहिलेय हे पत्र खास तुझ्यासाठी होणारी सूनबाई.

©kavya_premi
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

आज परत काही रुपयांसाठी बाजारात त्याची बोली लागली होती,
कारण गरिबांच्या भाकरीची किंमतच तेवढी होती.

प्रत्येक सिग्नलवर आज ते तिरंगा घेऊन उभे होते,
भूक मोठी असली तरी देशाचे स्वातंत्र्य त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.

रोज याच सिग्नलवरून जाताना ज्यांना आपण हटकतो,
आज मात्र त्यांच्याकडूनच तिरंगा विकत घेतो.

यांना पाहताच गाडीच्या काचा बंद झालेल्या असतात,
आज मात्र नजरा चौफेर यांनाच शोधत असतात.

महागड्या वस्तू मॉलमधून घेणारे तिरंगा घेतात फुटपाथवर,
वर म्हणता काय खूप प्रेम आहे माझे माझ्या देशावर.

फुटपाथवर तिरंगा स्वस्त मिळतो एवढीच त्याची किंमत असते,
शेवटी काय त्याला पायदळीच तुडवले जाणार असते.

एकदिवसीय स्वातंत्र्य ही नसते त्यांच्या नशिबात,
स्वातंत्र्य हे भाकरी नाही ना देत ताटात.

तिरंग्याची किंमत त्यांना समजलेलीच नसते,
तिरंगा विकतानाचा आनंद म्हणजे आजतरी हिस्स्यात भाकरी येणार असते.

आज तो तिरंगा गल्लोगल्ली विकला गेला,
त्याची किंमत जाणूनही रस्त्यावर तो फेकला गेला.

तिरंग्याला हातात घेण्याचीही आपली लायकी नाही,
वस्तूंचा वापर करून झाल्यावर त्याची किंमत उरत नाही.

सहा महिन्यांनी परत एकदा त्याची बोली लागेल,
तेव्हाही गरिबांच्या भाकरीची किंमत तेवढीच असेल.

©kavya_premi #Independence2021
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

असे असहय होऊनी जगणे सांगा कोणाला प्रिय आहे,
फुटपाथवर जन्माला आलो यात माझी काय चुक आहे?

प्रेमाची अन् अन्नाची भीक घालत नाही कोणी,
पण कमवून स्वतःचे पोट भरा असा सल्ला मात्र जातात देऊनी.

माझ्या भुकेची वेदना आता मुक झाली आहे,
अनाथ मी जाहलो म्हणून हे जग मलाच हिणवत आहे.

अनाथ होण्याइतपत दुर्दैव कोणाला मागून मिळत नसतं,
थोडीशी मदत करणं ही त्यांना भिकारपणाच लक्षण वाटत असतं.

अस लाचार होऊन जगावे असे कोणाला वाटत आहे,
समाज मात्र आम्हाला 'रस्त्यावरची अडगळ' म्हणूनच पाहत आहे.

रस्त्याच्या बाजुला वसवलेली जागा पालिकेला खटकते,

कायमचा असा निवारा नाहीच हो आमचा, 
रस्त्याच्या कडेला घर आमचे वसते.

पोटाची खळगी भरण्याचा आमच्याकडे हाच एक उपाय आहे,
शेवटी भिकारीच आहोत आम्ही भीक मागणे आमच्या नशीबातच आहे.

फुटपाथवरच जगणं आमचं फुटपाथवरच मरण,
बेवारस्याप्रमाणे जगलो आम्ही आम्हाला कुठल आलंय सरण.

पुढे हेच जगणं आमच्या मुलाबाळांच्या वाटयाला येणं आहे,
फुटपाथवर जन्माला आलो यात माझी काय चूक आहे?

©kavya_premi #Streetlight
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

जर का आपले एकच कॉलेज असते, 
तर माझ्या मैत्रिणींनी तुलाच घेरले असते. 

भरमसाठ असे प्रश्न विचारून तुला केले असते हैराण, 
मग त्यांच्या नजरेत तूच झाला असतास महान. 

कधी काय करतोस यावर ठेवली असती नजर, 
लेक्चरला झोपताच उठवले असते लावून गजर. 

प्रत्येक क्षणी मग माझ्या डोळ्यासमोर राहिला असता,
चुकूनही इतर कोणत्याही मुलीच्या नादाला लागला नसता. 

सतत फिरत राहिला असतास माझ्याच मागे, 
कॉलेजमध्येच जुळले असते आपल्या प्रेमाचे धागे. 

सारखा सारखा तू ही घेतला असतास माझ्यावर संशय, 
इतर मुलांशी बोलताना वाटले असते मला भय. 

पालक सभेला मात्र आपली धांदल उडाली असती,
एकमेकांच्या घरच्यांना आपण आपली काय ओळख करून दिली असती? 

खरचं आपण एकमेकांच्या एवढ्या प्रेमात असतो, 
की आख्या कॉलेजचे आपण फेवरेट कपल झालो असतो. 

कधी कधी आपल्यात भांडणेही झाली असती, 
पण समंजसपणे आपण ती मिटवली असती.

कितीही काही झाले तरी आपले प्रेम हे शेवटपर्यंत टिकवले असते,
जर का आपले एकच कॉलेज असते..

©kavya_premi #RoseDay2021
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

तो नेहमी रात्री माझ्या स्वप्नात येऊन जाई, 
पण मला प्रश्न पडायचा की, 

तो आरशात का दिसत नाही.

सर्व मला बोलायचे तो नाही आहे हयात, 
पण मी मात्र होते त्याच्या आकंठ प्रेमात. 

कळत्या वयात आल्यापासून झालं त्याच्यावर प्रेम,
आवडी-निवडी जुळल्या विचारही होते अगदीच सेम. 

ओळख झाली वाढल्या आमच्या भेटीगाठी, 
प्रेमाची वचने दिली एकमेका बांधल्या प्रेमाच्या रेशीमगाठी.

आनंदी आनंद होता जुळले ग्रह अन् राशी, 
म्हणायचा तो नेहमी सांग काय करू तुझ्यासाठी? 

त्याच्या या वेड्या प्रेमाची होते मी दिवाणी, 
जसे राजदरबाराचा राजा तो अन् मी त्याची राणी. 

परि न जाणे काय झाले प्रेम विश्वात, 
अचानक काय माहित कसा झाला त्याचा अपघात. 

पाहिले मी चित्तथरारक दृश्य रक्तरुपी धारा त्याच्या शरीरातून वाही. 
दवाखान्यात नेले असता डॉक्टर बोलले, माफ करा आम्ही काही करू शकत नाही. 

थांबली होती कायमची आमची प्रेमाची गाडी, 
झाला माझ्या मनावर आघात अन् मी झाले ठार वेडी. 

सगळे एकच म्हणायचे तो कधीच परत येणार नाही, 
पण मला प्रश्न पडायचा की, 

तो आरशात का दिसत नाही.

©kavya_premi #Light
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

ओळखलंस का मी कोण बोलत आहे,
होय आफताब मी तुझी श्रद्धा बोलत आहे.

मी जिवंत नसूनही मला सावलीत तुझंच प्रतिबिंब दिसतं,
तुला तर माहितीय आत्म्यांच्या सोबतीला कोणीच नसतं.

मला वाटलं होतच की तुझ्या आधी माझा श्वास संपावा,
असं नव्हतं वाटलं की तो संपूर्ण जगाने पहावा.

स्वप्न पहायचे मी या गळ्यात कधी पडेल हार,
काय माहित कसं पण याच गळ्यावर केले तू वार.

त्यादिवशी मरण दिसले मला तुझ्या रागात,
अन् कायमचा दुरावा आला आपल्या नात्यात.

वाटलं होतं माझ्या प्रेतासाठी तू ताजमहाल तरी बांधावास,
असं नव्हतं वाटलं की त्याने तू फ्रिज सजवावास.

शरीराचे तुकडे तू जंगलात का फेकलेस याचाच मी विचार केला,
त्यातला एक न् एक तुकडा हा प्राण्यांचे भक्ष झाला.

मला आज कळलं की तू कधीच माझा नव्हता,
खूप वाईट वाटतं हे जेव्हा कळतं माझ्यावर प्रेम करणारा तो तूच होता.

आता तरी ओळखलंस का मी कोण बोलत आहे,
होय आफताब मी तुझी श्रद्धा बोलत आहे.

©kavya_premi #jail
cf9bc618b04aa294aafe36746b27a263

kavya_premi

चांगला नवरा शोधण्याच्या नादात आपण तिला अशा व्यक्तीच्या हवाली करतो, 
जो तिला जीवनभर फक्त एक खेळणं समजतो. 

तिच्या चांगल्यासाठीच आपण पिळतो तिचा कान, 
पण त्यामुळे आयुष्यभर तिचा बळी जातो याचे आपल्याला उरत नाही भान.

 जास्त काही विचारपूस न करता आपण लावून देतो लग्न,
वासनेच्या आहारी गेलेला तो रोज रात्री करतो तिला नग्न, 

माहित नसते आपल्याला तिला मानसिक आणि शारीरिक होतो त्रास, 
आपण तिला अशा घरात देतो जिथे माणसांचा नाही तर जनावरांचा आहे वास. 

सतत ते तिला करत असतात मारहाण, 
समाजातून नाहीशी करायला हवी माणुसकीला काळीमा फासणारी घाण. 

वाईट ह्याचे वाटते की त्यात एक स्त्री सुद्धा सहभागी असते,
आपल्याच शेजारी घटना घडतात पण आपल्याला त्याचे काहीच वाटत नसते. 

येतो कुठून तुमच्यात एवढा क्रूरपणा? 
यांना दिला पाहिजे चोप काढून पायातील वहाणा. 

शांत आहे म्हणून समजू नका कमजोर तिला, 
घेईल कालिका मातेचे रूप मग होईल पश्चाताप तुम्हाला. 

स्त्रीच आहे जी बनवते स्वर्ग तुमचे घर, 
अन्याय करण्याच्या नादात बनू नका जनावर. 

अन्याय करण्याची क्षमता असते,
तसेच अन्याय सहन करण्याचीही क्षमता असते. 

आपल्या मुलीचं आयुष्य आपणच नकळतपणे उध्वस्त करत असतो, 
कारण तिच्या जीवनाची दोरी चुकीच्या हातात देत असतो.

©kavya_premi #Alive
loader
Home
Explore
Events
Notification
Profile