Nojoto: Largest Storytelling Platform
nehapatil1166
  • 9Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

Neha Patil

  • Popular
  • Latest
  • Video
dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

हाती हात तुझा,
  सोबतीला चंद्र हा कोजागिरीचा..
स्वर्ग ही जणू ठेंगणे मला,
  होता कपाळी ओठांचा स्पर्श तुझा..
फिकं आज हे लख्ख चांदणं ही,
  तुझ्या प्रेमाच्या वर्षावापुढे..
डोळ्यांची काजळ ही, 
  घायाळ तूझ्या नजरेने..

dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

तू जर सोबत असतास,
   तर, सगळं काही सहन केलं असतं...
पण तू अर्ध्यातच सोडून गेलास,
    ते दुःख मात्र आजही मनात सलतं...

dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

भेटीची ओढ ही,
   नजर माझी बोलून जाईल..
तगमग ही मनाची,
   मिठीत तुझ्या शांत होईल..

dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

तुझ्या आठवणीने येणाऱ्या अश्रूंना,
    तुझ्याच हास्याची जोड...
तुझं हसू मला लाख मोलाचं,
   त्याला नाही कशाची तोड....

dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

उत्तर दे
     उत्तर दे.. भरून काढशील का ती पोकळी 
          जिथे तूझ्या आठवणीत रमले मी
                           वेळी - अवेळी..
      तुझ्या कवेत रंगवल्या स्वप्नांच्या मैफिली...
   तळ हाती चेहरा स्वतःचाच धरून, 
         हुंदक्यांनी सरल्या ज्या कातरवेळी...
     
             
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उत्तर दे...
#उत्तरदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उत्तर दे... #उत्तरदे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

आज सोबत हवा होतास,
   मिळून जगलो असतो सारे क्षण...
बाकी काहीच राहिली नसती.. फक्त..
   तू माझं हृदय अन् मी तुझं मन... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आज सोबत हवा होतास...
#आजसोबत
हा विषय GANESH MADAVI
यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#cinemagraph #collab #yqtaai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज सोबत हवा होतास... #आजसोबत हा विषय GANESH MADAVI यांचा आहे. चला तर मग लिहूया. #cinemagraph #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

वाहते आहे तुझ्याकडेच,,
   ओढ म्हणावी की अधीरता....
सगळं काही आहे... फक्त..
   एक तुझी कमतरता....  #thirdquote
dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

चेहरा तू माझा ओंजळीत घेता,
    डोळ्यांत झाली अश्रूंची दाटी...
त्यांना तरी कसं रोखावं,
     त्यांचीही चढा ओढ... तुला पाहण्यासाठी..  #secondquote
dec4dc298fac19b7f61cb34a835519ad

Neha Patil

    अबोल शब्दही तूझ्या कवेत,
         बोलके होवून जातील...
     स्पर्शाने तूझ्या मोहरुन,
          चाफ्यांचेही सोहळे होतील...  #firstquote


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile